✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५:सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१:मायकेल जॉन क्लार्क-- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९:गणेश भारतराव रासने-- लेखक* *१९७६:अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३:श्याम श्रीराम ठक-- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१:बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६९:अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७:प्रा.अविनाश राजाराम कोल्हे-- प्रसिद्ध लेखक**१९५३:रवींद्र दामोदर लाखे-- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२:दीपक पराशर--भारतीय अभिनेता**१९५२:भारती बाबुराव हेरकर-- कवयित्री,लेखिका**१९५२:प्रा.अशोक नारायणराव आहेर-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९५१:डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका,समीक्षक* *१९५०:मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र)-- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२:किरण नगरकर--भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू:५ सप्टेंबर २०१९)* *१९२६:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९७९)**१९२०:नानासाहेब शिरगोपीकर-- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू:१४ ऑक्टोबर १९९४)**१९१०:शंकर दत्तात्रय भोसले-- कवी,लेखक(मृत्यू:१६ जून १९७२)**१९०७:गजानन जहागीरदार ---मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ऑगस्ट १९८८)**१९०२:बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत.(मृत्यू:२५ एप्रिल १९६८)**१८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू:२३ जून १९९०)**१८८४:विनायक सीताराम सरवटे-- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक(मृत्यू:२६ जानेवारी १९७२)**१८७५:वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू:१८ ऑगस्ट १९४०)**१८०५:हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू:४ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म:१ सप्टेंबर १९५९)**२००९:गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म:८ जून १९१७)**२००५:पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म:१८ मे १९२०)**१९९२:आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८:मनू गंगाधर नातू--समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १९१९)**१९३३:के.एस.रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म:१० सप्टेंबर १८७२)**१८७२:सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म:२७ एप्रिल १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोकराव चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जीएसटी महसूल दरवर्षी वाढत आहे, मार्च 2024 मध्ये, जीएसटीमध्ये 11.5 टक्के वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त, नवीन आर्थिक वर्षात पहिल्याच दिवशी मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - वानखेडे स्टेडियम मध्ये खेळलेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा 6 विकेटने केला पराभव, मुंबईचा सलग तिसरा पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२४* कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) भारतातील पहिला कृतिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट कोणता ठरला आहे ?३) खानदेशामध्ये भिल्लांचे नेतृत्व कोणी केले ?४) 'अविरत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) नर्नाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?*उत्तरे :-* १) डॉ प्रदीप महाजन २) इराह ३) कजारसिंग ४) सतत, अखंड ५) अकोला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव शिरसाठ, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी, फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत, साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार, शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे, साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment