✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JdKrJqvPkP3Js49M/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९२९:भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.**१८५६:पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले**१८४२:अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.**१७२९:थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.**१६६५:पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६७:नागेश कुकुनूर--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता,पटकथा लेखक**१९६५:फ़िरोज़ ए.नाडियाडवाला-- भारतीय फिल्म निर्माता**१९६०:राजन लाखे -- प्रसिद्ध लेखक व कवी* *१९५१:पं.भीमराव पांचाळे-- सुप्रसिद्ध मराठी गजलगायक मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळांचे आयोजन**१९४७:प्रा.दिलीप परदेशी--नाटककार व साहित्यिक(मृत्यू:४ नोव्हेंबर २०११)**१९४६:ए.के.शेख -- प्रसिद्ध गझलकार,कवी संपादक**१९४२:वसंत आबाजी डहाके – प्रसिद्ध भाषातज्ज्ञ,कोशकार,सुप्रसिद्ध लेखक आणि कवी,फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष**१९४१:अशोक परांजपे--महाराष्ट्रातील लोककला संशोधक,गीतकार,नाटककार.(मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९४०:अशोक महादेव जोशी-- कृषिलेखक, बालसाहित्यिक (मृत्यु:मार्च २०१४)**१९३०:ॲड.एकनाथ पांडुरंग साळवे-- चंद्रपूरचे माजी आमदार,‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक (मृत्यू:१४ मार्च २०२१)**१९३०:मधुकर श्रीपाद माटे-- पुरातत्त्व, इतिहास,वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक(मृत्यू:२३ एप्रिल २०१९)**१९२८:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक,लेखक (मृत्यू:१६ मार्च २०१०)**१९०८:देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू:९ मार्च १९९४)**१९०६:जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के.एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण (मृत्यू:१७ डिसेंबर १९६५)**१८९९:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू:२२ सप्टेंबर १९७०)**१८९८:काशिनाथ रघुनाथ वैशंपायन--शिक्षक, लेखक (मृत्यू:८ नोव्हेंबर १९८५)**१८९५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मनोहर श्याम जोशी-- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक(जन्म:९ ऑगस्ट,१९३३)* *२००२:आनंद बक्षी – सुप्रसिद्ध गीतकार (जन्म:२१ जुलै १९२०)**१९९३:साबानंद मोनप्पा अर्थात एस.एम.पंडित -- चित्रकार (जन्म:२५ मार्च१९१६)**१९८९:गजानन वासुदेव तथा ’ग.वा.’बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (जन्म:२४ सप्टेंबर १९२२)**१९७६:रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९१८)**१९६९:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म:२६ जुलै १८९४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज डॉक्टर डे त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *डॉक्टर : देव की दानव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत; साताऱ्याचा उमेदवार दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MHT CET 2024 - लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - KKR ने RCB ला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फिजिओथेरपी 📙एकविसाव्या शतकात 'फिजिओ'ला म्हणजे फिजिओ-थेरेपिस्टला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन तेंडुलकरचे लंगडणे असो, शोएब अख्तरचा खांदा दुखावणे असो किंवा बेकहॅमची पाठ दुखावणे, तात्काळ थेट ग्राऊंडवर येऊन खेळाडूला काही पाच मिनिटात खेळता येणारा हा थेरपिस्ट आपण थेट दूरचित्रवाणीवरही पाहतो. वेळेची प्रचंड निकड असलेल्या घाईगर्दीच्या जमान्यात आजारपणानंतरची विश्रांती, हाडांच्या वा स्नायूंच्या दुखापतीनंतरचा आराम हा प्रकारच नाहीसा होत चालला आहे. डॉक्टरी इलाज चालू असताना किंवा ते संपल्यावर शरीरातील विविध सांधे, स्नायू वा आवश्यक हालचाली संतुलितरित्या करवून घेणे व त्यामुळे कमजोर झालेल्या स्नायूंना बळकटी आणून पूर्ववत बनवणे हे फिजिओथेरपिस्टचे काम असते. शास्त्रशाखेतील बायोलॉजी घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण चार वर्षांचे शिक्षण घेऊन फिजिओथेरपिस्ट बनता येते. शरीररचना, शरीरक्रिया, स्नायू हाडे, मज्जासंस्था व मेंदू या संदर्भातील बारकावे समजून घेतल्यावर मग फिजिओथेरपीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष सुरू होते. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल वाचणे व त्यांचा अर्थ लावणे हाही भाग त्यात येतोच.एखादे हाड मोडल्यानंतर त्यावरचे उपचार जरी अस्थिरोगतज्ज्ञ करत असले, तरी त्या दरम्यान व त्यानंतर या रुग्णास स्वतःचे व्यवहार आधाराने, वॉकरच्या साहाय्याने, कुबडी व काठीच्या सहाय्याने करायला शिकवणे शरीरातील स्नायूंची कमजोरी सुरू होण्याच्या आतच तिला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते. हे काम फिजिओ करीत असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या खांद्याचे महत्त्वाचे स्नायू म्हणजे डेल्टॉइड याचा वापर जेमतेम पाच ते सहा दिवस न झाल्यास त्याचा आकार व गोलाई कमी होऊन तो रोडावू लागतो. यालाच 'मसल वेस्टिंग' असे म्हणतात. असाच प्रकार पायाच्या गुडघ्यावरील चतुरस्क स्नायूच्या बाबतीतही तिव्रतेने होतो. त्यामुळे हात मोडला म्हणून गळ्यात अडकवला वा पायाच्या इजेमुळे गुडघ्यांच्या हालचाली थांबल्या तर हे वाळत गेलेले स्नायू पूर्ववत व्हायला काही आठवडे लागतात. प्लॅस्टर असतानाही किंवा काढल्यावर यासाठी व्यायाम फिजिओ करवून घेतो.न्यूमोनियाच्या रुग्णाला छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे व्यायाम, मेंदूच्या आजारामुळे विविध स्नायूंवरील गेलेले नियंत्रण परत मिळवणे अर्धांगवायू झालेल्याला स्वतःच्या हालचाली करायला शिकवणे इत्यादी गोष्टी या अभ्यासक्रमात येतात. प्रगत अभ्यासक्रमात ऑक्युपेशनल म्हणजेच विविध व्यवसायांशी संबंधित आजाराच्या संदर्भातील उपचार, विविध खेळासंदर्भातील दुखापतींवर उपचार, बालकांच्या अनियंत्रित हालचालींवर उपचार अशा निरनिराळ्या उपशाखांत विशेष प्रशिक्षण मिळते.सध्या फिजिओ अनेक प्रकारच्या यंत्रांचाही वापर करीत असतो. पूर्वापार चालत आलेली शरीरातील विविध स्नायूंकडुन हालचाली करून घेणारी, ताण देणारी यंत्रे वा उपकरणे आता कमी वजनाची, सहज घरीही हाताळता येणारी अशी झाली आहेत. पण त्याचबरोबर प्रगत अशा अल्ट्रासॉनिक वेव्हज, मसल स्टिम्युलेटर्स, शॉर्टवेव्ह डायाथर्मी, मज्जासंस्थेतील संवेदनाचा वेग व व्याप्ती मोजणारी यंत्रे अशांची मदत घेऊन उपचार केले जातात.आधुनिक उपचारपद्धतीत ज्यावेळी रुग्ण तीनपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात मुक्काम वाढवतो, तेंव्हा फिजिओथेरपिस्ट बहुधा त्याच्या संपर्कात येतो. खाटेवर पडून राहणे, शरीराने नको तितका आराम करणे आधुनिक वैद्यकशास्त्र तब्येतीला घातक समजते, हेच त्यामागचे कारण आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही, ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'निर्मानोंके के पावन युग में'* या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत ?२) बाघ व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?३) जगभरात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?४) 'अमृत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) मानवी शरीराच्या बाहेरच्या त्वचा आवरणास इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) अटल बिहारी वाजपेयी २) काटी, गोंदिया ३) ७,१०२ भाषा ४) पीयूष, सुधा, संजीवनी ५) एपिडर्मीस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उत्कर्ष देवणीकर, उमरगा👤 अनिल पवार👤 गुरुनाथ तुकाराम यादव, नांदेड👤 लक्ष्मीकांत बेंकट, करखेली👤 वैभव कण्हेरकर, अमरावती👤 रजनीश सिंग👤 दुष्यंत सोनाळे, मा. नगरसेवक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती स्वतः चा विचार न करता सत्याच्या वाटेवर चालत इतरांसाठी जगत असेल तर तिला पूर्णपणे समजून न घेता लावारिस, लोफर, खोटारडा, बिनकाम्या, मूर्ख अशा अनेक शब्दांनी त्याची प्रतारणा करणे हे कितपत योग्य आहे. ? अभिव्यक्तीचा इतका स्वैराचार कोणीही करु नये. विचारांची मर्यादा माणसाने ओलांडू नये.जी, व्यक्ती दुसऱ्याला त्या शब्दात बोलून मोकळी होऊन जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती स्वतः मधील माणुसकी विसरलेली असते. म्हणून इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर सर्वच चांगले दिसून येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."*तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment