✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CdkdzBiwH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील ३६५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: नांदेड जिल्ह्यात अर्धापूर व नायगाव या तालुक्याची निर्मिती* *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९३८: मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर मकरणपूर ता. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत जनजागरण परिषद**१९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.*🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: वैशाली बाबुराव कोटंबे -- कवयित्री**१९६९: रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०: मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९: तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१: श्रीरात झिटूजी केदार -- कवी* *१९४८: सुरिंदर अमरनाथ -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९४६: डॉ.श्रीनिवास टोणपे -- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१: जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध इतिहास संशोधक**१९३८: डॉ. स्नेहलता देशमुख -- प्रसिद्ध लेखिका, शल्यविशारद, बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु( मृत्यू: २९ जुलै २०२४ )**१९३०: बसंत प्रकाश -- प्रसिद्ध संगीतकार ( मृत्यू: १९ मार्च १९९६ )**१९२६: दीनानाथ लाड -- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू: १२ ऑगस्ट २०१९ )**१९२२: गोपाळ मोरेश्वर कोलते -- लेखक, कवी (मृत्यू: ४ जानेवारी २००४ )**१९०१: अनंत जनार्दन करंदीकर -- मराठी पत्रकार आणि राजकारण, इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक (मृत्यू: १ नोव्हेंबर १९७७ )**१९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३ )**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य -- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू: १७ जुलै १९५० )**१८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५० )**१८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१ )**१८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: भवानी शंकर -- भारतीय पखवाज ड्रम वादक (जन्म: १२ सप्टेंबर १९५६ )**२०१५: मंगेश केशव पाडगांवकर -- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० मार्च१९२९ )**२०१३: लक्ष्मी शंकर शास्त्री -- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका (जन्म: १६ जून १९२६ )**२००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७ )**१९९२: पिराजीराव रामजी सरनाईक -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर (जन्म: २८ जुलै १९०९ )**१९८७: दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता – संगीतकार* *१९८२: दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: २ डिसेंबर १९१३ )**१९८१: डॉ. अप्पासाहेब गणपतराव पवार -- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: ५ मे १९१७ )**१९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१: डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९ )**१९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६ )**१६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रविवार माझ्या आवडीचा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला देवस्वारी आणि पालखीने प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तरप्रदेश सरकार कडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना महाकुंभमेळाचे आमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दक्षिण कोरियात विमान लँडिंग करताना मोठा अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रभागा स्वच्छतेसाठी महिन्याकाठी 10 लाखाचा ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पालघरच्या बोईसर-तारापूर MIDC अग्नितांडव ! युके अरोमॅटिकसह इतर दोन कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लांबच लांब लोळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या ई वाहनांच्या खरेदी विक्रीवर 18 टक्के जीएसटी लागू, विक्रेते, खरेदीदारांमध्ये नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦷 *आपल्याला दोनदा दात का येतात ?*🦷याचं अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल, की आपली पुरी बत्तिशी बसवण्याइतका लहान मुलाचा जबडा मोठा नसतो. तो मोठा झाल्याशिवाय मग सारे दात त्यात बसवावेच कसे? तसे ते दाटीवाटीनं कसेबसे बसवले तर त्यांना आपलं काम करणंच अशक्य होईल. तोंडात आलेल्या अन्नाच्या घासावर तुटून पडण्याऐवजी ते एकमेकांवरच आपली धार चालवतील. त्यात त्यांचं नुकसान होऊन अन्नाचे व्यवस्थित तुकडे करून त्याच्या पचनाला मदत कशी करू शकतील ते? बरं, जबड्याचा आकार हवा तेवढा मोठा होईपर्यंत वाट पाहायची तर मग सुरुवातीची बारा-तेरा वर्षं तोंडाचं बोळकं घेऊन वावरावं लागेल. घन पदार्थांचा अन्नात समावेशच करता येणार नाही. नुसतं गिळता येईल असं द्रवरूपातलं किंवा लापशीसारखं अन्नच घेता येईल. उलट, वाढ होत असताना जितक्या लवकर घन अन्न म्हणजेच सॉलिड देता येईल तितकं बरं असतं. म्हणूनच मूल साधारण सात-आठ महिन्यांचं झालं की त्याला असं अर्धवट घन अर्धवट द्रव अन्न द्यायला सुरुवात करता येते. सहा-सात महिन्यांतच एक-दोन तरी दात यायला लागतात. पुढच्या वर्षा-दोन वर्षांत मुलाचं तोंड दातांनी भरून जातं; पण त्या वेळी जास्तीत जास्त वीसच दात तोंडात असतात. जबड्याचा आकार ध्यानात घेता तेवढेच बसवता येतात. त्यांच्या अधेमधे आणखी बारा दातांची बसवणूक करण्यासाठी फटीच नसतात. आता जबडा वाढताना जर दातांदातांमधलं अंतर वाढत गेलं तरी अतिरिक्त दात बसवता येतील. मग मधल्या काळात दातांमधल्या फटीच वरचढ होऊन सारं आरोग्यच बिघडून जाईल. म्हणूनच निसर्गानं ही तात्पुरत्या म्हणजेच दुधाच्या दातांची सोय केली आहे. त्यानंतरच्या काळात ज्यांची आयुष्यभराची साथ व्हायची, म्हणजे त्यांच्याशी काही खिलवाड केली नाही तर, त्या कायमस्वरूपी बत्तिशीची वाढ वास्तविक दुधाचे दात बाहेर पडल्याक्षणीच सुरू होते. दुधाच्या दातांच्या वरच्या हिरड्यांमध्ये ते वाढू लागतात. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत जबड्याचा आकारही कमाल मर्यादा धारण करतो. हे कायमस्वरूपी दात परिपक्व झाले की दुधाच्या दाताच्या मुळावर घाव घालतात. ते मूळ कापून काढतात. आधारच असा तुटला, की ते दुधाचे दात गळून पडतात. कायमस्वरूपी दातांसाठी आपली जागा खाली करून देतात आणि आपला निरोप घेतात. त्यांची रिकामी झालेली जागा मग ते कायमचे दात घेतात. तरीही काही दाढा उशिराच येतात. अक्कलदाढही त्यातलीच एक. काही जणांना तर ती कधीच येत नाही की काय, अशीही शंका येते; पण ती एक वेगळीच गोष्ट आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ICICI - Industrial Credit and Investment Corporation of India*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांचीच्या स्तूपाची प्रतिमा भारतीय चलनाच्या किती रुपयाच्या नोटावर आहे ?२) सांचीचा स्तूप कोणत्या राज्यात आहे ?३) सांचीचा स्तूप कोणी बांधला ?४) सांचीच्या स्तूपात कोणाच्या अस्थि आहेत ?५) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सांची स्तूपला केव्हा मान्यता दिली ? *उत्तरे :-* १) २०० ₹ २) मध्यप्रदेश ३) मौर्य सम्राट अशोक ४) गौतम बुद्ध ५) सन १९८९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणभीरकर, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 साहेबराव कांबळे, शिक्षक, नांदेड👤 मारोती राचप्पा छपरे, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी दरेबोईनवाड👤 आनंद यडपलवार, शिक्षक व कवी, धर्माबाद👤 राजेश्वर रामपुरे👤 निवृत्ती लोखंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥ सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनातील आचार विचार किंवा शब्द जेव्हा कागदावर लिहिण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो. तसंच कुठेही न बघता तेच शब्द थोडं बोलण्याचा ही प्रयत्न करून बघावा. भलेही ते शब्द बोलताना जरी दर्जेदार निघत नसले तरी शेवटी ते आपलेच शब्द व विचार असतात. आणि ते अंतर्मनातून आलेले असतात. त्यातूनच आपल्याला खरा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला, "मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment