✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सुरक्षा दिन_**_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६:चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०:प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१:१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१:नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८:सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१:अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१:व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७:निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३:प्रा.डॉ.केशव पाटील-- लेखक,संपादक* *१९७२:रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१:वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री,लेखिका* *१९६७:डॉ.निर्मला पी.भामोदे-- चरित्रकार, वक्त्या* *१९५९:बबन ओंकार महामुने-- कवी , कथाकार* *१९४९:प्रा.डॉ.वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४:शरद पुराणिक-- विज्ञान लेखक**१९३९:गोविंद मोघाजी गारे--आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू:२४ एप्रिल २००६)**१९३५:गणपती साबाजी सेलोकर- कवी* *१९३५:प्रभा राव-- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू:२६ एप्रिल २०१०)* *१९२९:प्रल्हाद बापूराव वडेर--कथाकार, समीक्षक**१९२२:दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू:११ आक्टोबर २००२)**१९२१:फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू:११ अप्रैल १९७७)**१९०९:दामोदर अच्युत कारे-- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू:२३ सप्टेंबर १९८५)**१९०६:फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९९४)**१८९५:दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू:८ आगस्ट १९६९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:जगन्नाथ केशव कुंटे-- लेखक (जन्म: १५ मे १९४३)* *२०१६:पूर्ण ऐजिटक संगमा(पी.ए. संगमा)-- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म:१ सप्टेंबर १९४७)**२०११:अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म:५ नोव्हेंबर १९३०)**२००९:बापू वाटवे-- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म:१९२४)**२०००:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म:८ जानेवारी १९२४)**१९९६:आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म:७मार्च १९३३)**१९९५:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**१९९२:शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा.लि.च्या संचालिका**१९८५:पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धे--मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म:१० जून १९०४)**१९७६:वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२३ जुलै १८८६)**१९५२:सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म:२७ नोव्हेंबर १८५७)**१९२५:ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म:४ मे १८४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची संध्याकाळ .....*प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणावर त्याला खूप काही चांगले विचार डोक्यात येत असतात. पण त्यावेळी त्याच्या हातात ना वेळ असते ना काम करण्याची क्षमता. म्हणून जीवन जगताना आपणाला जे शक्य आहे ते काम त्याचवेळी करत राहावे. आता वेळ नाही, नंतर करतो किंवा आताच काही गरज नाही याची हे काम नंतर करतो. असे म्हणून काम पुढे ढकलू नये. गेलेली वेळ परत कधीच येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. वेळेवर जो विजय मिळवितो तो सर्वच गोष्टीवर विजय मिळवितो. घड्याळ्यातील तीन काटे नेहमी पळत राहतात पण काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना भेटत राहतात. तसे आपण कुटुंबात व परिवारात राहणारे आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी कामाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी दिवसभर फिरत राहतो पण त्या घड्याळ्यातील काट्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर एकत्र येणे विसरून गेलोत. त्यामुळे आपले जीवन नीरस बनत चालले आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका घरात विविध नात्यातील माणसं एकत्र राहत होती, त्यांच्यात प्रेम व श्रद्धा होती. विविध सण, समारंभ वा उत्सवाच्या निमित्ताने घराचं गोकुळ होत होते. पण कालांतराने कुटुंब पद्धत बदलत गेली. आज आम्ही दोघे राजा-राणी व दोन लेकरं, एवढाच विश्व झाल्याने माणूस एकलकोंडा होत चाललाय. सुखी जीवनाची व्याख्या बदलून गेली पण समाधान मात्र मिळालं नाही. म्हणून अंथरुणावर पडल्यावर माणसाला हे सारं आठवतं की, उभ्या आयुष्यात माझं काय काय चुकलं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. म्हणून आयुष्यात सुखी व समाधानी राहायचं असेल तर रोज सर्वाना भेटत राहावे, सर्वांशी प्रेमाने बोलत राहावे, सर्वांची खुशाली विचारत राहावं, यातच जीवनाचे खरा सार लपलेला आहे. - नासा येवतीकर, स्तंभलेखक~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातून एकही उमेदवाराची घोषणा नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा मुस्लिम लीग ( एन ) चे जेष्ठ नेते शेहबाज शरीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत, असं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरागे म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च या कालावधीत घेतली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *छ. संभाजीनगर : पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चाकूरजवळ झालेल्या कार अपघातात नांदेडचे चार तरुण ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम *1. प्रकृतिचा पहिला नियम:*सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत.. *2. प्रकृतिचा दूसरा नियम:**ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.* सुखी *सुख* वाटतो, दुःखी *दुःख* वाटतो, ज्ञानी *ज्ञान* वाटतो,भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.घाबरणारा *भय* वाटतो, *3. प्रकृतिचा तिसरा नियम:*आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,*बातचित* पचली नाही तर *चुगली* वाढते,*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,b *गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,*दुःख* पचले नाही तर *निराशा* वाढते,आणि *सुख* पचले नाही तर *ऊन्मत्तपणा वाढतो...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जपानचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) भारतात अत्तराची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?४) All India Radio चे घोषवाक्य काय आहे ?५) हवेमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती असते ? *उत्तरे :-* १) सकुरा २) कन्नोज, उत्तरप्रदेश ३) लोकसभेचा सभापती ४) बहुजन हिताय, बहुजन सुखाय ५) ०.०३%*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जैसी गंगा वाहें जैसे त्याचे मन । भगवंत जाण तया जवळी ॥१॥त्याचे जवळी देव भक्ति भावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥तया दिसे रुप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणति हे ॥३॥जाणती हे खूण स्वात्मानुभवी । तुका म्हणे म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही,मला सर्व येते, मला सर्वच काही जमते,माझ्याकडे कशाचीही कमी नाही,मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा,आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~* जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment