✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/premier/juna-furniture-movie-review-mahesh-manjrekar-film-entertainment-news-pvk21••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय नृत्य दिन_* *_ या वर्षातील १२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:मध्यप्रदेशमध्ये मलखांबाला राज्य खेळाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* *१९९१:बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.**१९४५:दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली**१९३३:’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:प्रियदर्शन जाधव-- मराठी अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक* *१९७९:आशिष नेहरा-- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज तथा प्रशिक्षक**१९७२:तुषार जोशी-- कवी* *१९७१:आनंद भाटे-- किराणा घराण्याचे भारतीय शास्त्रीय गायक**१९७०:आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू**१९६६:फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज**१९६५:हेमंत मधुकर डांगे -- प्रसिद्ध कवी,गझलकार, लेखक* *१९६३:डॉ.सुधीर राजाराम देवरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,संपादक,अहिराणी भाषा संशोधक**१९५७:दीपक शिर्के-- भारतीय अभिनेता* *१९५२:माधुरी बळवंत पुरंदरे--भाषांतरकार, चरित्रकार,संपादक,नृत्य,नाटक,लेखन,गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान* *१९५०:अनिलकुमार तुळशीरामपंत काटकर-- लेखक**१९४६:अजित जोगी-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,छत्तीसगडचे मुख्यमंत्री (मृत्यू:२९ मे २०२०)* *१९४६:रवींद्र गुर्जर-- जेष्ठ साहित्यिक,मराठी अनुवादक-लेखक* *१९४६:पं.प्रदीप नाटेकर -- ज्येष्ठ गायक**१९४३:चंद्रकांत मेहेंदळे-- नव्या रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे,अनेक नाट्य स्पर्धांसाठी परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी(मृत्यू:३० मे २०२०)**१९३६:झुबिन मेहता – भारतीय संगीतकार**१९२४:पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे --मराठी लेखक,संपादक**१९१५:सीताराम किसन उके-- भक्ती गीते (मृत्यू:६ जून १९५०)**१९११:अनंत हरी लिमये --लेखक(मृत्यू:२३ जानेवारी १९७४)**१९१०:अरविंद गंगाधर मंगरूळकर--- संपादक,संशोधक,समीक्षक(मृत्यू:२७ मे १९८६)**१९०१:मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू:७ जानेवारी १९८९)**१८६७:डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (मृत्यू:७ एप्रिल १९३५)**१८४८:राजा रविवर्मा – चित्रकार (मृत्यू:२ आक्टोबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इरफान खान-चित्रपट अभिनेता (जन्म:७ जानेवारी १९६७)**२००६:जे.के.गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म:१५ आक्टोबर १९०८)**१९९९:मोहन वसंत गोखले-- मराठी अभिनेते-दिग्दर्शक(जन्म:७ नोव्हेंबर १९५३)**१९८०:श्रीकृष्ण केशव क्षीरसागर – लेखक, विचारवंत,समीक्षक(जन्म:६ नोव्हेंबर १९०१)**१९८०:सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १८९९)**१९६०:पं.बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. (जन्म:८ डिसेंबर १८९७)**१९४५:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म:७ आक्टोबर १९००)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भावनाप्रधान, हृदयस्पर्शी कथा; 'जुनं फर्निचर' चित्रपट*महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने कौटुंबिक व सामाजिक असा उत्तम चित्रपट दिला आहे. ही कथा आहे निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या गोविंद राठोड या ज्येष्ठ नागरिकाची. ..... पूर्ण Review वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी केली आरोपीं विरोधात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर - सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी भाषेच्या शुध्दीकरणाची प्रक्रीया निश्चित व्हावी - ज्येष्ठ मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद; सर्वाधिक 20 रुग्ण धुळ्यातील, नाशिकचे तापमानही उच्चांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या विराट विजयात जॅक्स चमकला, गुजरातची धुलाई करत चार षटकं राखून सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अंमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संताप हा अग्नीसारखा माणसाला जाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुळस ही वनस्पती कशाचे प्रतीक मानले जाते ?२) तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला काय म्हणतात ?३) वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते तुळस ही वनस्पती दिवसात किती तास ऑक्सिजन हवेत सोडते ?४) तुळशीचे प्रकार कोणते ?५) तुळशीला इंग्रजीत काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) मंगलतेचे, पावित्र्याचे २) मंजिरी ३) २० तास ४) काळी तुळस व हिरवी तुळस ५) Holy Basil ( होली बेसिल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नीलम गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका, पुणे👤 राजू गाजरे, अहमदनगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥धृ॥ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते ती व्यक्ती, परिस्थितीला चांगल्याने ओळखत असते व त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्या अश्रूंची भाषा समजत असते ती व्यक्ती,कोणाच्याही डोळ्यातील अश्रू बघून आनंदीत होत नाही. कारण, परिस्थितीचे येणे किंवा जाणे कोणाच्याही हातात नसते. म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये व आनंद घेऊ नये. शक्य झाल्यास माणुसकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुदक्षिणा*फार पूर्वी आश्रमात गुरूजवळ राहून गुरूची आणि गुरू पत्नीची सेवा करून, त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम. राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपवून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरूदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंडभरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाणा होऊन गुरुजींकडे पाहात होता… गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, “काय रे बाळ, तू असा उदास का? कसल्या एवढ्या विचारात गढून गेलास ?” “गुरुजी सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली. पण मी इतका सामान्य आहे. गुरूदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही.” त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते. तो होता बिंबिसार राजाला राजगणिकेपासून झालेला मुलगा. लहानपणापासूनच रानावनात सोडून दिलेला. पण राजाच्या एका दासीपुत्राने त्याला आश्रय दिला, त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, “अरे मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव. हीच माझी गुरुदक्षिणा.” पण तो विद्यार्थी ऐकेना. काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही असे त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, “ज्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडाची चार पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे.”गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग काही आहे का? याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुनिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे झाली. त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो, काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळ जवळ तीन वर्षेपर्यंत चालू होते. या तीन वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाड जमा झाले. थकला बिचारा. पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश मनानं तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, “अरे जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तू प्रमाण मानलीस. मला माझी गुरुदक्षिणा मिळाली.” अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ञ मानला जातो. शल्यचिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment