✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/11/election-voting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ३२३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.**१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.**१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.**१९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.**१९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म**१९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.**१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.**१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: रोहित राऊत -- मराठी गायक**१९८४: डायना मरिअम कुरियन (नयनतारा) -- भारतीय अभिनेत्री**१९८२: समाधान रावसाहेब दहिवाळ -- कवी, लेखक**१९८२: नेहा भसीन -- भारतीय गायिका आणि गीतकार**१९६४: स्मिता धनराज बांगडे -- कवयित्री**१९६०: प्रतिमा प्रदीप दुरुगकर -- लेखिका* *१९५४: रंजन गोगोई -- माजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश* *१९५३: रवींद्र गजानन आवटी -- प्रसिद्ध लेखक तथा गीतकार**१९५३: विनोद दिनकर देशमुख -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार* *१९५३: वर्षा विजय देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख**१९४१: आनंद अंतरकर -- मराठी लेखक आणि आणि संपादक (मृत्यू: २८ ऑगस्ट २०२१ )**१९४०: कृष्णाजी लक्ष्मण देशपांडे -- बालकथाकार* *१९३८: कुमुदिनी मोतिराम पावडे -- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: ३१ मे २०२३ )**१९३७: अरविंद मुळगांवकर -- महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २०१८ )**१९३४: तुळशीदास बोरकर -- भारतीय संगीतकार आणि हार्मोनियम वादक ( मृत्यू: २९ सप्टेंबर २०१८ )**१९३१: रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट -- लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:२ जुलै २०१२ )**१९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी,पत्रकार व समीक्षक,राज्यसभा सदस्य (मृत्यू: २५ मे १९८६ )**१९२५: मधुकर गोपाळ पाठक -- संवादलेखक (मृत्यु: २० मे २०११ )**१९२०: विमला आत्माराम जोशी -- लेखिका**१९१९: दत्तात्रेय सखाराम हर्षे -- लेखक**१९१६: मोरेश्वर राघव उपाख्य मोरुभाऊ मुंजे -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य प्रचारक (मृत्यू: ८ डिसेंबर २००७ )* *१९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५ )**१९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९० )**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार (मृत्यु: १२ मार्च १९६० )**१८८४: शंकर पुरुषोत्तम आघारकर -- भारतीय रूपशास्त्रज्ञ (मृत्यू: १ सप्टेंबर १९६० )* 🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मृदुला सिन्हा -- भारतीय लेखिका आणि गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल (जन्म: २७ नोव्हेंबर १९४२ )**२०१६: डॉ. डेंटन कुली -- हृदयरोपन शस्त्रक्रियाचे पाया घालणारे (जन्म: २२ ऑगस्ट १९२० )**२००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७ )**२००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक.(जन्म: १९१९ )**१९९९: डॉ. सुमन वैद्य -- इतिहास विषयाचे संशोधक व लेखिका (जन्म: ६ ऑगस्ट १९२४ )**१९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,आर्थिक, शैक्षणिक,वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक* *१९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: १९०७ )* *१९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: १९१८)* *१९७१: चांगदेव भवानराव खैरमोडे -- मराठी चरित्रकार, लेखक,अनुवादक आणि कवी (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५ )**१७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वत्रिक निवडणूक आणि मतदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपाचे नेते अनिल झा आप मध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळी सुट्यानंतर आजपासून द्वितीय सत्रातील शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बदलापूरहुन 25 पर्यटकांना घेऊन तोरणा किल्याकडे निघालेली बस 100 फुट खोल दरीत कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, 20 नोव्हेंबरला होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पर्थच्या कसोटीत दुखापतीमुळे शुभमन गिल बाहेर तर के एल राहुल ला संधी मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फुप्फुसे* 📙 ****************डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CID – Crime Investigation Department*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा 'बुकर पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?२) ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांच्या कोणत्या कादंबरीला २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे ?३) VVPAT चा फुल फार्म काय आहे ?४) 'यान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) थादाऊ जमात कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) सामंथा हार्वे, ब्रिटिश लेखिका २) ऑर्बिटल ( अंतराळातील आयुष्य सांगणारी ) ३) व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल ४) अंतराळवाहन ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरविंद काळे, सहशिक्षक, पीपल्स हायस्कुल, नांदेड👤 अभिषेक बोधने👤 अनुराधा टल्लू👤 पिराजी भूमन्ना*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये.बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment