✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EMQKpdbbxWmoFLTc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वन दिवस_**_जागतिक काव्य दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_२१ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी २१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली._**२००३:जळगाव महानगरपालिका अस्तित्वात आली**२०००:फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला**१९९०:नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.**१९८०:अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.**१९७७:भारतातील आणीबाणी संपुष्टात आली**१९३५:शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.**१८७१:ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.**१८५८:इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.**१६८०:शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: हेमंत ढोमे -- अभिनेता,दिग्दर्शक* *१९७८:राणी मुखर्जी – अभिनेत्री**१९७६:प्रा.डॉ.नोमेश मेश्राम -- कवी* *१९७१:प्रदीप नारायण विघ्ने-- कवी,लेखक* *१९६७:हेमंत दिवटे -- प्रसिद्ध कवी,अनुवादक* *१९६०:राजेश महाकुलकर -- कवी,लेखक* *१९४६:ॲड.राम हरपाळे -- लेखक, व्याख्याते* *१९३४:बुटासिंग-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९२९:श्रीपाद गंगाधर कावळे-- कवी (मृत्यू:२००१)**१९२८:राम पटवर्धन-- मराठी अनुवादक आणि संपादक(मृत्यू:३ जून २०१४)**१९२१:चंद्रकांत कल्याणदास काकोडकर-- कादंबरीकार(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९८८)**१९१६:उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ-- भारतातील प्रख्यात शहनाई वादक,भारत रत्न (मृत्यू:२१ ऑगस्ट २००६)**१९१३:मनोहर महादेव केळकर-- लेखक* *१९१२:ख्वाजा खुर्शीद अन्वर-- पाकिस्तानी चित्रपट निर्माता,लेखक,दिग्दर्शक आणि संगीतकार(मृत्यू:३० ऑक्टोबर १९८४)**१८८७:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू:२६ जानेवारी १९५४)**१८४७:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे,विज्ञानप्रसारक,लेखक (मृत्यू:२ डिसेंबर १९०६)**१७६८:जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ मे १८३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वंदन राम नगरकर--प्रसिद्ध एकपात्री कलाकार,लेखक,व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ (जन्म:२४ मार्च१९६१)**२०१०:पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म:२९ मार्च १९२६)**२००५:दिनकर द.पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९१५)**१९९२:मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(जन्म:३० जून १९१२)**१९८५:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म:२० मार्च १९०८)**१९७४:श्रीधर बाळकृष्ण रानडे --मराठी कवी,रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(जन्म:२४ जून १८९२)**१९७३:यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म:१७ एप्रिल १८९१)**१९७३:शंकर घाणेकर--’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(जन्म:१० फेब्रुवारी १९२६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक काव्य दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी अधिसूचना, १९ एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पण मी कोणाकडेही उमेदवारी मागणार नाही, मी स्वबळावर लढणार - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 मधून DRS आऊट, नवीन SRS सिस्टीम, उद्यापासून IPL 2024 चा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बाळाची गर्भावस्था व पोषण* 📙 मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते. माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात. याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात, बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते व या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो. त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो. पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*७२४६)* जगात प्रदूषणात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*७२४७)* १८७०साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ?*७२४८)* ओरिसाच्या किनारी भागास काय म्हणतात ?*७२४९)* महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन करण्यात आली आहे ?*७२५०)* भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणते ? *उत्तरे :-* *७२४६)* तिसरा *७२४७)* महात्मा फुले *७२४८)* उत्कल *७२४९)* सोलापूर *७२५०)* अरवली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव कदम, बाभळी, धर्माबाद👤 शिवा जी. गुडेवार👤 पी. अनिल, तेलंगणा👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक👤 प्रवीण बडेराव👤 हर्षल जाधव👤 संतोष खोसे, उस्मानाबाद👤 गणेश धुप्पे👤 विलास सोनकांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी देणारे कमी होते पण,घेणारे मात्र जास्त होते.आज त्याही पेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. म्हणून कधी घेणाऱ्यांना पुजले जाते का. ..? या विषयी विचार करण्याची गरज आहे. कारण, देणाऱ्यांनाच दाता म्हणतात घेणाऱ्याला नाही. घेण्यासाठी तर आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सर्वांत श्रेष्ठ समजून देण्यासाठी वेळ, आपले हात,नि:स्वार्थ भावना व मन स्वच्छ, असणे आवश्यक आहे. घेण्यासाठी कुठेही वणवण भटकावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान* एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा." कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली. *तात्पर्य :* कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment