✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JNN4WNgxUoQAENsi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट मध्ये शतकांचे शतक* *२००१:नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान**२०००:हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के.बिर्ला पुरस्कार’ जाहीर**१९९२:ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर अवार्ड प्रधान**१९७६:इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.**१९६६:अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.**१९४३:’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१५२८:फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:राजपाल यादव-- हिंदी चित्रपटांमधील विनोदी अभिनेता**१९६८:अनन्या खरे-- भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९६२:बाळू विठोबा श्रीराम-- कवी,लेखक* *१९६२:हरि सखाराम गोखले-- मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक**१९६१:किरण वसंत पुरंदरे-- पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक* *१९५८:जनरल बिपीन रावत-- भारतीय लष्करातील 'फोर स्टार रँक' धारक जनरल,भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुखदेखील होते.२०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला(मृत्यू:८ डिसेंबर २०२१)**१९४६:मुकुंद धाराशिवकर --ज्येष्ठ लेखक विज्ञान प्रचारक(मृत्यू:१४ फेब्रुवारी २०१६)**१९३९:वामनराव तेलंग-- तरूण भारतचे माजी ज्येष्ठ संपादक,लेखक (मृत्यू:११ जून २०२०)**१९३६:प्रभाकर बर्वे -- आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते(मृत्यू:६ डिसेंबर १९९५)* *१९३६:भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू:२६ जुलै २००९)**१९३५:प्राचार्य बजरंग शामराव सरोदे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५:शशिकांत यशवंत गुप्ते -- लेखक* *१९२१:फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे-- कवी नाटककार(मृत्यू:१९ जानेवारी १९८५)**१९१३:पंढरीनाथ गंगाधर नागेशकर-- हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम तबलावादक(मृत्यू:२६ मार्च २००८)**१९०१:प्र.बा.गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:१२ जून १९८१)**१८७२:काशीनाथ हरी मोडक( माधवानुज)-- केशवसुत संप्रदायातील मराठी कवी(मृत्यू: २ मार्च१९१६)* *१७८९:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:६ जुलै १८५४)**१७५१:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ जून १८३६)**१७५०:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ(मृत्यू:९ जानेवारी १८४८)**१६९३:मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक,मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू:२० मे १७६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ॲड.ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी-- नामवंत वकील,इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक (जन्म:१३ जून १९३०)* *२०१०:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक(जन्म:३० मार्च१९२८)**२००७:मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म:४ मे १९८४)* *१९९९:कुमुदिनी पेडणेकर – प्रसिद्ध गायिका* *१९९०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती,रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:२१ जुलै १९१०)**१९८५:वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार(जन्म:१० सप्टेंबर १९१८)**१९४६:’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म:१० ऑगस्ट १८५५)**१९४५:गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म:१३ जून १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेसकोड अनिवार्य, शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन मोठी टेंडर केली रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुंधती खंडकर यांचे निधन : वयाच्या 92 व्या वर्षी सिंगापुरात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'बारावी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता ; क्रिटिक्स चॉईस पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्टीफन हॉकिंग यांच्या 10 प्रेरणादायी विचारातुन दिवसाची मस्त सुरूवात करूया...स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्ञोत होते. हॉकिंग बोलणारे एक-एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदवल गेल.1) गमती नसतील आयुष्य एक शोकांतिका ठरेल.2) जरी मी हालचाल करू शकत नसलो, मला बोलण्यासाठी काॅम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातुन मुक्त आहे. 3) नेहमी आकाशातील तार्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा, कुतूहल जागरूक ठेवा.4) आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करू शकताच तुम्ही यशस्वी व्हाल. 5) आपल्याला जे-जे करता येईल ते सर्व करायला हवं. माञ जे आपल्या हातात नाहीच त्याबाबत पश्चाताप करू नये.6) दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमच अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्या आड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. 7) आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे, आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. 8) कधीही करू शकत नाही, अस काहीही नाही.9) जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.10) ब्रम्हांडापेक्षा मोठं आणि जुन काहीच नाही..!!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहित जीवनात कशाची गरज पडेल ?*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?२) भारतात पहिल्यांदा मतदारांना ओळखपत्रावर छायाचित्र प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या वर्षी छापण्यात आले ?३) वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव काय ?४) केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू केलेल्या कायद्याला संसदेने कोणत्या वर्षी मंजुरी दिली होती ?५) आपल्या तोंडातील लाळेत किती टक्के क्षार असतात ? *उत्तरे :-* १) पारा २) मे १९६० ( कोलकाता दक्षिण पश्चिम मतदारसंघ पोटनिवडणूक ) ३) विठ्ठल संप्रदाय ४) सन २०१९ ५) एक ते दीड टक्के क्षार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रा. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड👤 अनिल कांबळे, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 शिवम भंडारे, येवती👤 अनिलकुमार जैस्वाल, येताळा👤 कैलास राखेवार, नांदेड👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे कपडे धुताना जास्त वेळ लागत नाही त्यापेक्षा लहान असलेले कपडे धुवायला जरा जास्त वेळ लागत असतो. तरीही त्यांना आपण स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपल्यात सुद्धा काही क्षुद्र विचार असतील तर त्यांनाही धुवून काढण्याचा प्रयत्न करून बघावे. असे केल्याने आपले मनही स्वच्छ राहील व आपली वेळही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯🏆 *मोटिव्हेशनल सदर* 🏆🎯 एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत होते. देशातील अनेक हुशार व व्यासंगी पंडीतांमध्ये त्यांच्या ज्ञानाची चर्चा होत असे. शास्त्रार्थामध्ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते. हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्थाने त्यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्यांच्या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्ही पंडीत असूनसुद्धा तुम्ही चक्क लहान काय खेळता आहात?’’ गृहस्थांचे हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्थांना घेऊन ते जवळच्याच एका घरात गेले. त्या घरात एका खुंटीला एक धनुष्य अडकविले होते. त्या धनुष्याकडे बोट दाखवून पंडीतजी म्हणाले, "महोदय, त्या धनुष्याच्या प्रत्यंचेची दोरी सध्या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्हाला माहित आहे काय? कामाव्यतिरिक्तच्या वेळेसही जर धनुष्याच्या कांबीची दोन्ही टोके जर वाकवून त्या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्याची दोरी खेचायची बंद होईल. परिणामी ते धनुष्य निकामी होईल. त्याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्याने बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ नये म्हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."गृहस्थांचे या उत्तराने समाधान झाले. *तात्पर्य :- बुद्धीवर येणा-या प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्यासाठी थोडावेळ तरी आपल्या छंदाला किंवा परिवाराला वेळ द्यावा ज्याने आपल्या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्हा परिश्रम करण्यास मेंदू तयार होईल.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment