✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://googlyan.blogspot.com/2018/08/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१:बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१:कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३:उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९:पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६:अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८:इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सदावर्ते-- अभिनेत्री* *१९८५:अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१:भावना कुलकर्णी-भालेराव-- बालकथाकार,कवियित्री**१९७७:वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री,कथालेखिका* *१९६६:मोहित चौहान--भारतीय गायक**१९६०:रमेश चिल्ले -- कवी,लेखक* *१९५८:पुरुषोत्तम गं.निकते -- कवी* *१९५४:विनोद दुआ-- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक(मृत्यू:४ डिसेंबर २०२१)**१९५२:प्रा.डॉ.विश्वास किसन पाटील-- लेखक**१९४९:डॉ.लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५:डॉ अनधा केसकर-- कादंबरीकार,कथाकार**१९४०:दया डोंगरे-- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८:प्रा.डॉ सुनंदा देशपांडे--लेखिका, समीक्षक* *१९२९:मालती मोरेश्वर निमखेडकर-- कवयित्री,कथाकार (मृत्यू:२०१६)**१९२२:सरोज अहंकारी-- बालसाहित्यिक कवयित्री लेखिका**१९१७:धोंडो विठ्ठल देशपांडे-- लेखक, समीक्षक (मृत्यू:१९ जुलै १९९३)* *१९१६:हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२४ मे १९९५)**१९१५:विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू:१८ डिसेंबर २००४)**१९१२:शंकर गोविंद साठे-- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू:२४ डिसेंबर २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ब्रिज मोहन व्यास-- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म:२२ ऑक्टोबर, १९२०)**२००६:स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म:२०ऑगस्ट १९४१)**१९९३:शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:२५ एप्रिल १९१८)**१९८०:अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे--सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म:७ ऑक्टोबर १८९७)**१९७९:यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर-- नवाकाळचे दुसरे संपादक(जन्म:१५ जानेवारी १९०५)**१९७०:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म:१७ जुलै १८८९)**१९६५:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म:१२ डिसेंबर १८९२)**१९५५:अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म:६ ऑगस्ट १८८१)**१९४३:ॲड.यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे-- विदर्भाच्या इतिहासाचाआद्याचार्य (जन्म:१८ फेब्रुवारी १८८२)**१६८९:छत्रपती संभाजी महाराज (जन्म:१४ मे १६५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुज आहे तुजपाशी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे:PM मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न; धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न- अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनात एकमताने ठराव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली; 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मिळतील सुमारे 45 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं.हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल.कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय.या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथे एकमेकांची प्रगती साधली जाते तीच खरी मैत्री असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ माधवराव कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 Tr. जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्यास साक्षात्कार ॥३॥साक्षात्कार झालिया सहज समाधि । तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक, चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment