✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - समुहात add होण्यासाठी https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सागरी दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७:कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५:प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९:भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०:२४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९:राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३:दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:मुग्धा वैशंपायन-- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३:प्रा.केशरचंद नारायण राठोड -- लेखक,कवी* *१९८५:आरती सिंग-- अभिनेत्री* *१९८०:नरेंद्र पाटील--- कवी**१९७९:प्रज्ञाधर ढवळे-- कवी**१९७७:रुपाली गांगुली-- भारतीय अभिनेत्री**१९७५:प्रा.डॉ.विनोद देवचंद राठोड-- लेखक, कवी**१९७१:संदीप नारायण राक्षे-- कवी,लेखक, चित्रपट निर्माता**१९६९:महेश रामराव मोरे- कवी, कादंबरीकार* *१९६३:उषा नाईक-- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१:प्रशांत पुरुषोत्तम दामले-- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू:३१ऑगस्ट २०००)* *१९५३:अनुराधा कौतिकराव पाटील-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९४९:डॉ.राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७:प्रकाश देशपांडे-- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७:शाहीर विजय रामचंद्र जगताप-- प्रसिद्ध शाहीर,लेखक,संपादक**१९४६:आनंद बाबू हांडे-- प्रसिद्ध लेखक**१९४२:मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०:वासंती अरुण मुझुमदार-- ललितलेखिका,कवयित्री(मृत्यू:७ नोव्हेंबर २००३)**१९३६:वसंत कोकजे--लेखक,कवी**१९३०:राम विठ्ठल नगरकर-- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू:८:जून १९९५)**१९२३:शांता मुकुंद किर्लोस्कर-- कथाकार,कादंबरीकार,संपादक(मृत्यू:१५ सप्टेंबर २००७)**१९२०:डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू:९ जुलै २००५)**१९२०:आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००४)**१९०९:अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू:२७ जून १९९६)**१९०८:बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू:६ जुलै १९८६)**१८९०:आनंदराव कृष्णाजी टेकाडे-- कवी, गीतकार (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९६४)**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार)-- संशोधक,लेखक (मृत्यू:१२ आक्टोबर १९६३)**१८५६:बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक,वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९१५)**१८२७:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू:१० फेब्रुवारी १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अनिस चिस्ती-- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे,तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३:राम उगावकर-- कवी,शाहीर,गीतकार (जन्म:५ मार्च१९२९)**२००२:मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती,जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म:१९४६)**१९९८:रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६:भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३:दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म:२५ फेब्रुवारी १९७४)**१९९२:सॅम वॉल्टन-- वॉलमार्टचे संस्थापक(जन्म:२९ मार्च १९१८)**१९६४:गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म:१२ फेब्रुवारी १८७१)**१९२२:पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९१७:शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर* *_शुभ शुक्रवार _* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फोर्ब्सनुसार 37 वर्षीय निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड - उमेद स्वयंसहाय्यता समूहातल्या दोन लाख महिलांनी घेतली शंभर टक्के मतदान करण्याची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे 28 दिवसात 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारत पुढील तीन वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने परभणीतील उमेदवार अचानक बदलला; हवामान अभ्यासक पंजाबराव डख रिंगणात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंजाबने गुजरातला हरविले, मोठी धावसंख्या केली चेस*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातूनl*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना *'राष्ट्रसंत'* हा किताब कोणी दिला ?२) IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?३) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?४) 'अहंकार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२३ या वर्षाचा 'सरस्वती सन्मान पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. राजेंद्र प्रसाद, १९५५ २) शॉन टेट, राजस्थान रॉयल्स, २०११, १५७.७१ किमी प्रतितास ३) कुशाण ४) गर्व, घमेंड ५) प्रभा राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संग्राम निलपत्रेवार, नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत, शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसत, खेळत रहाणे जीवन आहे. पण,इतरांचे हसते, खेळते जीवन बघून त्यात संकटे बनून त्यांचे सुखाचे, समाधानाचे दिवस उद्धस्त करणे व आपण स्वतः आनंदी होणे याला जीवन जगणे म्हणत नाही. तर स्वतः पेक्षा इतरांच्या दु:खात आपुलकीने सहभागी होऊन त्यांचे दुःख आपले दुःख हीच भावना मनात ठेवल्याने जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. म्हणून कोणाच्याही जीवनात संकटे बनून राहण्यापेक्षा त्यांच्या जीवनातील संकटे कशाप्रकारे दूर करता येईल यासाठी माणुसकीच्या नात्याने एकदा तरी प्रत्येकांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण, कोणत्याही संकटांना येण्यासाठी आमंत्रण द्यावे लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतोचांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाहीन राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment