✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४:नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०:अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२:महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०:हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:प्रा.डॉ.उद्धव भाले-- लेखक**१९७०:देवेंद्र गावंडे--निवासी संपादक लोकसत्ता विदर्भ आवृत्ती तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८:प्रा.डॉ.शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९:मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,संपादिका* *१९५७:रत्ना पाठक शाह-- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६:वासंती वर्तक--दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५:संजय श्रीकृष्ण पाठक-- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५:अरुण बुधाजी सोनवणे-- गझलकार* *१९४८:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू:२६ जून २००५)**१९४६:नवीन निश्चल-- भारतीय अभिनेता(मृत्यू:१९ मार्च २०११)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे-- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू:२५ डिसेंबर २०२०)**१९३८:बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता(मृत्यू:४ डिसेंबर २०१७)**१९३४:दशरथ तोंडवळकर-- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू:७ आगस्ट २०१०)**१९३२:तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी(मृत्यू:१४ सप्टेंबर २०१८)* *१९२६:अक्कितम अच्युथन नंबूथिरी-- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:१५ ऑक्टोबर, २०२०)**१९२१:एन.के.पी. साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू:१ एप्रिल २०१२)**१९१९:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:२० फेब्रुवारी २००१)**१९०५:मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू:७ मे २००१)**१९०४:लक्ष्मणराव सरदेसाई-- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू:४ फेब्रुवारी१९८६)**१९०१:कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१:वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू:३ जून १९५६)**१८६९:नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:९ नोव्हेंबर १९४०)**१८६७:महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू:१ जून १९४४)**१८५८:रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू:२९ सप्टेंबर १९१३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:अशोक शेवडे --प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म:२४ जानेवारी १९४४)* *२०१६:आशा अनंत जोगळेकर-- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म:१० सप्टेंबर १९३६)**२०११:दिनकर निलकंठराव देशपांडे-- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म:१७ जुलै १९३३)**२००४:वसंत केशव दावतर- समीक्षक (जन्म:२७ ऑगस्ट १९२५)**२००१:विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१०)**१९७५:हरी रामचंद्र दिवेकर--स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म:५ नोव्हेंबर १८८५)**१९०८:सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म:२५ मे १८३१)**१८९४:रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म:१ जानेवारी १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका वोट ची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, महाराष्ट्रात पाच टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप, या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'जय जय महाराष्ट्र माझा...' हे राज्यगीत आता शाळांमध्ये गायले आणि वाजविले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज:संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमृतवाहिनीच्या डॉ. विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट:कुरडया बनवण्याची नवीन मशीन, एका मिनिटात पाच कुरडया तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात दोन दिवसीय काव्य महोत्सव संपन्न:साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनात दिग्गज कवीयत्रींनी उलगडला 'वारसा साहित्यीकांचा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ? 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात वेगवेगळ्या कारणांनी इंटरनेट बंद करण्यात अव्वल देश कोणता ?२) जगात शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) निवडणूक आयोगाकडून मतदारांना ई - ओळखपत्र देण्यास सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?४) देशात फुलपाखरांच्या एकूण किती प्रजातींची नोंद आहे ?५) जगातील घनदाट जंगल कोणते ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत ३) सन २०२१ ४) १४०० प्रजाती ५) अमेझोन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी आगोड👤 इरफान शेख, धर्माबाद👤 लक्ष्मण नरवाडे👤 सुहास भंडारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली वाट जर सत्याची असेल आणि त्या वाटेत आपल्याला अपमान, बदनाम करून स्वतः चे समाधान करून घेणारे मिळत असतील तर ते, आपले सर्वात मोठे भाग्य समजावे. व तो, आपल्याला मिळालेला मौल्यवान सन्मान समजावा. कारण, ते सर्व सहन करण्याची व त्या वाटेवर चालण्याची प्रत्येकात ताकद नसते.म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तरी आपण निवडलेल्या योग्य त्या वाटेवर चालत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे ?कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का?ते म्हणाले, हो एकच आहे.बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment