✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गणित दिवस_**_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६:लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५:महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७:जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६:दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८:आदर्श आनंद शिंदे-- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४:नितीन अरुण थोरात-- प्रसिद्ध कादंबरीकार,बालसाहित्यिक,स्तंभलेखक,पत्रकार,उपसंपादक,कथालेखक* *१९७६:गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी,लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९:साधना सरगम किंवा साधना घाणेकर-- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४:छाया भालचंद्र उंब्रजकर-- कवयित्री,लेखिका* *१९५८:अनिल शर्मा-- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५:अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५:ज्योत्स्ना आफळे --कवयित्री,लेखिका* *१९५२:सर विवियन रिचर्ड्स–वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९:गुलाम नबी आझाद-- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२:वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक,हस्ताक्षरतज्ञ* *१९४०:प्रा.वसंत सुदाम वाघमारे-- कवी* *१९३८:मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे-- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू:६ आगस्ट २०२०)* *१९३४:नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३:आत्माराम कृष्णाजी सावंत-- मराठीतले लेखक,नट,नाटककार,दिग्दर्शक, पत्रकार(मृत्यू:४ मार्च१९९६)* *१९३१:प्राचार्य डॉ.मधुकर सुदाम पाटील-- समीक्षक* *१९२८:डॉ.केशव रामराव जोशी-- संस्कृत पंडित,तत्त्वचिंतक (मृत्यू:१२ जून २०१३)**१९२५:रवींद्र केळेकर-- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू:२७ ऑगस्ट, २०१०)**१९१८:स्नेहलता दसनूरकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:३ जुलै २००३)**१९१३:डॉ.सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे-- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका(मृत्यू:८ ऑगस्ट १९९८)**१९११:सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू:४ एप्रिल १९८७)**१९०३:रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर-- संस्कृत पंडित (मृत्यू:२० एप्रिल १९४१)**१९०२:शंकर भास्कर जोंधळेकर-- लेखक* *१८९६:यशवंत गंगाधर लेले-- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०:नारायण कृष्ण गद्रे-- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी,चरित्र,इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे(मृत्यू:१४ जुलै १९३३)**१८४९:ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू:११ एप्रिल १९२६)**१७९२:सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू:११ मे १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म:३ मार्च १९२६)**२०००:प्रभाकर तामणे– साहित्यिक व पटकथालेखक (जन्म:२९ आक्टोबर १९३१)**१९९६:नीळकंठ जनार्दन कीर्तने-- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार,चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक(जन्म:१जानेवारी १८४४)**१९९३:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १९००)**१९६१:गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे पहाडी पुरूष,भारतरत्न (१९५७)(जन्म:१० सप्टेंबर १८८७)**१९२२:गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते,शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म:१५ ऑगस्ट १८६७)**१६४७:दादोजी कोंडदेव-- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक(जन्म:१५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 56 कोटी 80 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय खेळी ; महायुतीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा फोटोबायोग्राफी पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संविधानाचे रक्षण हाच आमचा जाहीरनामा:पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; इंडिया आघाडी व समविचारी संघटनांची साताऱ्यात बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी, गुरुवारी मध्यरात्री होणार महापूजा, शुक्रवारी पहाटे दोन वाजल्या पासून मंदिर होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रकाश आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका; वंचितच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा 9 मार्च रोजी निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्मशालेत आजपासून भारत व इंग्लंड यांच्यातील शेवटचा पाचवा कसोटी सामना, बुमराहचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••2. नाश्ता करणं टाळणे -रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं. म्हणून नाश्ता करणे मेंदूसाठी चांगली गोष्ट आहे. या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे. क्रमशः *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे शिखर पार करणारे, जास्त वेळ विश्रांती घेत नाहीत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा पहिला *वनभूषण* पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) गोंदिया जिल्ह्यातील 'पुस्तकांचे गाव' म्हणून कोणत्या गावाची निवड झाली आहे ?३) पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली ?४) तापी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) "महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे," अशा शब्दात महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ? *उत्तरे :-* १) चैत्राम पवार, बारीपाडा, जिल्हा - धुळे २) नवेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव ३) शाहबाझ शरीफ ४) गिरणा, पूर्णा ५) कवयित्री महादेवी वर्मा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोवर्धन शिंदे👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ओळखारे वस्तु सांडारे कल्पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे वेळोवेळा ॥३॥घ्यावे आत्मसुख स्वरुपी मिळावे । भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment