✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक ग्राहक दिन_**_ या वर्षातील ७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५:symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९:महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९:हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन**१९०६:रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७:इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१:मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७:टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०:मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४:मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक,संपादक* *१९९३:आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८३:धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३:हनी सिंग-- गायक,गीतकार आणि अभिनेता**१९८२:ऋतुजा देशमुख-- अभिनेत्री* *१९८१:स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०:प्रा.डॉ सारीपुत्र तुपेरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७९:डॉ.पोर्णिमा शिरिष कोल्हे-- लेखिका* *१९७९:प्रा.प्रज्ञा मनिष पंडित--लेखिका, कवयित्री,समुपदेशक**१९७८:बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९६५:डॉ.अंजुषा अनिल पाटील-- लेखिका* *१९६५:पोपटराव काळे-- प्रसिद्ध काजवाकार, निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१:गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०:दशरथपंत नारायणराव अतकरी-- कवी* *१९५४:ईला अरुण-- अभिनेत्री,टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५०:डॉ.अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४४:पुंडलिक भाऊराव गवांदे-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५:लक्ष्मण त्र्य.जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार,लेखक* *१९३४:कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू:९ ऑक्टोबर२००६)**१९३४:गजमल माळी-- लेखक,कवी व नाटककार(मृत्यू:२८ फेब्रुवारी २०१७)**१९२३:मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार(मृत्यू:१५ ऑक्टोबर २००७)**१९१५:त्र्यंबक गोविंद माईणकर--भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू:१७ सप्टेंबर १९८१)**१९१५:ह.वि.पळणीटकर-- विदर्भातील एक नाटककार,कवी व लघुकथालेखक (मृत्यू:२८ जानेवारी १९९४)**१९०१:विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू:२४ मे १९९९)**१८६८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू:२० फेब्रुवारी १९५८)**१८६०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२६ आक्टोबर १९३०)**१७६७:अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जून १८४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इम्तियाज खान-- भारतीय अभिनेता(जन्म:१५ ऑक्टोबर १९४२)**२०१९:श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर-- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म:२७ मार्च)* *२०१६:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(जन्म:१६ एप्रिल १९२२)**२०१६:शंकर भाऊ साठे--कादंबरीकार आणि शाहीर( जन्म:१६ आक्टोबर १९२५)**२०१५:नारायणभाई महादेवभाई देसाई-- गांधी कथाकार (जन्म:१९२४)**२०१५:मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार(जन्म:१५ एप्रिल १९५२)**२०१४:सुधीर मोघे -- मराठी कवी,गीतकार व संगीतकार (जन्म:८ फेब्रुवारी १९३९)**२०१३कल्लम अंजी रेड्डी_ फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म:१ फेब्रुवारी १९३९)**१९९२:डॉ.राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म:१९२५)**१९३७:व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म:१० डिसेंबर १८९२)**१८६५:गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक(जन्म:१८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाख विक्रेत्यांना कर्ज वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फुलंब्री इथं विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला निलेश लंके उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 बिग बँग / महास्फोट📙 जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पहिले श्रेय त्यांच्याकडे जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे. महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वप्रथम ओळखपत्रावर मतदारांचे छायाचित्र छापण्याचा प्रस्ताव कोणत्या साली पुढे आला ?२) सरकारी दस्तऐवजामध्ये वडीलाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?३) DRDO ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?४) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे कोणते नाव ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली ?५) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये 'ओपेनहायमर' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत ?*उत्तरे :-* १) सन १९५८ २) महाराष्ट्र ३) अग्नि ५ ४) राजगड ५) सात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेल्या कलागुणांनामुळे उशीरा का होईना आपली ओळख होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण,त्याच कलेचा दुरूपयोग करून नको ती वाट निवडल्याने मात्र त्या असणाऱ्या कलेचा कुठेतरी अपमान होत असतो. त्याविषयी सहसा आपल्याला कळत नाही. म्हणून असं होण्याआधीच त्या सर्वांना आधी वाचणे गरजेचे आहे. अशी व्यर्थ चूक आपल्या हातून होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना आईच लक्ष जातं, मुलगा - "आपल्या job मुळेआईकडे लक्ष देता नाही येणार गं,तिचं आजारपण आणि देखभालकोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष सुद्धा देतील ते "त्यावर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या डोळ्यात पाणी आले.........सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ, पण आईंची माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्यासहवासाची गरज आहे, मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही.मी आईंजवळ थांबेन. घरी tution घेईन, त्यामुळे आईं जवळही राहता येईल. विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला आईने वाढवलंय. त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असंबोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण आई आपल्या जवळच राहतील, अगदी शेवटपर्यंत " सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येउन देवा जवळ उभी राहते . . .आई देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभार मानते आणि म्हणते," देवा मला मुलगी नव्हती म्हणूनखूप भांडली रे मी तुझ्याशी, पण ही भाग्यलक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन देऊन.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment