✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक जल दिवस_* *_जागतिक मुकाभिनय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९:लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१:ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०:हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५:ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७:शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५:अरब लीगची स्थापना**१७३९:नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:आदित्य सील-- भारतीय अभिनेता**१९८१:रणजीत नारायण पवार-- लेखक* *१९७६:विशाखा सुभेदार-- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२:अश्विनी एकबोटे--प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू:२२ ऑक्टोबर, २०१६)**१९५९:सुरेश नावडकर-- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८:देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५१:चारुदत्त लक्ष्मण(सी.एल.) कुलकर्णी-- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार,कवी,लेखक* *१९४९:विलास बाबूराव मुत्तेमवार-- माजी खासदार* *१९४८:लक्ष्मण ढवळू टोपले-- लेखक,कवी* *१९४३:नंदा अनंत सुर्वे- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४:मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू:१७ डिसेंबर १९८५)**१९२४:पंडित अमरनाथ-- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू:९ मार्च १९९६)**१९११:देवीसिंह व्यंकटसिंह चौहान-- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक(मृत्यू:डिसेंबर २००४)**१९०६:भगवंत भिकाजी सामंत-- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७:सदाशिव कृष्ण फडके-- लेखक (मृत्यू:१२ ऑक्टोबर १९७१)**१८५७:शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले-- लेखक (मृत्यू:२१ आक्टोबर १९०४)* *१७९७:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू:९ मार्च १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:गोविंद श्रीपाद तळवलकर-- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म:२२ जुलै १९२५)* *२००७:निसार बज्मी-- संगीतकार(जन्म:१ डिसेंबर १९२४)**२००५:रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म:१७ नोव्हेंबर १९२०)**२००४:बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित,स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म:३ जुलै १९०९)**१९९१:कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)--कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म:२५ जून १९०५)**१९८४:प्रभाकर आत्माराम पाध्ये --संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म:४ जानेवारी १९०९)**१८३२:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म:२८ ऑगस्ट १७४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जल दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जलसाक्षरता : काळाची गरज*मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारत संदर्भातले संदेश त्वरित थांबविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात; सातारा-मुंबई महामार्गावर कारची कंटेनरला धडक; सर्व प्रवासी सुखरूप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले बॅनर काढलेच नाही : हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन प्रमुखांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भावगंधर्वांनी जागवल्या लतादीदींच्या स्वरमयी आठवणी:विभावरी आपटे-जोशी यांना 'दीदी पुरस्कार' देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RBI च्या निर्देशांनुसार 31 मार्च 2024 अर्थात रविवारी देशभरातील सर्व बँका सुरु राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, महेंद्रसिंह धोनीने सोडलं पद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ **************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे.आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार हे भांडवल आहे, उद्योग हा मार्ग आहे आणि मेहनत हाच उपाय आहे.* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा कोण निवडून आले आहेत ?२) सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?३) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?४) शरीराच्या तापमानावर नियंत्रण राखण्याचे कार्य कोणती ग्रंथी करते ?५) भारताचे 'INDIA' हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे ? *उत्तरे :-* १) ब्लादिमिर पुतीन २) विस्तार अधिकारी ( पंचायत ) ३) चंद्रभागा ४) थायरॉईड ग्रंथी ५) INDUS*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सनीदेवल जाधव👤 रमेश कतुरवार, धर्माबाद👤 गणेश मैद👤 शंकर वर्ताळे👤 श्रीमंत ढवळे👤 अमित बडगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती अपमान सहन करून सुद्धा, इतरांना मान, सन्मान, आदर देऊन प्रामाणिकपणे जगत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याला मानसन्मान मागण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून आपण सुद्धा आपला स्वाभिमान कायम ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे. कारण स्वाभिमान, प्रामाणिकपणा ठेवून सत्याच्या वाटेवर चालण्याची एकदा का सवय झाली की, इतर व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 *बोधकथा - संगत* 🚩आईनस्टाईन के ड्राइवर ने एक बार आइंस्टीन से कहा- "सर, मैंने हर बैठक में आपके द्वारा दिए गए हर भाषण को याद किया है।"आईनस्टाईन हैरान!उन्होंने कहा- "ठीक है, अगले आयोजक मुझे नहीं जानते। आप मेरे स्थान पर वहां बोलिए और मैं ड्राइवर बनूंगा।ऐसा ही हुआ, बैठक में अगले दिन ड्राइवर मंच पर चढ़ गया। और भाषण देने लगा...उपस्थित विद्वानों ने जोर-शोर से तालियां बजाईं।उस समय एक प्रोफेसर ने ड्राइवर से पूछा - "सर, क्या आप उस सापेक्षता की परिभाषा को फिर से समझा सकते हैं?"असली आईनस्टाईन ने देखा बड़ा खतरा!!इस बार वाहन चालक पकड़ा जाएगा। लेकिन ड्राइवर का जवाब सुनकर वे हैरान रह गए...ड्राइवर ने जवाब दिया - "क्या यह आसान बात आपके दिमाग में नहीं आई ? मेरे ड्राइवर से पूछिए, वह आपको समझाएगा।"शिक्षा :यदि आप बुद्धिमान लोगों के साथ चलते हैं, तो आप भी बुद्धिमान बनेंगे और मूर्खों के साथ ही सदा उठेंगे-बैठेंगे तो आपका मानसिक तथा बुद्धिमता का स्तर और सोच भी उन्हीं की भांति हो जाएगी!!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment