✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19o9cAc1fY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ३४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोपडा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.**१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०: ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रा. डॉ. नंदकुमार विष्णू मोरे -- लेखक**१९७३: मेघना गुलजार-- भारतीय लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माती**१९७०: विजया पाटील -- कवयित्री**१९६६: डॉ. अनिल तानाजी सपकाळ -- मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक**१९६५: माधुरी साकुळकर -- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६४: रजनी निकाळजे-- कवयित्री, लेखिका**१९६०: दग्गुबाती वेंकटेश -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९५८: हेमंत दत्तात्रेय सावंत -- लेखक* *१९५७: डॉ.विद्यासागर जनार्दन पाटंगणकर -- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध लेखक* *१९५६: अंजली आमोणकर -- मराठी ,हिंदी, कोकणी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५६: प्रभाकर दुपारे -- आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक, नाटककार, जेष्ठ पत्रकार**१९५६: अजित श्रीकृष्ण अभ्यंकर -- कामगार नेते, प्रसिद्ध लेखक* *१९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ मार्च २०१९ )**१९४९: सुप्रिया मधुकर अत्रे -- लेखिका**१९४७: विद्युत रवींद्र भागवत -- ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या (मृत्यू: ११ जुलै २०२४)**१९४५: अस्मिता इनामदार -- कवयित्री**१९४२: रमाकांत यशवंत देशपांडे -- खगोल अभ्यासक, लेखक, कवी* *१९४०: शरद केशव साठे -- मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: १ ऑक्टोबर २०१५)**१९३२: डॉ.निला जोशीराव -- लेखिका* *१९३०: मधुसूदन कृष्णाची आगाशे -- लेखक* *१९२८: धनश्री हळबे -- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९२८: सरिता मंगेश पदकी -- प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (मृत्यु: ३ जानेवारी २०१५ )**१९२६: प्रमिला मदन भागवत -- कवयित्री, लेखिका (मृत्यू: २९ नोव्हेंबर २०१३ )**१९२४: डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक -- प्रसिद्ध कथाकार, नाटककार, समीक्षक (मृत्यु: ९ ऑक्टोबर १९८९ )**१९२४: मंगला दि.साठे -- लेखिका* *१९२३: रामभाऊ जोशी -- जेष्ठ पत्रकार, लेखक* *१९२०: प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित-- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, मराठी लेखक (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१३ )* *१९०२: इलचंद्र जोशी-- प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार (मृत्यू: १९८२ )**१८९९: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ )**१८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ,मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली,इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७ )**१७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १८४९ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: संतोष चोरडिया -- एकपात्री कलाकार( जन्म: २२ ऑगस्ट १९६६)**२०१२: मोरेश्वर दिनकर पराडकर -- प्रकांड पंडित, अभ्यासक, संशोधक(जन्म: १७ नोव्हेंबर १९२५ )**१९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार**१९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक(जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ )**१९८६: स्मिता पाटील – प्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५ )**१९६१: अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.(जन्म: १८६०)**१९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९ )**१७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*निवडणूक कर्मचारीच मतदानापासून वंचित*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी लवकरच योजना आणणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *RBI चा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *MPSCची जाहिरात वेळेत नाही, वय वाढल्याने विद्यार्थी बाद, शासनाने परीक्षांची वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभय योजनेचा 31 तारखेपर्यंत लाभ घेण्याची संधी, 10 लाख 24 हजार वीज ग्राहकांकडे सुमारे 1,871 कोटी 51 लाखाची थकबाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे पुस्तक महोत्सव मध्ये दहा हजार पुस्तकांते प्रदर्शन, सरस्वती चित्र निर्माण करत विश्वविक्रम होणारं - राजेश पांडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा', चीनच्या खेळाडूला 'चेक मेट'; विश्वनाथ आनंदनंतर दुसरा विश्वविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙 अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे. या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BHM - Bachelor of Hotel Management*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे.तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. --- केशव नाईक*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सात आश्चर्यापैकी कोणते एक आश्चर्य भारतात आहे ?२) ईश्वरोपासनेबरोबरच बलोपासनेला महत्त्व देणारा संत कोणता ?३) भारताने दुसरी अणुस्फोट चाचणी कोठे व केव्हा केली ?४) 'विद्रूप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती व हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले ? *उत्तरे :-* १) ताजमहाल २) स्वामी रामदास ३) पोखरण ( ११ मे १९९८ ) ४) कुरूप ५) अमरावती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, शिक्षक, बिलोली👤 शरद नवले, शिक्षक, लातूर👤 राजेश पाटील👤 उज्वल म्हस्के, औरंगाबाद👤 राजेश वाघ, माध्यमिक शिक्षक, बुलढाणा👤 शेख समीर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पतरुतळीं बैसलिया । कल्पिलें फळ न पविजे ॥१॥ कामधेनु जरी दुभती । तरी उपावासीं कां मरावें ॥२॥ उगे असा उगे असा । होणार तें होय जाणार तें जाय ॥३॥ नामा म्हणे केशवा काय तुझी भीड । संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांसोबत संवाद साधणे चांगलेच असते. संवाद साधल्याने मनात असलेला ताणतणाव दूर होत असतो व मोकळेपणा वाटत असतो. पण कधी कधी स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून बघावा. बरेचदा स्वतःशी संवाद साधल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जे असेल त्यात समाधानी असावे*एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसऱ्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment