✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/DNBeSW9VzgvdCbcM/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली**१९९०:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्न’**१९७३:कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.**१९५७:भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.मैल,फर्लांग,फूट,पाऊंड,शेर,आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली.६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.**१९५५:गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.**१९३६:ओरिसा राज्याची स्थापना झाली**१९३५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली**१९३३:भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण**१९२८:पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.**१९१२:भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली झाली* *१८८७:मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली**१६६९:उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महादेव माने -- लेखक* *१९७४:रामेश्वर परशराम घोलप -- लेखक**१९७१:रतन मोतीराम आडे-- प्रसिद्ध कवी* *१९६८:प्रा.डॉ.प्रेमाला रमेश मुखेडकर-- लेखिका* *१९६७:अयुब पठाण लोहगावकर-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:उमेश मोहिते-- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९६३:शोभा वेले-- कवयित्री,लेखिका* *१९६०:किशोर रामदास मेढे -- प्रसिद्ध कवी, अनुवादक* *१९५७:डेव्हिड इव्हॉन गोवर-- इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५६:डॉ.जयमाला चंद्रशेखर डुंबरे -- लेखिका* *१९५४:प्रा.विश्वनाथ श्रीधर बापट(विसूभाऊ)- प्रसिद्ध एकपात्री कलाकार,कवी,लेखक**१९५१:सुभाष वामन अहिरे-- कवी* *१९४३:प्रा.जोगेंद्र लक्ष्मण कवाडे-- माजी खासदार,आमदार,सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ,पत्रकार* *१९४२:जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील-- ज्येष्ठ अर्थतज्ञ,समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष,लेखक (मृत्यू:७ डिसेंबर २०२२)* *१९४१:अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कप्तान**१९३९:डॉ.तारा भवाळकर-- वैचारिक लेखन करणाऱ्या जेष्ठ,प्रसिद्ध मराठी लेखिका**१९३८:वामन गोविंद होवाळ--कथाकार**१९३७:मोहम्मद हमीद अन्सारी-- भारताचे माजी उपराष्ट्रपती**१९३६:तरुण गोगोई – आसामचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२३ नोव्हेंबर २०२०)**१९१९:शांता भास्कर मोडक-- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका(मृत्यू:२८ एप्रिल२०१५)**१९००:न्या.सुरेश वसंत नाईक-- लेखक,कवी**१८८९:डॉ.केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू:२१ जून १९४०)**१८१५:ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू:३० जुलै १८९८)**१६२१:गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.(मृत्यू:२४ नोव्हेंबर १६७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:कैलाश वाजपेयी-- प्रतिभावान हिंदी कवी(जन्म:११ नोव्हेंबर १९३६)**२०१२:एन.के.पी.साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे माजी अध्यक्ष (जन्म:१८ मार्च १९२१)**२०१२:प्रा.द.सा.बोरकर-- झाडीबोली साहित्यांचे अभ्यासक कादंबरीकार,कवी (जन्म:२८ जुलै १९३९)**२००८:प्राचार्य राम डोके--जेष्ठ विनोदी साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ(जन्म:१६ फेब्रुवारी १९२७)**२००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार चरित्रकार (जन्म:११ डिसेंबर १९२५)**२०००:संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९१६)**१९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: १९१५)**१९८९:रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर--भाषातज्ज्ञ, संशोधक,संस्कृत पंडित(जन्म:१ जानेवारी १९००)**१९८९:श्रीधर महादेव तथा एस.एम.जोशी – समाजवादी,कामगार नेते,पत्रकार(जन्म:१२ नोव्हेंबर १९०४)**१९८४:दत्ता भट-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक(जन्म:२४ डिसेंबर १९२४)**१९८४:पं.नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:४ एप्रिल १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रोजच होतंय एप्रिल फुल*एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंगोली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज ता. ३ एप्रील रोजी दाखल करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाथषष्ठी सोहळा, 7 लाख भाविकांची मांदियाळी : भानुदास एकनाथांच्या गजराने दुमदुमली पैठण नगरी, टाळ-मृदगांच्या तालावर वारकऱ्यांना धरला ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ पुन्हा अडचणीत ? अंजली दमानियांच्या प्रयत्नांना यश, सरन्यायधीशांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याची आज सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत राजभवनमध्ये राज्यपालांच्या हस्ते 61 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - गुजरातचा हैद्राबादवर सात विकेटनी विजय तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 30 धावाने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *फुफुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठा माणूस तोच जो आपल्या सोबत्याना कधीही छोटा समजत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४* मध्ये कोणता खेळाडू *भारताचा ध्वजवाहक* असणार आहे ?२) जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ?३) भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?४) 'अवर्षण' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) कोणता देश पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होत आहे ? *उत्तरे :-* १) शरथ कमल २) २.४२ टक्के ३) बेंगळुरू ४) दुष्काळ, पाऊस न पडणे ५) सौदी अरेबिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 साईनाथ कंदेवाड👤 विनायक भाई राजयोगी👤 दत्ता वंजे, साहित्यिक, नांदेड👤 सदाशिव मोकमवार, धर्माबाद👤 हरिहर पाठक👤 शीतल संखे, शिक्षिका, पालघर👤 गिरीष पांपटवार, धर्माबाद👤 प्रकाश नांगरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. सतीश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील, साहित्यिक, जळगाव👤 रवी कोटूरवार, धर्माबाद👤 संध्या जीरोनेकर👤 कुणाल सोनकांबळे👤 दिगंबर जगदंबे👤 मनीषा जोशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोड फळाला लवकर कीड लागत असते तसंच कडू असलेल्या फळाला सुद्धा कीड लागत असते.फरक एवढेच की, कीड गोडाला पूर्ण संपवून टाकते पण, कडू फळाला मात्र पूर्णपणे संपवू शकत नाही कारण त्याचा अर्कच एवढे कडू असते की, उशीरा का होईना त्या किडीवर भारी पडत असतो. आपण सुद्धा त्या कडू असलेल्या अर्क कडून शिकण्याचा प्रयत्न करावे कारण तोच अर्क त्या फळाला किटका पासून वाचवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका, आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा !!!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment