✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-parth-bawskar-on-shree-ram-ramnavami/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक वारसा दिन_* *_ या वर्षातील १०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे,गुहा,लेणी,किल्ले,स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४:वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०:झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१:एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४:गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०:आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६:पेशव्यांची राजधानी असणार्या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०:क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०:आज काहीही बातमी नाही असे बी. बी.सी.या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७:पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४:सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२:’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८:जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३:मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१:’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०:शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.**१७०३:औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शेखर गिरी-- कवी,गझलकार* *१९७६:किरण शिवहर डोंगरदिवे-- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५:नेहा बाजपेयी--भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१:गणेश विठ्ठलराव कुंभारे-- कवी,लेखक**१९६७:विद्या बनाफर -- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनिल सूर्या-- कवी,कथाकार**१९६५:प्रा.डॉ.निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५:सविता प्रभुणे--- भारतीय अभिनेत्री* *१९५८:माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९९)**१९५६:पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०:अलका चंद्रकांत दराडे-- कवयित्री,लेखिका**१९४७:महेंद्र संधू--भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक,ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७:वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन--कथाकार, कादंबरीकार,नाटककार,प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६:ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८)**१८५८:महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण,भारतरत्न (मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२)**१८९९:काशीनाथ श्रीधर नायक-- कोंकणी कवी,प्रकाशक व मुद्रक**१७७४:सवाई माधवराव पेशवा-- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म(मृत्यू:२७ आक्टोबर १७९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म:२२ आक्टोबर १९४२)**१९९५:पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक**१९७२:डॉ.पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, (जन्म:७ मे १८८०)**१९६६:जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म:३० ऑगस्ट १८८३)**१९५५:अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ मार्च १८७९)**१८९८:दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म:२४ जून १८६९)**१८८६:बजाबा रामचंद्र प्रधान-- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी(जन्म:१८३८)* *१८५९:१८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म:१८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने दैनिक सामना मध्ये प्रकाशित श्री पार्थ बावसकर यांचा वाचनीय लेख*भारतीय लोकजीवनाचा आदर्श*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिरीष घाटपांडेंना अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार:तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ, प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी स्वामींनी घेतला आढावा; संभाजीनगरातील वाहतूक मार्गात उद्यापासून असणार बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - दिल्ली कॅपिटलने गुजरात टायटनचा केला 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भाजीपाला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?२) देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते, अशा भागांना काय म्हणतात ?३) कोणत्या देशाची टोपण नावे Lion City, Garden City, Red Dot अशी आहेत ?४) 'आस' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतातील पहिला विमानतळ कोणता ? *उत्तरे :-* १) भाजीमंडई २) केंद्रशासित प्रदेश ३) सिंगापूर ४) इच्छा, मनीषा ५) जुहू विमानतळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गझलकार शेखर गिरी👤 मनोज खुटे👤 देवराव पाटील कदम👤 योगेश मरकंटी👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनारे👤 बालाजी गादगे, शिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो किंवा मोठे शेवटी काम ते कामच असते. असे, अनेकदा ऐकण्यात तसेच वाचण्यात आले आहे. .हाती घेतलेले काम पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व स्वतः वर विश्वास ठेवून केल्यावर आपल्याला जो, समाधान मिळते तोच समाधान जगावेगळा असते. म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नये व मिळालेल्या यशाला गर्वाच्या भोवऱ्यात अडकवून ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरा शिष्य कोण ?*एकदा दोन तरुण स्वामीविवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींनासांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले– पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाहीतुम्ही कठोर आहात” वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचेशिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीलापूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोषदेणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्यादिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणूनस्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठाहवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.”तात्पर्यः कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment