✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15D4LkUCGK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ३२७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_ 🧿••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.**२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.**१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू**१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन**१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा**१९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.**१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: वैशाली किशोर भोयर -- कवयित्री**१९८०: पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड -- कवी, लेखक**१९७४: गीतांजली गणपतराव कमळकर -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७३: अर्चना मोहनकर -- लेखिका, कवयित्री**१९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट माजी कर्णधार**१९६८: संदिप वसंत देशपांडे -- कवी, लेखक**१९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉन टेनिसपटू**१९५५: देवदत्त दामोदर साने -- कवी, लेखक, समीक्षक**१९५२: अजित बलवंत मुगदूम -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक**१९४८: सरोज खान -- हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका (मृत्यू: ३ जुलै २०२० )**१९४७: सुलभा अमृत चौधरी -- कवयित्री, लेखिका* *१९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय संरक्षण मंत्री (मृत्यू: १० ऑक्टोबर २०२२ )**१९१९: त्र्यंबक विनायक सरदेशमुख -- मराठी कादंबरीकार,समीक्षक आणि कवी (मृत्यू: १२ डिसेंबर २००५ )**१९१७: वामन महादेव कुलकर्णी -- सौंदर्यशास्त्र अभ्यासक, समीक्षक (मृत्यू: २६ डिसेंबर २००९ )**१९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८० )**१९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी१९८८ )**१९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत,समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८ )**१९०३: दामोदर नरहर शिखरे --पत्रकार, चरित्रकार, कादंबरीकार(मृत्यू: ९ सप्टेंबर १९८० )**१८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१ )**१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ,संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाड:मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६ )**१८७१: लक्ष्मण विनायक परळकर -- संत वाड्:मयाचे अभ्यासक, अनुवादक, चरित्रकार (मृत्यू: ७ मे १९५१ )**१८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: नीळकंठ ऊर्फ निळूभाऊ खाडिलकर -- अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे,दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक (जन्म: ६ एप्रिल १९३४ )**२०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६ )**२००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९ )**२०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२ )**१९९०: ह. ह. अग्निहोत्री -- कोशकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक,समीक्षक(जन्म: ३ जुलै १९०२ )**१९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका,संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३ )**१९७९: शीलवती श्रीधर केतकर -- अनुवादक (जन्म: १८८७ )**१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७ )**१९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४ )**१९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट,दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७ )**१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७ )**१९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाल्यांचा विकास साधताना .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी, बारावी 11 फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड परिक्षेत्रात एक महिन्यात तब्बल 16 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 9 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, मतमोजणीसाठीही मोठा पोलिस बंदोबस्त राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप ची पहिली यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकास दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रसारभरती OTT मंचाचा गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दीक पांड्या वर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 शिलाखंड 📙 दगड गोट्यांकडे सहसा लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. पण ज्यावेळी एखादा माणूस रमतगमत एखाद्या डोंगरावर फिरायला जातो, त्यावेळी त्याचे लक्ष आसपासच्या विस्तीर्ण शिलाखंडांकडे नक्कीच जाते. दगडांकडे एरवी दुर्लक्ष करणारा जेव्हा घरातील बांधणी व सजावटीचा विचार करू लागतो, तेव्हा तर प्रत्येक दगडाचा प्रकार त्याच्या हातातून व नजरेतून चौकसपणे जाऊ लागतो. पण तरीही हे शिलाखंड आहेत, याची पुरेशी जाणीव मनाला झालेली नसते.शनिवारवाडा व त्याची दगडी भिंत, राजस्थानातील किल्ले व त्यांच्या लाल दगडी भिंती, कोकणातील जांभ्या दगडाची देवळे, ताजमहालचा संगमरवरी दगड, शहाबादची फरशी ही सारी शिलाखंडांचीच विविध रूपे आहेत. इतकेच काय, 'गमभन' ज्यावर लिहिले जाते, ती पाटीसुद्धा एक प्रकारचा दगडच असतो.निसर्गामध्ये दगड मुख्यतः तीन प्रकारांत तयार होतात. ज्वालामुखीचा रस, तप्त लाव्हा, पृथ्वीअंतर्गत उष्णता यांतून निर्माण होणारे शिलाखंड हे अत्यंत कठीण शिळांचे स्वरूप असते. आपल्याला ठिकठिकाणी आढळणारे साधे तपकिरी, काळे, भुरकट दगड हे बेसाल्टचे असतात. शोभिवंत दगडांचे प्रकार म्हणजे ग्रॅनाइटचे. लाव्हा पृष्ठभागावर येऊन थंडा होतो, त्यातून बेसाल्टचा दगड निर्माण होतो. ग्रॅनाइट मात्र जमिनीतच घट्ट झालेला असतो. त्यामुळे क्वार्ट्झचे कणकण त्यात घट्ट होऊन त्याची नैसर्गिक शोभा वाढते. त्यांच्या रंगात अनेक प्रकार आढळतात.दुसऱ्या प्रकारात नदीच्या मुखाशी जमलेली गाळाची माती, वाळू, चुनखडी तिथेच किंवा समुद्राच्या तळाशी साचत जाते. वर्षानुवर्षे त्यावरचे वजन वाढत जाते व पाण्याचा अंश कमी होत जातो. क्वचित त्यावरील पाणीच दूरवर सरकते म्हणजे नदीचा प्रवाह बदलतो. कित्येक वर्षांनी हे कण एकत्रित घट्ट होतात व त्यांचेच दगड बनत जातात. बांधकामात खनिज दगड वापरतात, तो या प्रकारचा असतो. त्याला छिन्नीने तास पाडले जातात. या प्रकारच्या दगडाच्या खाणी ठिकठिकाणी आढळतात.तिसऱ्या प्रकारचे दगड हे साधारणपणे पृथ्वीअंतर्गत उष्णतेने रूपांतरित झालेले दगड असतात. पृथ्वीच्या पोटातील असंख्य खनिजे उष्णतेने विरघळतात. त्यातील जड भाग खाली राहतो. नको असलेला हलका भाग पोकळ बुडबुडय़ांच्या स्वरूपात वर राहतो. काही वेळा खनिजे एकमेकात मिसळली जातात. त्यातून विविध रंगांची मिश्रणेही तयार होत जातात. पण या निर्मितीतील मूळ महत्त्वाचा भाग असतो तो वाळू, चुनखडीचाच. संगमरवर, फरशी, कडप्पा या प्रकारांतील दगड थरांच्या स्वरूपात एखाद्या विवक्षित ठिकाणीच सापडतात. मूळ थर हळूहळू गाडले जाऊन त्यावर पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचा परिणाम होऊन ते एकजीव होऊन ही निर्मिती होत गेलेली असते.दगड कोणताही असो, त्याला आकार द्या वा तसाच ठेवा, त्याला पॉलिश करून चकाकी आणा किंवा उन्हापावसाने अधिकच रापू द्या, पाषाणाचे एक वेगळेच सौंदर्य असते. अखंड शिलाखंडात कोरीव काम करून शिल्पाकृती उभा करण्याचा अट्टाहास व ध्यास घेऊन त्यासाठी आयुष्य वेचणारेही कलाकार आहेत.वेरुळची शिल्पे, श्रावणबेळगोळचा गोमटेश्वरांचा पुतळा ही साध्या काळ्या कुळकुळीत अखंड शिलाखंडांतूनच बनली आहेत; पण त्यांचे देखणेपण साऱ्या जगाला आकर्षून घेते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*DP – Display Picture*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोमिनिका या देशाच्या कोणत्या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले जाणार आहे ?२) डोमिनिका हा देश कोणत्या खंडात आहे ?३) डोमिनिका देशाची राजधानी कोणती ?४) डोमिनिका हा देश केव्हा स्वतंत्र झाला ?५) डोमिनिका या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर २) उत्तर अमेरिका ३) Roseau ( रोसेयू ) ४) ३ नोव्हेंबर १९७८ ५) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पांडुरंग पुठेवाड, संपादक, देगलूर👤 अरुण पवार, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 विकास चव्हाण👤 श्रीकृष्ण निहाळ👤 साईप्रसाद यनगंदलवार, सेवानिवृत्त शिक्षक👤 मधू कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस दिसायला जरी रंग आणि रूपाने वेगळा असेल तरी शेवटी तो, माणूसच असतो. म्हणून कोणत्याही माणसाचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल, टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण ज्या माणसासोबत आपण त्या प्रकारची वागणूक ठेवून जगत असतो. त्याच वागणुकीमुळे कुठेतरी आपलाही अपमान होत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*निर्णय क्षमता*अर्थशास्त्रात एक कथा सांगितली जाते. बुर्बेन्स नावाच्या गृहस्थांचे एक गाढव होते. त्यांचे एक भले मोठे शेत होते. दोन्ही बाजुंना भरपूर गवत असणारी एक पायवाट त्या शेतातून बाहेर पडत होती. सारे कसे सुखात चालले होते. एकदा हा बुर्बेन्स काही कामानिमित्त महिनाभर परगावी जाणार होता. त्याने विचार केला की, गाढवाच्या खाण्याची व्यवस्था करण्याची गरज काय ? गड्याने जरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते गाढव रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत खाऊन सहज जगेल. बुर्बेन्स गावी गेला. महिनाभरानंतर परतला. पाहतो तर काय ? गाढव मरून पडलेले होते. असे कसे झाले ? याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एवढे गवत असताना ते गाढव उपाशीपोटी का राहिला असावे ? त्याला कळेना. झाले होते असे, की गाढवाचा निश्चय होत नव्हता, की कोणत्या बाजूचे गवत प्रथम खावे ? या बाजूचे की त्या बाजूचे ? असे करता करता गाढवाने कुठलेच गवत खाल्ले नाही आणि त्याचा भूकबळी पडला! *तात्पर्य : निर्णय क्षमतेअभावी नुकसान ठरलेले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment