✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CepAvsCch/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚛️ *_पेन्शनर्स डे_* ⚛️•••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ३५२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: सरकारी पेन्शन ही भीक नव्हे तर निवृत्तांचा हक्क हा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला**१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन**१९२८: भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.**१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.**१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.**१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: रितेश देशमुख – प्रसिद्ध अभिनेता**१९७२: प्रा. गिरीश प्रभाकरराव काळे -- लेखक* *१९७२: दत्तात्रेय रावसाहेब आंधळे -- लेखक**१९७२: जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल**१९७०: अलका अनिल मोकाशी -- लेखिका**१९६६: डॉ. प्रदीप आवटे -- कवी, लेखक**१९६४: डॉ. शुभा शशांक साठे -- कादंबरीकार, चरित्र लेखिका* *१९६३: डॉ. उषा रामवाणी-गायकवाड -- लेखिका**१९५१: प्रा. अनुया अजित दळवी-- अनुवादक, नाटयप्रेमी* *१९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)**१९४६: हेमा नागपुरकर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९४६: सुरेश ओबेरॉय -- भारतीय अभिनेता**१९४४: शकुंतला भागवत चौधरी -- कवयित्री, लेखिका**१९४१:विजू खोटे- हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते (मृत्यू:३० सप्टेंबर २०१९)**१९३७: मंन्दाकिनी प्रल्हाद भारद्वाज -- लेखिका, संपादिका( मृत्यू: १९ फेब्रुवारी २०१९ )**१९३७: नारायण ज. शेळके -- लेखक* *१९२९: माणिकराव पद्मण्णा मंगुडकर -- चरित्रलेखक,ग्रंथकार(मृत्यू: ९ एप्रिल २०२३ )**१९२४: सखाराम हरी देशपांडे -- मराठी लेखक (मृत्यू: २९ जुलै २०१० )**१९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार,’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२ )**१९२०: इंदिरा गोविंद कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका**१९१६: विष्णू दत्तात्रय साठे -- नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक व समीक्षक (मृत्यू: ५ मार्च १९५४ )**१९१२: दत्तात्रय विष्णू तेंडुलकर (प्रफुलदत्त) -- कवी (मृत्यू: २५ एप्रिल १९८७ )* *१९११: दत्तात्रय धोंडो(डी.डी.)रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक,लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.(मृत्यू:२ सप्टेंबर १९९९ )**१९०८: यशवंत नारायण मोघे -- लेखक**१९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२ )**१९०१: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३ )**१९००: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८ )**१८६९: सखाराम गणेश देउस्कर -- क्रांतिकारी लेखक, इतिहासकार तथा पत्रकार (२३ नोव्हेंबर १९१२ )* *१८४९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष (मृत्यू: १८ ऑक्टोब १९०९)**१७७८: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: श्रीराम लागू-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता(जन्म: १६ नोव्हेंबर १९२७ )**२०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९ )**२०१०: सय्यद अमीन -- मराठी लेखक, मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले.(जन्म: २० ऑक्टोबर १९१५ )**१९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४ )**१९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण,(जन्म: ३० मार्च १९०६ )**१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक,इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते.काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.(जन्म: २४ डिसेंबर १८८० )**१९५६: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं.विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८ )**१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.’प्रवासी’,’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ.पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ )**१९३३: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६ )**१९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१ )**१९०७: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फुकट काही नको रे बाबा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत होणार हिवाळी अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तबला सम्राट झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी केलं दुःख व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *EVM चा मुद्दा उपस्थित करत विरोधकांचे विधानभवनाच्या पायरीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बेस्टसाठी नवीन तेराशे नवीन बस घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काश्मीरमध्ये थंडी पडल्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस टी ला नोव्हेंबर मध्ये 941 कोटी रुपयांची विक्रमी उत्पन्न, प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाश्याची वाहतूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा कसोटीत भारत पराभवाच्या छायेत, 314 धावाने अजूनही मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙************************** प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते.अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'. ते चार टप्पे असे,१. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस*२. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस*३. *होमो इरेक्ट्स*४. *होमो सेपियन्स* अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते. माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी. आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो. मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते.*"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CTET - Central Teacher Eligibility Test*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही संकटाच्या सिंहगडाला , द्रोणागिरीची वाट असते. - रा. ग. गडकरी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *कडवे प्रवचन* हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?२) टाईम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' २०२४ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) कोणत्या देशाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश - एक निवडणूक' या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे ?४) 'विस्तृत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अलीकडे नुकतीच फँकोइस बायरो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे ? *उत्तरे :-* १) तरुणसागर महाराज २) डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका ३) भारत ४) विशाल, विस्तीर्ण ५) फ्रान्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. उषा रामवाणी गायकवाड, मुंबई👤 विक्रम पतंगे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 प्रताप सिंह मोहिते👤 नारायण मुळे👤 डॉ. सुधीर येलमे, संपादक, धर्माबाद👤 दिगंबर बेतीवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥ जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥ नामा म्हणे सत्ता करिती निकत । भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस दिसायला जरी रंग आणि रूपाने वेगळा असेल तरी शेवटी तो, माणूसच असतो. म्हणून कोणत्याही माणसाचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल, टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण ज्या माणसासोबत आपण त्या प्रकारची वागणूक ठेवून जगत असतो. त्याच वागणुकीमुळे कुठेतरी आपलाही अपमान होत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महिलेचा निर्भीडपणा*एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला," जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय" मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले," नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही." हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असता, ती म्हणाली, "तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही. यावरून असे स्पष्ट होते की, तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे." महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला, "मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल." खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले, "माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली" महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले. कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक आहेत, तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment