✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/seeQPxsVALxnWC8G/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.**१९९२:उद्योगपती जे.आर.डी.टाटा यांना राष्ट्रपती आर.वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला**१९७९:अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.**१९४२:रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली**१९३०:तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली**१८५४:क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.**१७३७:बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:भरत बलवल्ली--स्वराधीश,एक युवा दिग्गज शास्त्रीय गायक* *१९८२:प्रा.तात्यासाहेब शिवाजी काटकर -- लेखक**१९७५:अक्षय खन्ना--भारतीय अभिनेता**१९७१:प्रा.डॉ.अजय दिनकरराव कुलकर्णी-- लेखक,संपादक* *१९६८:नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९६६:डॅा.संध्या राजन अणवेकर-- कवयित्री, लेखिका* *१९६३:राजकुमार सुदाम बडोले-- माजी मंत्री तथा लेखक* *१९५४:मून मून सेन-- भारतीय अभिनेत्री**१९४९:प्रा.डॉ.विजय पांढरीपांडे -- जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* *१९४४:भारती पांडे-- प्रसिद्ध लेखिका**१९३५:श्रीनिवास हवालदार-- जेष्ठ कवी लेखक* *१९२७:विना मजुमदार-- भारतीय शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या(मृत्यू:३० मे २०१३)**१९२६:पहलान रतनजी " पोली " उमरीगर-- भारतीयक्रिकेट खेळाडू(मृत्यू:७ नोव्हेंबर २००६)**१९२५:राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९८)**१९०३:बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर -- पुराण वांड्:मय,शैक्षणिक व विज्ञानविषयक लेखन(मृत्यू:४ ऑक्टोबर १९७१)**१८६८:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू:१८ जून १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी)--मराठी गायक,कवि,लेखक व कीर्तनकार(जन्म:१९ऑगस्ट, १९२२)* *२०००:शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख**१९९२:आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू(जन्म:२४ नोव्हेंबर १८७७)**१९८८:श्री नाथ त्रिपाठी--भारतीय संगीतकार(जन्म:१४ मार्च १९१३)* *१९८४:विष्णू प्रभाकर लिमये--प्राच्यविद्या अभ्यासक,लेखक,संपादक(जन्म:२८ एप्रिल १९००)**१९४१:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म:२५ जानेवारी १८८२)**१५५२:गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म:३१ मार्च १५०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी चालीरिती आणि आजची परिस्थिती*कोरोना काळात जुन्या चालीरीती ची पुन्हा एकदा ओळख झाली. त्यावर टाकलेला प्रकाश ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची आठ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! आज 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार, मुंबईतील सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळानिमित्त विविध कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SRH ने रचला IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम 277 धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌪 *एल निनोमुळे काय होतं ?* 🌪 ************************शब्दश: एल निनो म्हणजे तान्हुलं बाळ. बाल ख्रिस्ताला उद्देशून हा शब्दप्रयोग केला जातो. पण नाताळच्या सुमारास होणाऱ्या हवामानातील बदलाला उद्देशून आता तो जगभर वापरला जातो. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय विभागातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं. ही वाढ अर्धा अंश सेल्सियसहून अधिक असते. याच्याच जोडीला त्या भागातील हवेच्या दाबातही वाढ होते. या दोन्हींना मिळून वैज्ञानिक परिभाषेत 'एल निनो सदर्न ऑसिलेशन्स' असं भरभक्कम नाव आहे. पण सामान्यजनांच्या भाषेत या नैसर्गिक आविष्काराला 'एल निनो' असंच म्हटलं जातं. साधारण दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवते; पण काही वेळा ती दोन वर्षांतच परत उत्पन्न झालेलीही दिसून आली आहे, तर काही वेळा तीनं पुनरागमनासाठी तब्बल सात वर्ष घेतल्याचंही दिसून आले आहे. याउलट जेव्हा याच भागातील समुद्राच्या पाण्याचं सरासरी तापमान घटतं आणि त्याच्या जोडीला तिथल्या हवेच्या दाबातही घसरण होते तेव्हा त्याला 'ला निना' असे म्हणतात. एल निनो आणि ला निना यांचं अस्तित्व जरी जगाच्या एका अतिशय आडबाजूच्या कोपऱ्यात जाणवत असलं तरी त्याचे परिणाम मात्र जगभराच्या हवामानावर होत असतात. सगळीकडचं हवामान पार बदलून जातं. सामान्यत: जिथं भरपूर पाऊस पडतो तिथं एल निनोच्या प्रभावापोटी अवर्षण होतं, तर कोरडवाहू प्रदेशात पूर येतात. हवामानाच्या या लहरीपणापासून कोणत्याही खंडाची सुटका होत नाही.आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या पावसावरही जाणवेल इतका पडतो. एल निनोच्या प्रतापापोटी मान्सूनच्या व पावसाच्या सरासरीत लक्षणीय घट होते. अलीकडच्या काळातील जवळजवळ प्रत्येक दुष्काळाचं उत्तरदायित्व आपण एल निनोच्या पदरात टाकू शकतो. उलटपक्षी जेव्हा ला निनाची सद्दी असते तेव्हा सरासरीइतका किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडतो. मात्र ला निनाच्या काळात वादळांचं प्रमाणही वाढतं. उलट एल निनो वादळांना अटकाव करतो. एरवीच्या वादळग्रस्त प्रदेशांमध्ये शांततेचा अंमल सुरू असतो.एल निनोचा प्रभाव सहसा सात ते नऊ महिनेच टिकतो. त्यामुळे साधारणत: एकाच वर्षीच्या मान्सूनवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाची परिस्थिती क्वचितच उद्भवते. पण काही वेळा हा दोन दोन वर्षेही टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या अनियमित वागणुकीमुळे त्याच्याविषयी कसलंही भाकीत करणं अशक्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राण्यांना रोख रकमेची गरज नसते, परंतु अशीच तळमळ माणसाला प्राणी बनवते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *न संपणारे ऊर्जा स्त्रोत* कोणते आहे ?२) यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?३) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?४) 'अत्याचार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?*उत्तरे :-* १) सौर ऊर्जा २) पचनसंस्था ३) आत्मवृत्त ४) अन्याय, जुलूम ५) कन्हेरखेड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 स्वानंद बेदरकर, निवेदक, नाशिक👤 अब्राहम खावडिया👤 नामदेव पांचाळ, धर्माबाद👤 श्री पाटील, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर, रिपोर्टर, नांदेड👤 किरण कदम, धर्माबाद👤 प्रल्हाद धडे, अहमदपूर👤 रमेश राजफोडे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुलीवर शिजवत ठेवलेले मग ते कोणतेही पदार्थ असोत. शिजत असताना वेळोवेळी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा वास यायला लागतो. वेळात जर त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर ते खमंग पदार्थ खायला मिळतात. जर त्यांच्याकडे आपण वेळात लक्ष नाही दिले तर मात्र जळलेले पदार्थ हाती लागते.माणसाचेही तसंच आहे जर वेळेवर चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिले तर जीवनाचे सार्थक होते. पण त्याच चांगल्या विचाराकडे व सत्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच वाटेला गेल्याने जीवनाची माती होत असते. त्या चुलीवर शिजत असलेल्या पदार्थांकडून आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आनंदाची गोष्ट*लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाहीच आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ* ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 😊😊😊😊😊😊😊😊 *जीवन हे एकदाच आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment