✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/kashtachi-kamai.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀️ *_राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ३४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• *१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.**१९२९: ’प्रभात’ चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९२०: अकाली दलाची स्थापना**१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.**१९००: बर्लिन विद्यापीठातील प्राध्यापक मॅक्स प्लॅब यांनी त्यांच्या क्रांतिकारी विचार पुंजसिध्दांत जगापुढे आणला**१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.* ☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: कुलदीप यादव -- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९०: विनय पाटील -- कवी**१९८६: संवाद सतीश तराळ -- लेखक, कवी**१९८४: दिव्यांका त्रिपाठी दहिया -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८४: नंदकिशोर नैताम -- लेखक**१९८०: आनंदराव नागनाथराव पाटील(आनंद पाटील) -- लेखक**१९८०: जुही परमार -- भारतीय अँकर, प्रस्तुतकर्ता, गायिका आणि नृत्यांगना**१९७८: समीरा रेड्डी -- भारतीय अभिनेत्री**१९७२: विजय यशवंत सातपुते -- कवी, लेखक, संपादक* *१९५७: शीतल श्याम दामले -- कवयित्री* *१९५३: विजय अमृतराज –भारतीय लॉन टेनिसपटू**१९५२: सुषमा रमेशचंद्र म्हैसेकर-इर्लेकर -- कवयित्री* *१९५१: विजय श्री.केळकर -- लेखक**१९५०: प्रल्हाद श्रीराम गावत्रे -- कवी* *१९४९: श्रीकांत शंकर बहुलकर -- संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक, बौद्धविद्या व वेदविद्या अभ्यासक**१९४९: डॉ. अनुपमा निरंजन उजगरे -- जेष्ठ लेखिका आणि प्रसिद्ध कवयित्री, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८० )**१९४४: मंदा खापरे -- प्रसिद्ध लेखिका व कवयित्री**१९४४: अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी -- जेष्ठ लेखक तथा निवृत्त सहा.पोलिस आयुक्त* *१९४३: विजय शंकर जोशी -- लेखक**१९४०: लक्ष्मण मोतीराम बांदेकर -- मराठीतील नामवंत नाटककार (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५ )**१९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८० )**१९३८: प्रभाकर वामनराव ढगे -- कवी, लेखक**१९३६: स्वजित चटर्जी (विश्वजित) -- भारतीय अभिनेता, निर्माता, निर्माता, गायक**१९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक**१९२८: प्रसाद सावकार –भक्ती संगीताचे अभ्यासक , गायक व नट**१९२४: राज कपूर – प्रसिद्ध अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८ )**१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.(मृत्यू: २० ऑगस्ट, २०१४ )**१९०५: विश्वनाथ पांडुरंग दांडेकर --मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक (जन्म: १ जानेवारी १९७४ )* *१८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२ )**१८९२: विठ्ठल कृष्ण नेरूरकर -- मराठी कथाकार, कवी आणि नाटककार (मृत्यू: १९ मार्च १९४९ )* *१८२२: रेव्ह सॅम्युएल फेअरबॅंक -- धर्मगुरू, दूरदर्शी शिक्षक, लेखक, संपादक (मृत्यू: ३१ मे १९८८ )**१५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: गीता काक -- भारतीय ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ ऑगस्ट १९५० )**२०१४: श्रीराम ताम्रकर -- चित्रपट विषयक विपुल लेखन (जन्म: ९ नोव्हेंबर १९३८ )**२००५: सुधीर जोशी -- विनोदी मराठी अभिनेते (जन्म: १९४८)**१९७९: गोविंद घाणेकर -- लेखक (जन्म: १५ जून १९११ )**१९७७: गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९ )**१९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३ )**१७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कष्टाची कमाई*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रिमंडळ विस्तार आता रविवारी 15 डिसेंबर रोजी मुंबई ऐवजी नागपुरात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लाडक्या बहिणींचे पैसे येत्या दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याला देशात सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध धोरणे राबवण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई मेट्रोला दिशा देणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 मृगजळ का दिसत ? 📒 मृगजळ म्हणजे एक चमत्कार, अशी सर्वसाधारण समजूत असली तरी तो आहे केवळ एक प्रकाशीय अविष्कार. प्रकाशाच्या एका गुणधर्मापोटी तो साकार होतो. प्रकाशकिरणांचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. घन माध्यमांमध्ये तो कमी असतो. विरळ माध्यमात तो जास्त असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त असतो. माळरानावर आपण सुसाट धावू शकतो; पण घनदाट जंगलातून आपल्याला त्याच वेगाने पळता येत नाही. आपला वेग आपोआपच कमी होतो. त्यातलाच हा प्रकार.त्यामुळेच एका माध्यमातुन दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशकिरणांची दिशा बदलते. ते वागतात. कमी वेग असलेल्या माध्यमाच्या दिशेने ते वळतात. यालाच प्रकाशाचे वक्रीभवन किंवा अपवर्तन असे म्हणतात. माध्यमांच्या घनतेनुसार या वक्रीभवनाची मात्राही वेगवेगळी असते.मृगजळ आपल्याला दिसते ते सहसा अतिशय तापलेल्या रस्त्यावरून जाताना. त्या रस्त्यावर दूरवर एखादे पाण्याने भरलेले तळे असल्यासारखे आपल्याला दिसते. पण त्याच्या जवळ जावे, ते तळे आहे असे वाटते. तिथे पोहोचले तर ते तळे गायब होते. तिथे तसाच तापलेला डांबरी रस्ता असल्याचे आपल्याला दिसते.जेव्हा तो रस्ता अतिशय तापलेला असतो तेव्हा त्या रस्त्याच्या निकट असलेल्या हवेच्या थराचं तापमानही चढतं. हवा तापली की विरळ होते. त्याच्यावर असलेल्या तुलनेने थंड असलेल्या हवेच्या थराची घनता जास्त असते. ती दाट असते. त्यामुळे आकाशातून आलेल्या सूर्याप्रकाशाचा किरण प्रथम त्या हवेच्या दाट थरातून जातो. तिथून जेव्हा तो खालच्या तापलेल्या विरळ थरात जातो तेव्हा त्याचा वेग अर्थातच वाढतो आणि त्याची व त्याची दिशा बदलते. ती वरच्या दाट थराच्या म्हणजे कमी वेग असलेल्या माध्यमांच्या दिशेने वळते. तो किरण आपल्या डोळ्यांना भिडतो तेव्हा त्या रस्त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात न उमटता वर असलेल्या आकाशाची प्रतिमा तिथे साकार होते. आकाश तर वरच्या बाजूला आहे. मग ते आपल्याला कसे दिसेल, असे वाटल्याने ते त्याचे प्रतिबिंब आहे असा आपला समज होतो. तसे ते प्रतिबिंब जर तिथे पाणी असेल तरच आपल्याला दिसेल, अशा समजुतीने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन जिथुन झाले त्या ठिकाणी पाण्याचा साठा असल्याचा भास आपल्याला होतो. अशा प्रकारच्या हवेच्या निरनिराळ्या थरात जेव्हा घनता वेगवेगळी असते तेव्हा तेव्हा हा वक्रीभवनाचा खेळ साकार होतो. त्यापायीच समुद्राजवळच्या एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभे असतो तेव्हाही आपल्याला आकाशात होडी चालल्यासारखी दिसते. वास्तविक ती होडी समुद्राच्या पाण्यात विहरत असते; पण वक्रीभवनापायी तिची ती आभासी प्रतिमा उमटते आकाशाच्या पडद्यावर. तेही मृगजळच.बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NIT - National Institute of Technology*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्याजवळ धैर्य व चिकाटी असेल , तर तुमच्या सर्व इच्छा सफल बनतील. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युनायटेड नेशन्स एन्व्हायर्मेंट प्रोग्रामतर्फे ( UNEP ) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा *'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' - २०२४* जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) राजर्षी शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कोणी दिली होती ?३) कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली ?४) 'विनय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १९८८ च्या 'खडू फळा' या योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) डॉ. माधव गाडगीळ २) क्षत्रिय कुर्मी समाज, कानपूर ३) महात्मा फुले ४) नम्रता ५) ऑपरेशन ब्लॅक बोर्ड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे👤 पवन धावनी👤 राज काकडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिनताती ॥२॥ श्रीवत्सलांच्छन वैजयंती गळां । नेसला पाटोळा तेजःपुंज ॥३॥ पाऊलें समान विटेवरी नीट । नामा म्हणे भेट घ्यावी त्याची ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत आणि राजा*एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला, "मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला, "महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते माजखोर आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल. *तात्पर्य - स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment