✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCxuVmV4N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ३३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️ •••••••••••••••••••••••••••••••••*२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा 'राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर**१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५: सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.*⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: रोशेल राव -- माॅडेल व अभिनेत्री**१९८३: संध्या ललितकुमार भोळे -- कवयित्री**१९८३: झुलन गोस्वामी -- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू* *१९८१: संदीप विकास गुजराती -- कवी* *१९७८: राखी सावंत -- भारतीय अभिनेत्री**१९७७: गिरीश पांडुरंग कुलकर्णी -- भारतीय अभिनेता, लेखक आणि निर्माता**१९६९: जोस्ना दिलीप पाटील -- लेखिका**१९६६: रूपा गांगुली -- भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका* *१९६६: सीताराम जगन्नाथ सावंत -- प्रसिद्ध लेखक**१९६३: विजया ज्ञानेश्वर भांगे -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रवीण श्रीराम देशमुख -- कवी, लेखक**१९५४: नीता सतीश शाह -- कवयित्री* *१९५०: सुधीर गाडगीळ -- प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार* *१९५०: नत्थू सीताराम खंडाईत -- लेखक* *१९५०: प्रा. ज्योती बाबुराव लांजेवार -- मराठी लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि विचारवंत (मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१३ )**१९३९: दिनकर गांगल -- लेखक, संपादक, पत्रकार* *१९३८: फकरुद्दीन हजरत बेन्नूर -- मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०१८ )**१९३७: डॉ.अशोक दामोदर रानडे -- भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, गायक, समीक्षक आणि लेखक (मृत्यू: ३० जुलै २०११ )**१९२९: सुरिंदर कौर -- भारतीय गायिका आणि गीतकार (मृत्यू: १४ जून २००६ )**१९२९: डॉ.गणेश मुकुंद नाशिककर -- कवी, लेखक* *१९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२ )**१९२१: भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर -- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार ( मृत्यू: ११ ऑगस्ट, २०१५ )**१९०५: खंडेराव सावळाराम दौंडकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १० जानेवारी १९६० )**१८९८: देबकीकुमार बोस -- भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९७१ )**१८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८ )**१८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६ )*⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दिएगो अरमांडो मॅराडोना -- अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू (जन्म: ३० ऑक्टोबर१९६० )**२०१४: सितारा देवी -- शास्त्रीय कथ्थक शैलीतील नृत्यांगना,गायिका आणि अभिनेत्री(जन्म: ८ नोव्हेंबर १९२० )**२०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये (जन्म: ५ सप्टेंबर १९२० )**१९९८: परमेश्वर नारायण तथा पी.एन.हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी,पंतप्रधानांचे मुख्य सचिव,योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ )**१९९७: जवाहरलाल अमोलकचंद दर्डा -- भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (जन्म: २ जुलै १९२३ )**१९८८: माधव वासुदेव पटवर्धन -- प्राध्यापक, समीक्षक,अभ्यासक, अनुवादक(जन्म: १ जानेवारी १९०६ )**१९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३ )**१९७४: यू.थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९ )**१९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(जन्म: ६ जानेवारी १८६८ )**१९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८ )**१९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक,भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ )**१८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्नाची नासाडी टाळू या ......!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15व्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर, स्पष्ट बहुमत असल्याने घाई न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे, निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही, ईव्हीएमबाबत माहिती घेऊन बोलेन, निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, सांगोलाच्या शेकापच्या युवा आमदाराचा स्तुत्य उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *27 कोटी विषय क्लोज ! अवघ्या 10 मिनटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम, आयपीएलच्या लिलावात इतिहासामधील ठरला सर्वात महागडा खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज ! 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *सर्दी झाल्यावर अन्न बेचव का लागते ?* 📒अन्नाची चव आपण जिभेनं चाखतो असं म्हणतो; पण ते संपुर्ण खरे नाही. जिभेवर केवळ चार प्रकारच्या स्वादांना प्रतिसाद देणारे स्वादांकुर असतात. गोड, खारट, आंबट आणि तुरट. बाकी सगळ्या चवी या चार आणि वासाबी या नावानं ओळखल्या जाणार्या पाचव्या प्रकारच्या स्वादांकुरांच्या वेगवेगळ्या प्रकारे साथ देण्याच्या प्रक्रियांमधुन आपल्याला समजतात. या स्वादांकुराशी पदार्थांमधील स्वादरेणुंचा संबंध आला की त्यातुन उठणारे विद्युत रासायनिक तरंग मज्जातंतुकडुन मेंदुतील स्वादकेंद्राकडे पाठवले जातात. त्या तरंगांबरोबरच आपल्या घ्राणेंद्रियांकडुन येणारे अन्नाच्या गंधांचे आणि डोळ्यांकडुन येणार्या अन्नाच्या रंगांचे, आकारांचे तरंग मेंदुला येऊन भिडतात. या सर्वांचं तिथं. विश्लेषण होऊन त्यातुन मग त्या पदार्थाच्या खर्याखुर्या चवीची ओळख आपल्याला पटते. अर्थात या सार्या प्रक्रिया इतक्या वेगानं होतात की हे सारं सव्यापसव्य होत असल्याची जाणीवही आपल्याला होत नाही.तरीही यावरुन हे मात्र ध्यानात येईल की केवळ जीभ जे चाखते त्यावरुनच आपल्याला अन्नाची चव कळत नाही. त्यात डोळ्यांना दिसणार्या त्या अन्नाच्या स्वरुपाचा आणि नाकानं जोखलेल्या त्याच्या गंधाचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो.आंब्याचा रंग काळाकुट्ट आणि त्याचा आकार दगडासारखा ओबडधोबड असता, त्याचा गंध आपल्याला नाक मुठीत धरायला प्रवृत्त करणार्यांच्या जातकुळीतला असता तर आंबा आपल्याला तितकाच चविष्ट लागला असता की काय या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या चवीतल्या जिभेखेरीज इतर इंद्रियांच्या सहभागाचं आकलन होईल.तेव्हा कोणत्याही अन्नाची चव घेण्यासाठी जिभेबरोबरच आपली नजर आणि घ्राणेंद्रिये तितकीच जागृत असायला हवीत. जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपलं नाक चोंदतं. म्हणजेच नाकाद्वारे हवा आत शिरायला त्रास होतो. त्याचमुळे आपण अशावेळी तोंड उघडुन श्वासोच्छवास करत असतो. नाकावाटे हवा आत शिरत नसल्यामुळे त्या अन्नाचा सुटलेला दरवळ हवेतुन आपण आत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या गंधांच्या रेणुशी ज्यांचं संघटन जुळायचं त्या नाकातल्या ग्रहणकेंद्रांशी आवश्यक ती प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे चव जोखण्यात असलेली आपली भुमिका नाक बजावु शकत नाही. साहजिकच चवीची ओळख पटवुन देण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे मग ते अन्न बेचव असल्याची भावना होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CPU: Central Processing Unit*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील ५६ वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाणार आहे ?२) महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या ?३) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० शतके झळकवणारा संघ कोणता ?४) नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर'ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले ?५) VVPAT या यंत्राचा वापर कोणत्या साली प्रथम करण्यात आला ? *उत्तरे :-* १) छत्तीसगड २) महायुती, २३६ जागा ( भाजप - १३२ जागा ) ३) भारत ( २३ शतके ) ४) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) सन २०१३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी, जि. प. नांदेड👤 महेश मुधोळकर👤 नरसिंग एनद्गलवार, शिक्षक नेते, किनवट👤 शिवाजी पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥ या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥ नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिथी धर्म*शिवराज एका चोराचा पाठलाग करत होता. गावाच्या बोलबोळांतून पळणारा चोर अखेर शिवराजच्या नजरे आड झाला. तो चोर एका घरात घुसला होता. त्या घरातील माणसाने त्या गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला. त्या घरात घुसलेल्या चोराला आतल्या खोलीत लपविले. इतक्यात पाठलाग करणारा शिवराज तिथे आला. त्याने पळणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे चोराचे वर्णन करून 'असा मनुष्य इथे आला होता का? त्याला आपण पाहिलेत का' असे विचारले. गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो कुटुंबप्रमुख खोटे बोलला व असा माणूस पाहिला नसल्याचे सांगितले. पण, त्या गृहस्थाच्या मुलाने मात्र शिवराजकडे पाहून आतल्या खोलीकडे खून केली. शिवराज काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत घुसून त्या चोराला पकडले व तो त्या चोराला घेऊन गेला. त्या गृहस्थाला मुलाचा राग आला. कारण, त्याच्या मुलाने गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे म्हणणे बरोबर होते.*तात्पर्य :* सत्याचा अर्थ, महत्व परिस्थितीनुसार बदलत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment