✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/jadoochi_pishavi_nasa_yeotikar.pdf••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवामान दिन_* *_शहीद स्मृती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे,ढग,पाऊस,विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन' म्हणून साजरा होतो._**२०१२:राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते जळगाव विमानतळाचे उदघाटन**१९९९:पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले**१९९९:क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला**१९९८:अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९८०:प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.**१९५६:पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.**१९४०:संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत**_१९३१:भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले._* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:आशिष अशोक निनगुरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७९:प्रा.डॉ.रेखा जगनाळे(मोतेवार)-- प्रसिद्ध लेखिका,संपादिका* *१९७२:संतोष पद्माकर पवार-- कवी,संपादक**१९७२:अरमान कोहली-- भारतीय अभिनेता**१९७०:ज्योती धुतमल-पंडित -- कवयित्री, लेखिका* *१९६८:माईक अॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५६:पं.विनोद दिग्रजकर- ज्येष्ठ शास्त्रीय गायक**१९५३:किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक**१९५३:प्रकाश विठ्ठलराव खंडागळे -- कवी, लेखक* *१९४९:प्राचार्य सुभाष त्र्यंबक वसेकर -- कलामहर्षी,मराठवाड्यातील बालसाहित्यिक (मृत्यू:३० सप्टेंबर २०२२)**१९४८:वसीम बारी-- माजी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू* *१९४८:मधुवंती दांडेकर -- मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री* *१९३५:रमेश विठ्ठल रघुवंशी -- लेखक,प्रकाशक* *१९३५:मृणालिनी त्र्यंबक ढवळे-- लेखिका, संपादिका* *१९३३:प्रा.डॉ.सुधाकर गजाननराव देशपांडे -- लेखक* *१९३१:व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू**१९२९:डॉ.गोविंद स्वरूप -- भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक(मृत्यू:७ सप्टेंबर २०२०)**१९२३:सदाशिव आठवले-- मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक(मृत्यू:८ डिसेंबर २००१)**१९२३:हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू:२१ जानेवारी १९४३)**१९१७:शरयू वासुदेव रानडे -- कवयित्री, लेखिका* *१९१६:हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१०:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.(मृत्यू:१२ आक्टोबर १९६७)**१८९८:नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर १९७७)**१८९७:गुणवंत हनुमंत देशपांडे -- कवी, लेखक ( मृत्यू:२५ सप्टेंबर १९८५)* *१८८३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी,त्यांना कन्नड, कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू,तामिळ,मराठी, कन्नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू:६ सप्टेंबर १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:प्रा.डॉ.यशवंत पाठक--संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक(जन्म:१९४६)* *२०११:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म:२७ फेब्रुवारी १९३२)**२००७:श्रीपाद नारायण पेंडसे-- प्रसिद्ध कादंबरीकार,नाटककार,आत्मचरित्रकार (जन्म:५ जानेवारी १९१३)**२००८:गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म:२०ऑगस्ट १९१८)**१९३१:भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म:२८ सप्टेंबर १९०७)**१९३१:’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म:१५ मे १९०७)**१९३१:शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म:२४ ऑगस्ट १९०८)**१९२७:सरस्वतीबाई विद्याधर भिडे-- कवयित्री,(जन्म:१८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त आजपर्यंत प्रकाशित झालेली माझी पुस्तके खालील प्रमाणेमाझी साहित्य संपदा वैचारिक लेखसंग्रह01) पाऊलवाट 02) संवेदना 03) जागृती 04) मी एक शिक्षक05) शाळा आणि शिक्षक06) रोज सोनियाचा दिनू07) हिंदू सणकथासंग्रह08) हरवलेले डोळे आणि 09) कुलदीपक10) जादूची पिशवीकवितासंग्रह11) सारीपाट 12) महापुरुषांची ओळख13) लॉकडाऊन काळातील कवितादीर्घकथा 14) ललाटरेषावरील सर्व पुस्तके वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि जादूची पिशवी कथासंग्रहासह इतर पुस्तकं डाउनलोड कराधन्यवाद ......!- नासा येवतीकर, धर्माबाद ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची ६०७ वी बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यात उत्साहत स्वागत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुष्पक - आरएलव्ही एलईएक्स- 02 लँडिंगची यशस्वी चाचणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आणि खासदार डेरीक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत निवडणुक आयुक्तांची भेट घेतली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वोच्च न्यायालयातून अरविंद केजरीवाल यांनी याचिका घेतली मागे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती : निवडणूक आयोगाने मुंबई मनपा आयुक्त पदावरुन हटवले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 - पहिल्याच सामन्यात CSK ने RCB चा 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोगॅस* 📙 अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे.उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचऱ्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार *जगातील सर्वात आनंदी देश* कोणता ?२) माहिती अधिकार विधेयक लोकसभेत केव्हा सादर करण्यात आले ?३) भारतातील कोणत्या शहराला 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' असे म्हणतात ?४) जगातील राजधानीच्या शहरांपैकी सर्वात प्रदूषित शहर कोणते ?५) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) फिनलंड ( सातव्यांदा ) २) २२ डिसेंबर २००४ ३) शिलाँग ४) दिल्ली ५) क्षितिज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त शिक्षक👤 साईनाथ सुत्रावे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 संतोष गुंडेटवार, शिक्षक, नांदेड👤 सौ. रंजना सत्यजित टिप्रेसवार, नांदेड👤 नरसिंग यमेवार👤 विनायक नरवाडे👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, साहित्यिक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याचे मन दुखावणे खूप सोपे असते. पण एखाद्या वेळी आपले जर कोणी मन दुखावले तर ते दु:ख सहन करणे मात्र खूप कठीण होऊन जाते. म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणून यशाच्या शिखरावर अवश्य पोहोचावे पण,प्रामाणिकपणा कायम असू द्यावे. कारण, इतरांना आपण खूप काही सांगू शकतो पण,स्वतःमध्ये जर प्रामाणिकपणाचे लक्षणे नसतील तर सर्व काही असून सुद्धा कधीच समाधान मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment