✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/144Rm71GuJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६: नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌐 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: प्रथमेश परब -- मराठी चित्रपट अभिनेता* *१९८७: प्राजक्ता शुक्रे -- भारतीय गायिका**१९८४: नेहा पेंडसे -- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७८: सुरेखा पुणेकर -- भारतीय लावणी नृत्यांगना**१९७७: युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६३: प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी -- लेखक**१९५२: सुनिती मंगल धारवाडकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०: प्रकाश ज्ञानेश्वर जडे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५: खुशाल डवरे -- प्रसिद्ध लेखक**१९४३: अरविंद वैद्य -- लेखक, पत्रकार**१९४२: नीला भागवत -- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८: माला केकतपुरे -- कवयित्री, लेखिका**१९३३: श्रीराम आत्माराम खुणे -- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७: गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू: ७ जून २००० )**१८९६: विनायक लक्ष्मण बर्वे -- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू: २६ जानेवारी १९४८ )**१८६९: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू: २० जानेवारी १९५१ )**१८६२: विष्णू गणेश नेने -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९२४ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे -- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १८८८ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार -- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म: २७ फेब्रुवारी १९३१ )**२०११: इंदिरा गोस्वामी -- आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९४३ )**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म: २४ नोव्हेंबर १९३७ )**२००१: जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३ )**१९९३: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म: २९ जुलै १९०४ )**१९९४: मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार (जन्म: ७ ऑक्टोबर १९२७ )**१९५९: वाजू कोटक -- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म: ३० जानेवारी १९१५ )**१९५९: ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई –महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म: २५ जानेवारी १८६३ )**१९३९: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म: २१ जानेवारी १८९४ )**१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म: ३ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यातील बाकरवडीचे जनक भाऊसाहेब चितळे यांची यशोगाथा..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लाडकी बहीणसाठी 58 हजार कोटी लागणार, सध्या राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज; लोकसत्ताचे संपादक आणि जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी सांगितल्या सरकारच्या आर्थिक अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात थंडीची लाट! पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान! IMD कडून अलर्ट, आणखी थंडी वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ' यू एम बी मिस इंडिया - 2024'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे मालामाल, तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूचा कसोटी सामना 6 डिसेंबर पासून होणार सुरू, रोहित आणि गिल संघात परतणार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *ट्युबलाईटला कमी ऊर्जा का लागते ?* 📒भारनियमन सुरु झाल्यापासुन आणि त्याच सुमारास विजेचे दर वाढल्यावर विजेची बचत करण्याची निकड भासू लागली. सर्वच जण आपल्या नेहमीच्या बल्ब ऐवजी सीएफएलचे दिवे म्हणजे 'काॅम्पॅक्ट फ्लोरेसन्ट लॅम्प' वापरण्याचा सल्ला देऊ लागले. किमानपक्षी साध्या दिव्यांऐवजी ट्युबलाईट वापरावेत असंही सांगु लागले. ट्युबलाईटचा प्रकाशही जास्त मिळतो. सूर्यप्रकाशासारखाच असतो. तितक्याच वॅटच्या दिव्यापेक्षा तो कितीतरी अधिक दिप्तीमान असतो, हा अनुभव तर आपणही घेतो. पण कमी विजेचा वापर करून तो आपल्याला अधिक प्रकाश कसा देऊ शकतो, हा सवाल उरतोच.ट्युबलाईट उपलब्ध होण्यापुर्वी पिवळट प्रकाश देणारे काचेचे बल्बच सगळीकडे वापरले जात असत. त्यांचा शोध एडिसनने लावला होता. त्याला त्यानं 'इनकॅन्डिसन्ट बल्ब' असं दिलं होतं. कारण त्याचा प्रकाश हा त्याच्या आत असलेली तार तापल्यामुळं तिच्यातून बाहेर पडणार्या ऊर्जेच्या रुपात आपल्याला मिळतो. तार तर तापावी, प्रकाशमान होण्याइतकी तापावी; पण त्या उच्च तापमानालाही ती तुटु नये यासाठी टंगस्टन या धातुचा वापर केला जात असे. या धातूची तार कितीही तापली तरी ती तुटत नाही. तिच्यामधुन विजेचा प्रवाह वाहू लागला, की तिचं तापमान वेगानं चढत जातं आणि तिच्यामधुन प्रकाश बाहेर पडू लागतो. अशी तापलेली तार असणार्या त्या काचेच्या बल्बचं तापमानही वाढलेलं असतं. म्हणून तर तो आपल्याला हातात धरवत नाही.ट्युबलाईटपासुन मिळणारा प्रकाश वेगळ्या प्रक्रियेतुन आपल्याला मिळतो. त्या काचेच्या नळीच्या दोन टोकाला दोन विद्युताग्रे - इलेक्ट्रोड्स असतात. त्या दोन टोकांमधुन विजेचे स्फुल्लिंग उडत असतात. वेल्डिंग करताना जशा ठिणग्या उडतात तसे; पण त्या नळीच्या आतल्या पृष्ठभागावर स्फुरदिप्तीमान म्हणजेच फ्लोरोसेंट पदार्थाचा गिलावा दिलेला असतो. त्याशिवाय त्यार पार्याची वाफही असते. दोन टोकांना असलेल्या विद्युताग्रांना चेतवून त्यांच्यामधून स्फुल्लिंग बाहेर पडतील अशी व्यवस्था केली जाते. त्याच्या ठिणग्या पार्याच्या वाफेतून वाहु लागल्या की त्यातून जंबुपार किंवा अतिनील किरणे बाहेर पडू लागतात. ती आपल्याला दिसत नाहीत; पण ती त्या फ्लोरोसेंट पदार्थावर पडली की त्यातून आपल्याला दिसणारा दृश्य प्रकाश निर्माण होतो. विद्युताग्रांमधून विजेचे स्फुल्लिंग बाहेर पडण्यासाठी त्यांना जास्त तापवावं लागत नाही. त्यासाठी फारच कमी विजेची गरज भासते. प्रकाशाची निर्मिती त्यानंतरच्या इतर प्रक्रियांमधून होत असल्याने फारच कमी विजेची गरज भासते. तेवढीच दिप्ती निर्माण करण्यासाठी नेहमीच्या बल्बला लागणाऱ्या विजेपेक्षा कितीतरी कमी वीज लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CRPF - Central Reserve Police Force*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाफ आणि आचार, उच्चार, विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाणीटंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली ?२) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?३) राज्यघटना देशाला अर्पण झाली त्यावेळी राज्यघटनेत किती कलमे, परिशिष्टे व भाग होते ?४) 'लढा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे ? *उत्तरे :-* १) इक्वाडोर २) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष ३) ३९५ कलमे, ८ परिशिष्टे, १२ भाग ४) लढाई, संघर्ष ५) वॉशिंग्टन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोरी चौगुले, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षिका, कोल्हापूर👤 योगेश खवसे👤 साईनाथ बोईनवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥ चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥ सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥ येर्हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाकी वैरता कोणासोबत होत नाही आणि स्वतःहून ते, कोणी करत नाही. नेहमीच सत्याच्या बाजूने राहिल्याने, परखड शब्दात बोलल्याने किंवा तसेच विचार व्यक्त केल्याने न कळताच आपोआप वैरता निर्माण झालेली बघायला मिळत असते. त्यात आपला काहीही दोष नसतो. म्हणून स्वतः ला दोष देऊ नये. जेथून मनाला विशेष समाधान मिळतो त्याच मार्गांवर चालण्याचा आपण प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकोपा*एक तळ्यात एक दोन तोंडाचा पक्षी राहत होता. एकदा त्याच्या तोंडाला रामफळासारखे गोड फळ मिळाले. तेव्हा दुसऱ्या तोंडाला त्याचा हेवा वाटला. त्याने पहिल्या तोंडाकडे अर्धे फळ मागितले. तेव्हा पाहिले तोंड त्याला म्हणाले, "तू खाल्लेस काय आणि मी खाल्ले काय... शेवटी पोट तर एकच ! तेव्हा अर्ध फळ मी आपल्या बायकोला देतो." हे ऐकून दुसऱ्या तोंडाला वाईट वाटले. त्या दिवसापासून ते निराश दिसे.एके दिवशी एक विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले. ते पाहून पहिल्या तोंडाने ते न खाण्याचा सल्ला दिला. पण, मागच्या वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याने ते फळ खाल्ले आणि अखेर व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्षी मरण पावला. *तात्पर्य : एकोप्याने राहण्यातच गोडी असते. त्यात बेबनाव होऊ देऊ नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment