✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/nRt3vVh2JcfZL3rQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९२:कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के.बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार'उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला**१९९१:युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने**१९५९:’बार्बी’या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.**१९५२:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते पुण्यातील पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन**१९४५:अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:दर्शील सफारी--- भारतीय अभिनेता, "तारे जमीन पर" मधील भूमिकेमुळे लोकप्रिय* *१९८८:अश्विनी रोशन दुरगकर-- लेखिका**१९८५:पार्थिव अजय पटेल-- माजी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक-फलंदाज**१९८१:डॉ.अदिती टपळे-काळमेख -- कवयित्री* *१९७८:कमलेश विनायक गोसावी -- कवी, लेखक* *१९६२:प्रा.शिवाजी तुकाराम वाठोरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:प्रा.रमेश गंगारामजी वाघमारे-- कवी, लेखक**१९५६:शशी थरूर – माजी केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ**१९५१:उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक**१९५०:विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर-- ज्येष्ठ जादूगार**१९४५:गणपती रामदास वडपल्लीवार-- नाट्यलेखक* *१९४३:रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू:१७ जानेवारी २००८)**१९४३:अ.शि.रंगारी-- कादंबरीकार* *१९३५:डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी-- संशोधक,लेखक* *१९३४:युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू:२७ मार्च १९६८)**१९३३:भिका शिवा शिंदे उर्फ आबा-- प्रसिद्ध नाटककार,साहित्यिक(मृत्यू:१० सप्टेंबर २००९)**१९३१:डॉ.करणसिंग-- माजी केंद्रीय मंत्री**१९३१:सदाशिव बाळकृष्ण क-हाडे-- समीक्षक,कादंबरीकार**१९३०:डॉ.युसुफखान महंमदखान(यू.म.) पठाण-- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार* *१८९९:’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू:२६ नोव्हेंबर १९८५)**१८९४:शंकर पुरुषोत्तम जोशी-- मराठी इतिहास संशोधक(मृत्यू:२० सप्टेंबर १९४३)**१८६३:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू:१३ फेब्रुवारी १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:पतंगराव कदम-- माजी मंत्री, राजकारणी,भारती विद्यापीठाची स्थापना १९६८(जन्म:८जानेवारी १९४४)**२०१७:वि.भा.देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे--पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी, नाट्यसमीक्षक (जन्म:३१ मे १९३८)**२०१२:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)**२०००:उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)**१९९६:अख्तर उल इमान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात उर्दू कवी आणि पटकथा लेखक(जन्म:१२ नोव्हेंबर १९१५)* *१९९४:देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:३० मार्च १९०८)**१९९२:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१६ ऑगस्ट १९१३)**१९७१:के.असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म:१४ जून १९२२)**१९६९:सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म:२३ सप्टेंबर १८८१)**१८८८:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म:२२ मार्च १७९७)**१८५१:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ ऑगस्ट १७७७)**१६५०:संत तुकाराम यांचा वैकुंठवास (जन्म: १५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लघुकथा - टास्कशाळेतील मुलांना काही आव्हान दिल्यावर ते कशा पद्धतीने पूर्ण करतात. दिलेले आव्हान पूर्ण करतांना त्यांच्या मनाची तयारी व संस्कार कसे होतात ही सांगणारी लघुकथा ..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोहित पवारांच्या बारामती अँग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींची ट्वीट करुन माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा, असे निर्देश दिले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या डझनभर खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्टॅच्यू ऑफ नॉलेज* हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ?२) देशातील पहिल्या एआय ( AI ) शिक्षिकेचे नाव काय आहे ?३) नविन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे ?५) जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) लातूर २) इरीस ( तिरुवनंतपुरम येथील शाळेत ) ३) हिमाचल प्रदेश ४) मॉरिशस ५) नोबेल पुरस्कार *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे पाटील👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भूती जीन व्हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥शांती करा तुम्ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥असो हे साधन ज्यांचे चित्ती वसे । मायाजाळ नासे तुका म्हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाढ चिखलात असताना सुद्धा अफाट संघर्ष करून जे वरती येऊन फुलत असतात त्यांचा सुंगध जिकडे, तिकडे कायमस्वरूपी दरवळत असतो. व जे, दुसऱ्यांना चिखलात ढकलून, फुलत यशस्वी होतात त्यांचा सुंगध मात्र स्वतः पुरते मर्यादित असते. सुंगध नाव एकसारखे आहे मात्र त्यात खूप फरक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने फुलायचे असेल तर इतरांना आधार देऊन फुलावे दुसऱ्यांना चिखलात गाडून फुलल्याने, त्या नाजूक फुलांचा अपमान होतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे क्षण ही निघून जातील*एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment