✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1HDXe7T8Vu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.**१९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.**१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.*🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: खेमचंद गणेश पाटील -- लेखक, संपादक**१९८७: गिरिजा ओक -- मराठी अभिनेत्री**१९७९: देवा गोपिनाथ झिंजाड -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९७९: हबीब भंडारे -- प्रसिद्ध लेखक व कवी**१९६९: आश्लेषा महाजन -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६७: संध्या विजय दानव -- लेखिका**१९६६: किरण अग्रवाल -- अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक**१९६५: प्रा. सुभाष भिकाजी मगर -- कवी**१९६५: सलमान खान -- प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता* *१९५४: जगदीश छोटू देवपूरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४६: रामचंद्र विष्णू खाकुर्डीकर -- लेखक**१९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७ )**१९३८: आशा भालचंद्र पांडे -- मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू भाषेत लेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका, महाराष्ट्रतील पहिली गझलकार, अध्यक्षा साहित्य विहार संस्था , नागपूर**१९३६: सुधीर देव -- कवी, माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक (मृत्यू:२३ ऑक्टोबर २०२० )**१९२८: निर्मला गोपाळ किराणे -- जुन्या पिढीतील लेखिका (मृत्यू: २३ सप्टेंबर २०२२ )**१९२७: सुमती देवस्थळे -- चरित्रकार (मृत्यू: २२ जानेवारी १९८२ )**१९२७: बाळ गंगाधर देव -- लेखक* *१९२३: श्री. पु. भागवत -- संपादक आणि प्रकाशक (मृत्यू: २१ ऑगष्ट २००७ )**१९१७: निर्मला वसंत देशपांडे -- कवयित्री, कादंबरीकार (मृत्यु: १ मे २००८ )**१९०४: वसंत शांताराम देसाई -- नाटककार, समीक्षक, कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यु: २३ जून १९९४ )**१८९२: रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन -- ज्योतिष्याभ्यासक, ग्रंथकार (मृत्यू: १९ डिसेंबर १९६८ )* *_१८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षण प्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(मृत्यू: १० एप्रिल १९६५ )_**१८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५ )**१७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९ )**१६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५ )**१५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३० )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विकास सबनीस -- प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार (जन्म: १२ जुलै १९५० )**२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३ )**१९९७: मालती पद्माकर बर्वे -- सुगम संगीत क्षेत्रात कीर्ती मिळविणाऱ्या ज्येष्ठ गायिका (जन्म:१९ एप्रिल १९३० )**१९७२:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२३ एप्रिल १८९७)**१९६५: देवदत्त नारायण टिळक -- मराठी लेखक( जन्म: १८९१ )**१९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *Email : chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवनात कुटुंबाचे महत्व सांगणारा लेख ..... *आयुष्याची संध्याकाळ* ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमरावतीच्या करीना थापा सह देशभरातील 17 बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात 'मीट द प्रेस' कार्यक्रमात व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते, मुख्य प्राप्तिकर आयुक्त सतीश शर्मा यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या, यात चार खेळाडूंचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *संमोहन* 📙 जादूगाराचे प्रयोग कधी पाहिले असतील, तर संमोहनाबद्दल प्राथमिक माहिती नक्कीच कायमची डोक्यात असेल. स्टेजवर बोलावलेल्या माणसाला किंवा जादूगाराच्या मदतनिसाला संमोहित केल्यानंतर ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतात, त्या विसरणे कोणाही सामान्य माणसाला शक्य होत नाही. ठराविक आज्ञांचे बिनचूक पालन करणे, ज्या गोष्टी तो माणूस एरवी करायला धजावणार सुद्धा नाही अशा गोष्टी बेधडकपणे कसलीही भीती न बाळगता करणे, ज्या बाबींबद्दल कधी ऐकलेही नाही त्यांची संगतवार माहिती देणे वगैरे कामे संमोहित माणसाकडून जादुगार करून घेतो. त्या क्षणी खरे म्हणजे जादूगार जादूगार नसून संमोहित केलेल्या माणसाच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला ताबेदारच असतो.जागृतावस्था व निद्रावस्था या दोन अवस्था कोणीही पाहू शकतो किंवा स्वतः अनुभव शकतो. यांमधील मुद्दाम निर्माण केलेली कोणाच्या तरी आदेशातून उद्भवलेली, अर्धवट जागृत व अर्धवट निद्रावस्था म्हणजे हिप्नाॅसिस. एखाद्या अधिकारी व तज्ज्ञ व्यक्तीने समोरच्याला स्वतःच्या कृतीतून, नजरेतून, बोलण्यातून दिलेल्या संदेशांमुळे समोरची व्यक्ती या अर्धवट निद्रिस्तावस्थेत जाते. या अवस्थेत त्यांचा शारीरिक व मानसिक संवेदनांवर जवळपास पूर्ण नियंत्रण या तज्ज्ञ व्यक्तीचे असते. जशा आज्ञा दिल्या जातील, तशी संमोहित व्यक्ती वागत असते. उदारणार्थ, संमोहित व्यक्तीला जर तज्ज्ञाने आज्ञा केली की आता तू एखाद्या गायकाची तंतोतंत नक्कल करणार आहेस, तर गाणे कधीही न म्हटलेली संमोहित व्यक्ती जमेल तसे गाणे म्हणू लागते. आज फार थंडी पडली आहे, असे सांगितल्यावर अक्षरश: कुडकुडू लागते. अशा विविध आज्ञापालनातून जादूगार संमोहित व्यक्तीकडून मजेमजेच्या गोष्टी करवुन घेत असतो. या अर्धवट निद्रावस्थेतुन योग्य आज्ञा दिल्यावर संमोहित व्यक्ती पुन्हा जागी होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालेल्या गोष्टींबद्दल म्हणजेच अर्धवट निद्रावस्थेत स्वतः केलेल्या कृतीबद्दल तिला काहीही आठवत नसते.हिप्नाॅटिझमचा वापर इंग्लिश सर्जन जेम्स ब्रेड यांनी एकोणीसाव्या शतकात केला. याआधी १७६० साली फ्रान्स मेस्मेर या ऑस्ट्रियन डॉक्टरने मंत्रमुग्धविद्या किंवा मेस्मेरिझमचा वापर केला होता. यातूनच हिप्नाॅसिसचा उगम झाला असे मानले जाते. जीन मार्टिन चारकॉट व सिग्मंड फ्रॉइड यांनी याचा वापर मुख्यतः हिस्टेरिया या मनोविकारांवर उपचार म्हणून सुरू केला. गुंगी, त्यानंतर शरीरात एक ताठरपणा व त्यानंतर झोपेत चालणे व अन्य हालचाली या तीन टप्प्यांतून हिप्नाॅसिसची अवस्था जाते असे मानले जाते. मात्र काही काळानंतर फ्राॅइडनी हा वापर थांबवला.भारतात पण हिप्नाॅसिस किंवा संमोहनविद्या ही फार पुरातनकाळापासून ज्ञात आहे. हिचा वापर मुख्यत: ज्या व्यक्ती दुसऱ्यावर पूर्ण विश्वास टाकतात, सहजगत्या आज्ञापालनाला तयार होतात, भोळ्याभाबडय़ा समजुतीने एखाद्याचे म्हणणे ज्यांना सहज खरे वाटू लागते, त्यांच्यावर पटकन होतो. हे लक्षात घेतले, तर संमोहन करणाऱ्याच्या अधीन होण्याची किमान मानसिक तयारी नसलेली व्यक्ती संमोहित करणे जवळपास अशक्य होते. अशांची संख्या एकूण समाजात जेमतेम २० टक्के सुद्धा नसते. संमोहन किंवा हिप्नाॅसिस ही एक मानवी मनाची अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, असे म्हणायला हरकत नाही. या प्रक्रियेला शास्त्र म्हणून मान्यता द्यायला अनेक तज्ज्ञांचा ठाम विरोध असतो; तर याउलट हिप्नाॅटिझमचे प्रयोग असतील तर जादूगाराची किमया समाजाने मनोमन मान्य केलेली असते. ही सारी गुंतागुंत काय आहे ? अशा प्रकाराला 'संमोहनावस्था' असेही म्हणतात.संमोहन हे एक मान्यता नसलेले शास्त्र आहे. त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण देता येणे अजून जमलेले नाही. पण ज्याला संमोहित करून घेण्याची इच्छा आहे, ज्याची तशी मानसिकता आहे तो जरूर सम्मोहित होऊ शकतो. शास्त्र म्हणजे एका पद्धतीचा परिणाम सर्व लोकांवर दिसणे आवश्यक ठरते. तो इथे दिसत नाही. ज्याला स्वतःच्या मनावर दुसऱ्याचा काबू वा अंमल येऊच द्यायचा नसतो, तो संमोहित झाला आहे, असे फारच क्वचित.याचे व्यावहारिक उपयोग काही वेळा केले जातात. गुन्हेगार, मनोरूग्ण, खोटे बोलणारी निर्ढावलेली व्यक्ती यांना मनोविकारतज्ज्ञ काही औषधांच्या सहाय्याने अशीच अर्धवट सुप्त निद्रावस्था आणतात. नार्कोलेप्सी या अवस्थेत त्यांच्याशी संवादही साधला जातो. पण हे सारे औषधाच्या अमलाखाली असते. त्याचे प्रमाणीकरण अनेक चाचण्यांतून सिद्ध झालेले आहे. असे हिप्नाॅसिसबद्दल सांगता येत नसल्याने असेल कदाचित, पण या प्रकाराला वा या उपचारपद्धतीला शास्त्रज्ञांची मान्यता नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BDO - Block Development Officer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःच्या जिभेपेक्षा सावरून , धरण्यास अवघड अशी गोष्ट नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) दक्षिण अमेरिका खंडात एकूण किती देश आहेत ?३) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ?५) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) दक्षिण अमेरिका २) १४ देश ३) ब्राझील ४) माउंट अकोनकाग्वा ( ६,९६२ मी. ) ५) अमेझॉन नदी ( ६,८०० किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पूजा शिंपी, बागुल, साहित्यिक, नाशिक👤 विठ्ठल भाई श्रीगांधी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥ होसी कालिमाजीं कलिसारिखाची । भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥ नामा म्हणे माळ घातिली स्वहस्तें । करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारलं कडू ते कडूच. तुपात तळा किंवा साखरेत घोळा शेवटी आपली चव सोडत नाही. असे अनेकदा वाचण्यात किंवा ऐकण्यात येते. त्याच प्रमाणे कितीही त्यांना निरखून बघितले तरी एक ना एक तरी कारली आपली दृष्टी चुकवून जाते. सत्य सुद्धा असेच आहे. आपल्या जवळ किंवा आपल्या समोर असताना सुद्धा त्याला ओळखता येत नाही. याच चुकीमुळे बरेचदा आपल्या जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते.म्हणून शक्य होईल तेवढ्या लवकर सत्य जाणण्याचा प्रयत्न करावा सोबतच सत्याला समर्पित व्हावे.भलेही सत्य कडू असेल तरीही त्याचा कधीच अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातृभक्ती*त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले.त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहऱ्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाहीं. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment