✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीतोपचार दिन_* *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना**२०००:ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९:अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४:गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२:नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०:लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२:नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२:गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८२:डॉ.क्षितिज कुलकर्णी-- नाट्य लेखक**१९८५:प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९६५:प्रकाश राज-- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७:सुनील शिवाजी माने-- कवी* *१९५७:हृदय बलवंत चक्रधर-- प्रसिद्ध कवी**१९५६:उमेश कदम-- कादंबरीकार**१९५४:अॅड.विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी,लेखक* *१९४३:प्रा.डॉ.यशवंत मनोहर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक आणि साहित्य समीक्षक**१९३९:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार(मृत्यू:३ आक्टोबर २०२०)**१९०९:बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०००)**१९०७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू:११ सप्टेंबर १९८७)**१८७५:सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५)**१८७४:रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू:२९ जानेवारी १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.विमलताई गाडेकर--विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म:२ फेब्रुवारी १९५१)* *२०१२:माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म:१० मे १९४०)**२०१०:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म:२२ डिसेंबर १९४१)**२००८:बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म:१७ जुलै १९३०)**२००३:हरेन पंड्या-- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९:आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म:११ डिसेंबर १९४२)**१९९७:नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म:९ सप्टेंबर १९१०)**१९९६:के.के.हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११)**१९९६:डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म:७ सप्टेंबर १९१२)**१८२७:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म:१६ डिसेंबर १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील काही थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञ यांची थोडक्यात माहिती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सोलापुरात प्रणिती शिंदे विरोधात भाजपची राम सातपुते यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्ते अॅड. सतीश रोठे यांना राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजितदादांच ठरलं! 28 तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार, राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून दिले तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्यात टँकर 600 पार! विभागातील 399 गावात पाणी टंचाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 चे उर्वरित वेळापत्रक जाहीर, चेन्नई मध्ये होईल अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषणाचा भस्मासुर रोखा* स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल भारतासाठी धक्कादायक आहे कारण या अहवालात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून बिहारमधील बेगुसराई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालाच्या निर्मितीसाठी वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण बारकाईने तपासण्यात आले होते. जगातील १३४ देशांमध्ये बसविण्यात आलेल्या ३० हजार ग्राउंड मॉनिटरच्या माध्यमातून ७३०० शहरांची माहिती संकलित करण्यात आली. या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतर भारतातील प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, बेगुसाराई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले. स्विस संस्थेचा हा अहवाल देशातील नागरिकांची झोप उडवणारा आहे, कारण आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रदूषणामुळे दिल्लीत खेळला जाणारा रणजी सामना रद्द करावा लागला होता. चार वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई - दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल. *- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही - गौतम बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या *'जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम'* मध्ये झाला आहे ?२) भारताच्या अणु कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?३) ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?४) नुकताच चर्चेत असणारा सी. ए. ए. कायदा म्हणजे काय ?५) तैनाती फौजेचा अवलंब इंग्रजांनी सर्वात प्रथम कोणावरती केला ? *उत्तरे :-* १) पंकज अडवाणी २) शांततेसाठी अणु ३) ग्रामसेवक ४) Citizen Amendment Act ५) हैदराबादचा निजाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment