✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९९९:काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर**१९८९:भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.**१९७६:फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.**१९७१:अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.**१९४२ : योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.**१९४२:एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:अपूर्व अग्निहोत्री-- चित्रपट दूरदर्शन अभिनेता**१९७२:एकनाथ पाटील-- कवी,लेखक* *१९७०:जितेंद्र अभ्यंकर--- गायक**१९६०:प्राचार्या डॉ.दीपा भारतभूषण क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री, संपादिका**१९५९:बोम्मन ईराणी – अभिनेता**१९५५:शोभा सतीश राऊत-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५१:प्रा.डॉ.निळकंठ लक्ष्मणराव बोरोडे-- लेखक,कवी* *१९४५:मुक्ता मधुकर केचे-- लेखिका* *१९३९:अचला नगर-- साहित्यिक,कथाकार, हिंदी चित्रपट पटकथा लेखक आणि संवाद लेखक**१९३७ : मनोहर जोशी – लोकसभेचे माजी सभापती, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९३०:सुमति पुरुषोत्तम इनामदार-- लेखिका**१९२७:अरविंद गोविंद पटवर्धन-- लेखक**१९१३:दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी–चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(मृत्यू:३० डिसेंबर १९८२)**१९११:अनंत वामन वर्टी--संपादक,लेखक (मृत्यु:२ फेबु्रवारी १९८७)**१९०५:अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार,’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते (मृत्यू:४ मे १९८०)**१८९८:इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (मृत्यू:२२ जुलै १९१८)**१८५५:सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित,समाजसुधारक,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (मृत्यू:१४ मे १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री (जन्म:९ फेब्रुवारी १९२९)**२००४:श्रीमती सुगंधा शेंडे-- विदर्भातील महिला लेखिका (जन्म:२५ जून १९१९)**१९९६:एम.चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री,माजी राज्यपाल (जन्म:१३ जानेवारी १९१९)**१९८०:चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (जन्म:१५ जुलै १९०५)**१९७३:मोरेश्वर प्रभाकर जोशी(आर्वीकर,बाबा महाराज)-- संत,ग्रंथकार,थोर चिंतक,(जन्म:१९२५)**१९०६:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,विज्ञानप्रसारक,लेखक (जन्म:२१ मार्च १८४७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्ट बॉय : काळाची गरज*यापूर्वी देखील बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महायुतीत 'गृह' कलह ! सत्ता वाटप बाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची आज बैठक होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *16 डिसेंबर पासून राज्याची हिवाळी अधिवेशन ? विरोधी पक्ष नेत्या शिवाय पार पडणार अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसंख्या शास्त्रनुसार किमान तीन अपत्ये असावीत, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी भाडेवाढीचा प्रस्ताव सादर, नवीन सरकार घेणार निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात किमान तापमानात वाढ, पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कार्तिक अमावस्या निमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी,आजपासून षडरात्रोत्सवला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात भारताचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - Kunal Paware 📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम ठाणेदार , पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "**संकलन :- Pramila Senkude **ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातील ४१ मजुरांना काढण्यासाठी भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात कोणाला आमंत्रित केले होते ?२) सिंधू नदी कोणत्या दोन देशांतून वाहते ?३) उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात एकूण किती मजूर अडकले होते ?४) कोकणातील मुख्य अन्न कोणते आहे ?५) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ? *उत्तरे :-* १) अरनॉल्ड डिक्स, मायक्रोटनलिंग, ऑस्ट्रेलिया २) भारत व पाकिस्तान ३) ४१ मजूर ४) भात व मासे ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय डाड, नांदेड👤 सुरज पाटिल रोषनगांवकर👤 अभि मामीडवार👤 Vaishali Garjepalve , सहशिक्षिका👤 Shrinivas Avduthwar, धर्माबाद👤 जयानंद मठपती 👤 Suryakant Tokalwad 👤 Sharad Pawar, सहशिक्षक, नाशिक👤 DhanRaj Rakhewar, नांदेड👤 Santoshkumar Rathod 👤 दत्ता मुपडे👤 Komal Sandeep Patil👤 Aditya Dhatrak 👤 शिवराज दासरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा भाकिता जाहला वज्रपाणी। तया कारणें वामनू चक्रपाणी॥ द्विजांकारणे भार्गवू चापपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात. असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत. भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो. जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो. विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते. ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात. आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात. केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© Vyankatesh Katkar , नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मिनूला मोरानी दिलेली भेट* मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली. व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली. बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎤 मुख्य संकलक - स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment