✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जेष्ठ राजनीतिज्ञ,लेखक आणि विचारवंत डॉ.मोहम्मद हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपती पदी निवड**२००६:उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील व्हिक्टोरिया पार्कमध्ये व्यापार मेळाव्यात भीषण आग ५० मृत्युमुखी**१९९४:सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश श्री एस.आर.पंडियन अध्यक्ष असलेला पाचवा वेतन आयोग स्थापन* *१९५५:योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.**१९१२:इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.**१८७५:महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:प्रियंका बर्वे -- मराठी गायिका**१९८१:अभिजित चव्हाण--हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता**१९७१:वंदना अनिल कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९५८:मीनाक्षी मोहरील-- कथा लेखिका* *१९५१:प्रा.जीवन मुळे --- लेखक,वक्ते* *१९५०:डॉ.विक्रम कुवरलाल शाह-- व्यवसायाने डॉक्टर असून,लेखन करणारे लेखक**१९४५:अशोक बेंडखळे-- प्रसिद्ध मराठी लेखक,समीक्षक व संपादक**१९४०:प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९३७:नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर-- निवृत्त न्यायाधीश,ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३३:डॉ.हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई)-- मराठी डॉक्टर व लेखक(मृत्यू:१५ मार्च २०२०)* *१९३१:किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका**१९३१:सुरेश रघुनाथ मथुरे -- कवी,कथाकार,विज्ञानलेखक (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)* *१९२७:मनाली कल्लट तथा एम.के.वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ.(मृत्यू:१० ऑगस्ट १९८२)**१९०७:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१ फेब्रुवारी १९९५)**१९०१: श्रीपाद रामचंद्र पारसनीस -- चरित्रकार,अनुवादक (मृत्यू:२२ जानेवारी १९८०)* *१९०१:डॉ.धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ,भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते,सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू:३ मे १९७१)**१८९४:घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू:११ जून १९८३)**१८८८:पारुजी नारायण मिसाळ-- ‘बालसन्मित्र’कार सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू केला.(मृत्यू:२७ मे१९५५)**१८८०:सर सी.वाय.चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,(मृत्यू:१ जुलै १९४१)**१८७६:वामन गोविंद काळे-- सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक(मृत्यू:२७ जानेवारी १९४६)**१८४७:जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन- अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, (मृत्यू:२९ आक्टोबर १९११)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१८ जून १९०१)**१७५५:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (मृत्यू:२ जुलै १८४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म:३१ जुलै १९१८)**१९९५:मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान,स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्न’ (जन्म:२९ फेब्रुवारी १८९६)**_१९६५:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(जन्म:२७ डिसेंबर १८९८)_**१९४९:बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (जन्म:१४ नोव्हेंबर १८९१ )**१९३७:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (जन्म:२ फेब्रुवारी १८८४)**१९३१:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी,लेखक व कलाकार (जन्म:६ जानेवारी १८८३)**१८१३:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म:२५ जानेवारी १७३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *"वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जल्लोष नववर्षाचा.! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुठला दिलासा मिळू शकला नाही, त्यामुळे जाणार सर्वोच्च न्यायालयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 मतदान केंद्राची वाढ, गैरसोय टाळण्यासाठी निर्णय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या जागतिक यादीत भारत अमेरिका व चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी २०४ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 2 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे. 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते -प्रेम, ज्ञान व शक्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑक्टोपसला किती मेंदू असतात ?२) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे ?३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे ?४) 'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) १८ व्या लोकसभेत देशातील सर्वात लहान मतदारसंघ कोणता ?*उत्तरे :-* १) नऊ २) मॅग्नस कार्लसन ३) आयुष्यमान खुराणा ४) गगन, नभ, अंबर, व्योम, खग, आभाळ ५) लक्षद्वीप ( ४७,९७२ मतदार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शेख Mwh, मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते, नांदेड👤 टी. अशोक साईनाथ, तेलंगणा👤 शिवराज सीताराम वडजे, शिक्षक, नांदेड👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 भाऊसाहेब आबा अहिरे,नाशिक👤 सचिन पवळे, धर्माबाद👤 नागेश तांबोळी, धर्माबाद👤 श्यामानंद लिंगमपल्ले, धर्माबाद👤 सुभाष बोडके👤 रामदास डुमणे, नांदेड👤 मारोती कोटगले, धर्माबाद👤 प्रकाश बंडेवार, धर्माबाद👤 विलास बोंबले, परभणी👤 बालाजी भाऊ पूर्णेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचारात किंवा करत असलेल्या कृतीत जर प्रामाणिकपणा ,नि:स्वार्थ भावना किंवा सत्यता असेल तर कुठेही फिरण्याची आवश्यकता पडत नाही. आणि आपल्या खिशातील पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. कारण त्यात फक्त सत्कर्म असते. आणि तेच सत्कर्म करणे हेच आपले खरे कर्तव्य आहेत. बाकी दिखावूपणा करून नको त्या प्रकारचे जीवन जगण्याला कर्तव्य नाही तर स्वार्थ आणि प्रसिद्धी मिळवणे असे म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्से स्वत:साठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्हनाले, तुम्ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्हणाले,” आम्ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही तीन हिस्से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment