✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_**_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब**१९९९:जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८:विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७:स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२:’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५:इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५:मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३:जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०:रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५:शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०:बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५:सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:जान्हवी कपूर-- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१:सौरभ गोखले-- मराठी अभिनेता**१९६८:लक्ष्मण महादेव घागस-- लेखक,कवी* *१९६६:मकरंद देशपांडे-- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार,लेखक,दिग्दर्शक**१९६५:देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९५९:लेविन शाहुराव भोसले -- लेखक* *१९५३:माधुरी तळवलकर-- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२:पंडित राजाराम उर्फ राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८:राज एन.सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१:डॉ.हेमंत लक्ष्मण विंझे-- व्यवसायाने डॉक्टर असलेले,कवी,लेखक* *१९३७:वासुदेव नरहर सरदेसाई-- मराठी गझलकार* *१९३६:माणिकलाल कोंडबाजी बारसागडे-- कवी,लेखक* *१९३४:डॉ.शशिकला जयंत कर्डिले-- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४:मुरलीधर कापडी-- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू:१२ऑक्टोबर २००६ )* *१९२५:नयनतारा देसाई-- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर-- कवी* *१९०१:डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी)-- संशोधक,समीक्षक,संपादक (मृत्यू:२२ एप्रिल १९७५)**१८९९:शिवराम लक्ष्मण करंदीकर-- चरित्र लेखक**१४७५:मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू:१८ फेब्रुवारी १५६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:श्रीकांत मोघे-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म:६ नोव्हेंबर १९२९)* *२०१८:वसंत नरहर फेणे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ एप्रिल १९२८)* *१९९९:सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२:रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म:८ एप्रिल १९२८)**१९८६:माधवराव खंडेराव बागल-- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार(जन्म:२८ मे १८९५)* *१९८२:रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म:९ जुलै १९२१)**१९८२:अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका(जन्म:२ फेब्रुवारी १९०५)**१९८१:गो.रा.परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य**१९७३:पर्ल एस.बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म:२६ जून १८९२)**१९६७:स.गो.बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म:२७ एप्रिल १९१४)* *१९५७:अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म:३० नोव्हेंबर १९१२)**१९०५:गोविंद शंकरशास्त्री बापट-- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म:८ फेब्रुवारी१८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री अमित शाह हे जळगाव दौऱ्यावर युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र:नाशिक शहरातील भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; जागतिक हवामानावर एल निनोचा प्रभाव कायम, WMO ची मोठी भविष्यवाणी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाक सामन्याचे तिकीट 1.86 कोटींवर पोहोचले : 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार सामना, दोन्ही संघांचे सर्व सामने अमेरिकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) अपुरी झोप - अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं. आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.त्यासाठी तुम्ही झोपी जाण्याआधी किमान एक तासआधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅझेट वापरू नका.झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीचं तापमान सर्वकाही आरामदायक करा.दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.क्रमशःवरील लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा जिल्ह्यातील *'फुलपाखराचे गाव'* कोणते ?२) राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते ?३) फुलपाखराचे आयुष्य किती दिवसाचे असते ?४) भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू कोणते ?५) फुलपाखरे कशाचे प्रतीक आहेत ? *उत्तरे :-* १) महादरे २) महाराष्ट्र ३) १४ दिवस ४) ऑरेंज ओकलिफ ५) परिवर्तन, पुनरुत्थान, सहनशक्ती, आशा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री अशोक दगडे, पत्रकार, बिलोली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 महेश होकर्णे, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार👤 राज शंकरोड, धर्माबाद👤 मनोहर कोकुलवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोष हे जातील अनंत जन्मीचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥न सोडावे पाय निश्चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्या ॥३॥न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्द करा ॥४॥शुध्द करा मन देहातित व्हावे । वस्तुती ओळखावें तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांनी तसेच अडथळा निर्माण करणाऱ्यांनी स्वतः किती फुलासमान कोमल हदयाचे आहेत ते, ओळखण्यासाठी स्वतः चे एकदा तरी वेळात, वेळ काढून आत्मपरीक्षण करण्याचा अवश्य प्रयत्न करून बघावे. पुढे असे कोणतेही व्यर्थ कार्य करण्याची मुळात सवय लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment