✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~काटकसर लेख वाचण्यासाठी Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/katakasar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९:’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८:नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७:ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६:मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३:भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१:दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१:’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६:शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८:फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४:हितेन तेजवानी-- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३:श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा.शर्मिला सुनील गोसावी-- कवयित्री लेखिका* *१९७०:डॉ.मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक,संपादक* *१९६७:अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७:प्रा.डॉ.रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक,संशोधक* *१९६५:गजानन माधवराव माधसवार-- कवी, लेखक* *१९६३:सौरभ शुक्ला--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९:शिवराजसिंह चौहान-- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५७:संगीता बापट -- कवयित्री,गायिका, संगीततज्ञ* *१९५६:डॉ.मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९४५:गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९२९:संतोष आनंद-- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९:राम उगावकर -- कवी,शाहीर, गीतकार (मृत्यू:५ एप्रिल २०१३)* *१९२८:अॅलिक पदमसी-- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१८)**१९२५:वसंत पुरुषोत्तम साठे-- पूर्व कॅबिनेट मंत्री(मृत्यू:२३ सप्टेंबर २०११)* *१९१७:आनंदीबाई विजापुरे--आत्मचरित्रकार, कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:२० ऑक्टोबर १९९९)**१९१६:बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू:१७ एप्रिल १९९७)**१९१३:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू:२१ जुलै २००९)**१९११:सुब्रोतो मुखर्जी-- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू:८ नोव्हेंबर, १९६०)**१९१०:श्रीपाद वामन काळे-- निंबंधकार. संपादक**१९०८:सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू:२ जून १९९०)**१९०६:सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू:१९८९)**१९०५:हरिहर वामन देशपांडे-- लेखक (मृत्यू:२० एप्रिल १९६५)**१८९८:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जानेवारी १९७६)**१८७३:लक्ष्मण नारायण जोशी--मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू:१जुलै १९४७)**१८५६:राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी-- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ,इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू:२६ मार्च, १९२९)**१५१२:गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:२ डिसेंबर १५९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२८ जुलै १९५४)**१९९५:जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म:११ जुलै १९४५)**१९८९:बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५:पु.ग.सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार* *१९६८:नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म:१८६९)**१९६६:शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१८ डिसेंबर १८७८)**१८२७:अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१८ फेब्रुवारी १७४५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काटकसर म्हणजे बचत*काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग : मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे तर रायगड मधून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जालना- मुंबई जनशताब्दीचा हिंगोली पर्यंत विस्तार, पहाटे 5 वाजता निघून दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचणार; खा. हेमंत पाटलांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑक्टोबर १९८१ मधील गिरणी कामगारांना गृहयोजनेत सामावून घ्यावे, गिरणी कामगार कल्याणकारी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 कावीळ म्हणजे काय ? 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं अस्तित्व आपल्या कामावर अवलंबून असते, कोणाच्या दृष्टिकोनावर नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला *'व्हाईट गोल्ड'* म्हटले जाते ?२) "महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ", अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा कोणी केली होती ?३) महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या ?४) कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ? *उत्तरे :-* १) लिथियम २) महात्मा गांधी ३) वारली, गोंड, कातकरी ४) कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, वेरुळा ५) गोपाळ हरी देशमुख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मदनुरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 भास्कर रेड्डी ऐंगोड, येताळा👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 अशोक कहाळेकर, सहशिक्षक, नायगाव👤 रमेश मेरलवार, करखेली👤 प्रकाश पडकूटलावार👤 पोषट्टी सिरमलवार👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पा. विभूते चोंडीकर👤 दिनेश चव्हाण👤 गौस पाशा शेख, सहशिक्षक, पालघर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 बालाजी हेंबाडे👤 बालाजी तिप्रेसवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्मसूख ॥१॥आत्मसूख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । याविण चावटी करु नका ॥२॥करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात केवळ आपणच दुःखी आहोत असं नाही. या पृथ्वीतलावर अनेकजण दुःखी आहेत. प्रत्येकांचे जीवन सुखा,दु:खाने भरलेले आहे. आपणच दुःखी आहोत म्हणून त्याच विवंचनेत न राहता आपण जरा आजुबाजूचा देखील विचार करायला पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा आपले दु:ख कमी असू शकतात. म्हणून त्यांचे दुःख आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजे व फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन त्यांची मदत केली पाहिजे हा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्कारीत मुलेच यशस्वीनैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment