✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 20234💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९:सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९:चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३:मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२:स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६:केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८:मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०:ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८:रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:श्रेया घोषाल-- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२:मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१:अनधा विनय तांबोळी-- कवयित्री, लेखिका**१९७३:राम पांडुरंग गायकवाड-- कवी* *१९६९:प्रा.कल्याण पांडुरंग राऊत-- कवी* *१९६९:फाल्गुनी पाठक--भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१:डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६:चंदन दास-- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३:डॉ.अविनाश बिनीवाले-- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१:प्रा.जवाहर प्रेमराज मुथा-- ज्येष्ठ कवी,प्रसिद्ध लेखक,संपादक**१९४०:डॉ.श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक,संपादक**१९३३:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ आगस्त २०२०)*१९२६:सुमन पुरुषोत्तम बेहरे-- लेखिका**१९२३:गजानन रामचंद्र कामत-- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु:६ऑक्टोबर २०१५)**१९१५:डॉ.अ.ना.देशपांडे(अच्चुत नारायण देशपांडे)-- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार(मृत्यू:१४ आक्टोबर १९९०)**१९१३:यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान,संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४)**१९११:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म:१२ ऑगस्ट १९७३)**१९०४:जगन्नाथ जनार्दन पुरोहित-- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू:२० ऑक्टोबर१९६८)* *१८९१:’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९५९)**१८२४:गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ आक्टोबर १८८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक,समीक्षक (जन्म:३ नोव्हेंबर १९३३)**२००१:रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९:यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म:२२ एप्रिल १९१६)**१९६०:विठ्ठल वामन हडप-- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म:१८ नोव्हेंबर १८९९)**१९५९:जनार्दन सखाराम करंदीकर--संपादक (जन्म:१५ फेब्रुवारी १८७५)**१९४२:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म:२३ सप्टेंबर १८६१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांना भारताचं नागरीत्व मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मुंबईत थीम पार्क उभारणार ; महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेटमध्ये 19 धडाकेबाज निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका, निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही डेडलाईन, येत्या 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश:17 तारखेला शिवाजी पार्कवर लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऑस्कर 2024 :- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच्या हाती मशाल, 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगली लोकसभेतून उमेदवारी जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨👩👦👦 *मुले जुळी का होतात ?* 👨👩👧👧 ***************************राम-श्याम, सीता और गीता असे बरेच जुळ्यांवरचे सिनेमे आपण बघतो. त्यात उडणारा गोंधळ प्रत्यक्षातही आपण अनुभवला असेल. जुळ्या बहिणी, भावांमधील फरक आपल्याला ओळखू आला नसेल किंवा असेही झाले असेल की जुळे तर आहेत, पण दिसायला एकदम वेगळे आहेत किंवा जुळ्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ही अशी जुळी का बरे होत असतील. एरवी एकच मूल जन्माला येत असते.जुळ्यांचे आपण वर जे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याची भिन्नभिन्न कारणे आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन झाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोनाचे चार असे वाढून पेशींचा गोळा तयार होऊन एक गर्भ तयार होतो; परंतु काही वेळेस प्रथम फलन झाल्यावर स्त्रीबीजाचे जे दोन भाग होतात, ते वेगळे वेगळेच वाढायला लागून दोन गर्भ तयार होतात. असे जे जुळे असते ते दिसावयास अगदी सारखे असते आणि त्यांचे लिंगही एकच असते. म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले. दुसऱ्या प्रकारात दोन वेगळे स्त्रीबीज दोन वेगवेगळ्या शुक्राणू फलित होऊन दोन गर्भ तयार होतात. हे जुळे मग समान लिंगाचे असू शकते किंवा भिन्न लिंगाचे. एक मुलगा व एक मुलगी अशा जोड्या तयार होतात. अशी जुळी दोन वेगळ्या स्त्रीबीजाकडून तयार झाल्याने दिसावयास सारखी नसतात. असे हे जुळ्यांचे दुखणे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *घूमर लोकनृत्य* कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?२) भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत ?३) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते ?४) देशातील पाण्याखाली सर्वात खोल बांधलेले मेट्रो स्टेशन कोणते ?५) जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये कुटुंब न्यायालय अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) राजस्थान २) ८० रामसर स्थळे ३) लोकसंख्या ४) हावडा मेट्रो रेल्वे स्टेशन ५) अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मधुकर काठेवाडे, शिक्षक, नायगाव👤 शिवराम पेंडकर, येवती👤 माधव पाटील दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गेली त्याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्याचि स्थिती सांगतो मी ॥२॥सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥जगात पिशाश्च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्न तो ॥४॥निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥वेगळाले भेद किर्ती त्या असती । ह्र्यदगत त्याची गति न कळे कवणाला ॥६॥न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्याची ॥७॥खुण त्याची जाणे जे तैसे असती । तुका म्हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्यात खरी माणुसकी व, विरता असते ती व्यक्ती, कधीही कोणाशी वैरता करत नाही आणि वैरता निर्माण करण्यासाठी मुळात कोणालाही साथ देत नाही. कारण, वैरताची आपल्यात भावना ठेवल्याने व साथ देल्याने त्याचे होणारे परिणाम कसे असतात त्याविषयी त्याला भक्कम अनुभव असतो. म्हणून आपणही अशाच प्रामाणिक, नि:स्वार्थी व माणुसकी असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असत्य जेव्हा पुनःपुन्हा कानी पडते, तेव्हा ते सत्य भासू लागते.=====================एका गावात 'मित्रशर्मा' नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहात होता. एकदा यज्ञात 'बळी' देण्यासाठी त्याने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाकडून एक गलेलठ्ठ बोकड तसाच मिळविला व त्याला खांद्यावर घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला.तो बोकड तीन भामट्यांच्या दृष्टीस पडला व त्यांनी त्या ब्राह्मणाला फसवून, त्या बोकडाला पळवून नेण्याचा आपपसांत बेत आखला. त्याप्रमाणे ते तिघे तो ब्राह्मण जाणार असलेल्या वाटेवर - त्याला दाद लागून न देता - थोडथोड्या अंतरावर उभे राहिले.खांद्यावर बोकड घेतलेला ब्राह्मण जरा पुढे जाताच वाटेत भेटलेला पहिला भामटा त्याला म्हणाला, 'काय भटजीबुवा, कुत्रा खांद्यावर घेऊन कुठे चाललात? अहो, याला असेच घेऊन गेलात तर तुमचे गावकरी तुम्हाला वेड्यात काढतील.''हा कुत्रा नसून बोकड आहे,' असे उत्तर त्या ब्राह्मणाने देताच तो भामटा त्याला म्हणाला, 'भटजी, कुणाला चांगलं सांगण्याची सोय नाही हेच खरं. तुम्हाला तो कुत्रा बोकड वाटतोय ना? मग वाटल्यास त्याला घरी नेऊन यज्ञात बळी द्या. मग तर झालं? माझं काय जातंय? तुमचं पाप तुम्हाला.'त्या भामट्याच्या या बोलण्याचा विचार करीत तो ब्राह्मण जरा पुढे जातो न जातो तोच, वाटेत भेटलेला दुसरा भामटा म्हणाला, 'काय हो शास्त्रीबुवा, तुम्हाला वेडबीड तर नाही ना लागलं? गायीचं मेलेलं वासरू खांद्यावर घेऊन कुठे चाललात? टाकून द्या त्याला इथंच आणि घरी जाताच गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून शुद्ध व्हा.'तो ब्राह्मण भांबावलेल्या मनःस्थितीत आणखी जरा पुढे जाताच तिसऱ्या भामट्याने विचारले, 'एका गाढवाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाणे पंडितजी तुम्हाला शोभते का?'हे शब्द ऐकून मात्र तो ब्राह्मण मनी चरकून स्वतःशीच म्हणाला, 'ज्या अर्थी वाटेत भेटलेल्या एकाला हा माझा बोकड कुत्रा दिसला, दुसऱ्याला गाईचे मेलेले वासरू दिसले तर तिसऱ्याला गाढवाचे पिलू भासले, त्या अर्थी हा बोकड म्हणजे क्षणोक्षणी रूपे बदलणारा मायावी राक्षस असावा. तेव्हा याला घरी नेण्यात काय अर्थ? मनात असे म्हणून, त्याने त्या बोकडाला तिथेच सोडून दिले आणि तो आपल्या गावी परत गेला.तो ब्राह्मण जरा दूर जाताच त्या तीन भामट्यांनी त्या बोकडाला पळवून नेले.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment