✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18McZArTT8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बहुउपयोगी " सुखोई ३० " लढाऊ विमान हवाई दलात दाखल* *२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५: पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०: मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१: पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: यामी गौतम -- हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांची अभिनेत्री**१९८६: प्रतीक बब्बर -- भारतीय अभिनेता* *१९७८: मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. प्रेमा लेकुरवाळे -- लेखिका, कवयित्री* *१९६७: डॉ. धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५: प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख -- लेखक* *१९५९: विश्वास महिपती पाटील -- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८: चंद्रलेखा प्रमोदकुमार जगताप - बेलसरे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५५: प्रा. अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१: डॉ.शुभदा दीपक शेळके -- लेखिका* *१९५०: गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४६: सीमंतिनी जोशी -- कवयित्री**१९४४: मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२० )**१९४०: रमेश महिपतराम दवे -- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८: मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३० ऑगस्ट २०१५ )**१९३७: प्रतिभा कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: ११ जून २०२४ )**१९३६: संभाजीराव सखाराम पाटणे -- प्रसिद्ध लेखक* *१९२७: प्रमोद करण सेठी -- भारतीय ऑर्थोपेडिकसर्जन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ( मृत्यू: ६ जानेवारी २००८ )**१८७२: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू: ५ मे १९४३ )**१८५७: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६ )**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी (जन्म: १ नोव्हेंबर १९२१ )**२००३: शंकर पांडुरंग रामाणी -- आधुनिक मराठी कवी (जन्म: २६ जून १९२२ )**२००१: अनंत काणे -- निर्माता दिग्दर्शक ( जन्म: २८ जून १९३५ )**१९९९: हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म: १९१३ )**१९८०: बिरेंद्रनाथज्ञ(बी. एन. सरकार ) सिरकार -- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९०१ )**१९७८: लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर) -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५ )**१९६८: एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म: ११ ऑगस्ट १८९७ )**१९६७: पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८० )**१९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म: २५ मे १८९५ )**१९६२: कृष्ण चंद्र तथा ’के. सी. ’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म: ऑगस्ट १८९३ )**१९५४: एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २९ सप्टेंबर १९०१ )**१८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: २३ जानेवारी १८१४ )**_१८९०: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक, क्रांतिकारक (जन्म: ११ एप्रिल १८२७ )_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोर गरिबांचे कैवारी : महात्मा फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्याची मोहीम - नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विरोधकांच्या गदरोळामुळे दुसऱ्या दिवशी ही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला, जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रात भरणार हुडहुडी:तापमानात होणार तीव्र घट, हवामान विभागाकडून थंडीच्या लाटेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य बँकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC क्रमवारीत जसप्रीत बुमराह नंबर वन तर यशस्वीची देखील क्रमवारीत गरुडझेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••#चिखलदराचिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BPL - Below Poverty Line *••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारताच्या राज्यघटना निर्मितीला किती वर्ष पूर्ण होत आहेत ?२) अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कोणते ?३) विदेशात एका देशात सर्वाधिक १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?४) 'रंक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? *उत्तरे :-* १) ७५ वर्षे २) कॅलिफोर्निया ३) विराट कोहली, भारत ( १२ शतके ऑस्ट्रेलियात ) ४) गरीब ५) २ फेब्रुवारी २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी, नागपूरर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥ ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥ त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥ केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥ नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या दैनंदिन जीवनात लहान, मोठ्या अडचणी असतात. पण,काहींच्या अडचणी दिसत नाही. व त्यातच कोणी आपल्या अडचणी कोणासमोर व्यक्त करत नाही. कारण समोरची व्यक्ती, त्या सांगितलेल्या अडचणी समजून घेईलच असेही नाही. म्हणून कोणाविषयी पूर्ण जाणून न घेता उगाचच बोलून वाईट होऊ नये. किंवा उगाचच कोणाला वाईट ठरवू नये. शेवटी ज्याचे त्यालाच माहीत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वभाव आणि छंद *' समानशीले व्यसनेषु सख्यम् ' हे सुभाषित आपण वारंवार ऐकतो आणि त्याचे प्रत्यंतर समाजात वावरताना आपणाला येते. याच सुभाषिताचा दाखला देणारी ही कथा. एका साध्या संवादातून हा बोध आपणाला मिळेल. एकदा प्रचंड महापुरात नदीच्या पात्रातून दोन भांडी वाहत होती. त्यापैकी एक होते पितळेचे, तर दुसरे होते मातीचे. त्या पुरातुन वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते, "अरे, इतका दुरून का चालला आहेस? ये ना माझ्याजवळ. दोघेजण हातात हात घालून जाऊ. कशी मजा येईल बघ तरी. मला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल." मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, "कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला, तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव भिन्न आहे."*तात्पर्य : भिन्न स्वभावाचे, छंदाचे लोक एकत्र कसे येणार ?*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment