✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1YqhDdgy5N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_जागतिक मानवी हक्क दिवस_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ३४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.**२००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.**१९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.**१९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.**१८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.* ♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: जितेंद्र परशराम कुवंर -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा तहसीलदार**१९७३: सुनील मंगेश जाधव -- कथाकार, कवी**१९७२: रेणुका पुरुषोत्तम बुधाराम -- कवयित्री, लेखिका* *१९७०: आलियागोहर जाकीर शेख -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रा. डॉ. अशोक पवार -- प्रसिद्ध लेखक, विचारवंत**१९६७:दासू वैद्य -- प्रसिद्ध कवी व लेखक**१९६६: अॅड. धर्मेंद्र चव्हाण -- लेखक, पत्रकार**१९६२: प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: डॉ. मनोहर जगन्नाथ जाधव -- प्रसिद्ध कवी, समीक्षक,संपादक* *१९६०: रती अग्निहोत्री -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९५९: चंद्रकांत ज्ञानेश्वर धस -- प्रसिद्ध कवी, गझलकार तथा निवृत्त भारतीय संरक्षण खात्याचे जेष्ठ अधिकारी**१९५३: अभिमन्यू इंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५२: अशोक महादेव वाडकर -- कवी, लेखक**१९५२: वसंत वाहोकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४०: दत्तात्रेय सैतवडेकर -- प्रसिद्ध कथाकार, कवी**१९३६: पुष्पा वसंत काणे -- कादंबरी,नाटके, कथा, कविता, तसेच साहित्यविषयक अन्य लेख हे सर्व साहित्यप्रकार यशस्वीरीत्या हाताळले (मृत्यू: १३ जानेवारी २०१३ )**१९३८: सखाराम कलाल (सखा कलाल) -- १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते (मृत्यू: १३ डिसेंबर २०१९ )**१९२६: डॉ.शकुंतला खोत -- कादंबरी,कथालेखिका (मृत्यू: ७ मे२००८ )* *१८९४: परशुराम महादेव लिमये -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९६१ )**१८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७ )**१८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(मृत्यू: ८ जानेवारी १९६७ )**१८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल,मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२ )**१८७०: सर जदुनाथ सरकार – आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध इतिहासकार व संशोधक (मृत्यू: १९ मे १९५८ )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सुलोचना महादेव कदम -- सुलोचना चव्हाण या नावाने ओळखल्या जातात, भारतीय गायिका होत्या ज्या मराठीतील तिच्या लावणींसाठी प्रसिद्ध होत्या (जन्म: १३ मार्च १९३३ )*.*२००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८ )**२००४: देवीसिंग व्यंकटसिंग चौहान -- ऋग्वेदाचे भाष्यकार,भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी.(जन्म: २ मार्च १९११ )**२००४: होमी वाडिया -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २२ मे १९११ )**२००३: श्रीकांत ठाकरे -- चित्रकार,लेखक, संगीतकार (जन्म: २७ जून १९३० )**२००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते,पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९),५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ ऑक्टोबर १९११ )**१९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५ )**१९६३: सरदार कोवालम माधव तथा के.एम. पणीक्कर – भारताचे चीन,इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५ )**१९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४ )**१९२०: होरॅस डॉज – 'डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८ )**१८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महायुतीचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यावर अविश्वास ठराव ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ईव्हीएम विरोधात वंचितचा 12 रोजी मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडात आज आक्रोश मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा, संजय मल्होत्रा असणार आरबीआयचे नवे गव्हर्नर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दक्षिण आफ्रिकेने केला श्रीलंकेचा पराभव, WTC मध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकून बनले नंबर-11*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, 20 टक्के मॅच फीचा दंड, ट्रेव्हिस हेड मात्र स्वस्तात सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला पाणी का सुटतं ? 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. त्यांचे काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकत्र वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*GMT - Greenwich Mean Time*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो. --- साने गुरुजी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक ध्यान दिवस'* केव्हा साजरा केला जाणार आहे ?२) २१ डिसेंबर हा 'जागतिक ध्यान दिवस' म्हणून साजरा केला जावा हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात कोणत्या देशाने मांडला ?३) सन १८५७ मध्ये मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले ?४) 'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतीय राज्यघटनेचा मसुदा किती दिवसात लिहून पूर्ण झाला ? *उत्तरे :-* १) २१ डिसेंबर २) लिकटेंस्टिन ३) नाना शंकरशेठ ४) वायू, वात, अनिल, मरुत, पवन, समीर ५) २ वर्ष, ११ महिने व १८ दिवस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. विठ्ठल जम्बले👤 संभाजी धानोरे👤 प्रवीण वाघमारे👤 दत्ताहरी बिमरतवार👤 श्रीकांत मॅकेवार👤 शिवानंद हिंदोळे👤 अनिल यादव👤 दशरथ एम. शिंदे👤 संदीप म्हस्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥ ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥ नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन अशांत असेल तर आपल्या समोर कितीही आकर्षक वस्तू ठेवल्या असतील तरी त्याकडे आपले लक्ष जात नाही. कारण त्यावेळी, त्या वस्तूंचे महत्व सुद्धा शुन्य वाटत असते.पण, एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे मन हे हवेपेक्षा वेगवान असते तो कुठेही घेऊन जात असतो.म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नये. कारण तो होणारा त्रास स्वतःला भोगावा लागतो व पुन्हा एकदा अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *देखावा !*'लबाड बांधतो इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपडी' या ग. दि. माडगूळकरांच्या गीताचा अनुभव आपणाला पदोपदी येत असतो. गुणवत्ता असणाऱ्यांना किंमत नाही आणि अर्धवट ज्ञानी व्यक्ती मोक्याच्या जागेवर, हा आजचा सार्वत्रिक अनुभव ! एक नकलाकार एका गावात प्रयोगासाठी आला होता. त्याच्या कार्यक्रमाची खूपच जाहिरात झाल्याने गर्दीही बऱ्यापैकी होती. अनेक नेत्यांचे, प्राण्यांचे त्याने हुबेहूब आवाज काढले. प्रेक्षक खूष झाले. त्यांनी त्याला डुकराचा आवाज काढण्यास सांगितले. त्याने तो काढलाही. पण त्या गर्दीतील एक गृहस्थ म्हणाला, "ही नक्कल बरोबर साधली नाही." तेव्हा नकलाकाराने त्याला स्टेजवर येऊन डुकराचा आवाज काढून दाखविण्यास सांगितले. त्या गृहस्थाने ते आव्हान स्वीकारले. तो आपल्या पोत्यासह स्टेजवर गेला. त्याने पोत्यात डोके घातले आणि साऱ्या प्रेक्षकांना डुकराचा आवाज आला. पण लोकांनी त्याची कुचेष्टा सुरू केली. तेव्हा त्याने पोत्यातून डुकराचे पिल्लू बाहेर काढले व तो म्हणाला, "या खऱ्या डुकराचा आवाज तुम्हाला पटला नाही आणि याने खोटा आवाज काढला तर त्याचं तुम्हाला कौतुक !"* तात्पर्य : आपणही आज असेच गुवत्तेपेक्षा, दर्जापेक्षा देखाव्याला भुलतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment