✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक चिमणी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७:महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६:अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४:रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८:झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२:डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७२:संजय दयाराम तिजारे-- कवी* *१९६६:प्रवीण दशरथ बांदेकर-- मराठी साहित्यिक**१९६६:अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८:अशोक लोटणकर-- ललित कथाकार, कवी,समीक्षक**१९५५:दया मित्रगोत्री-- कवयित्री**१९५२:आनंद अमृतराज-- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१:मदनलाल उधौराम शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९५०:डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७:प्रा.वसंत केशव पाटील-- ललित लेखक,कथाकार,कवी,गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९:सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माते,पटकथालेखक, संवादलेखक(मृत्यू:९ जानेवारी २००९)**१९२४:ईश्वर बगाजी देशमुख-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:६ फेब्रुवारी २००६)**१९२१:पी.सी.अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू:१० ऑगस्ट२०११)**१९२०:वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू:३१ जानेवारी २०००)**१९११:माधव मनोहर --समीक्षक,नाटककार, लेखक(मृत्यू:१६ मे,१९९४)**१९०८:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू:२१ मार्च १९८५)**१८२८:हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू:२३ मे १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे-- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध(जन्म:३ सप्टेंबर, १९२३)**१९५६:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म:१ डिसेंबर १९०९)**१९२५:लॉर्ड कर्झन–ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म:११ जानेवारी १८५९)**१७२७:सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म:२५ डिसेंबर १६४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जागतिक चिमणी दिवस ।।आमच्या लहानपणी दिसणाराकुठे गेला लहानसा चिमणाचिवचिव आवाज झाला गायबकोणी खाईना अंगणातला दाणाबाळाला खाऊ घालतांनाआई बोलावित असे चिऊलाबाळ ही मिटकावून खात असेबघत बघत लहानश्या चिऊला- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करेल - आशिष शेलार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या ७ लोकसभा मतदारसंघांसाठी दिला पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बंगळुरू मधल्या नागरथ भागात १४४ कलम लागू.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चीनच्या प्रवक्त्यानं अरुणाचलप्रदेशाबद्दल केलेल्या विधानाचा प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घेतला समाचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL मध्ये पहिले विजेतेपद पटकावले:दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव, श्रेयंका पाटीलने घेतल्या 4 विकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोमास* 📙 झाडेझुडपे, पालापाचोळा, काटक्या, कोळसा, शेण्या, गोवऱ्या, कुजलेले शेवाळे हे सर्व बायोमास या प्रकारात मोडतात. सूर्याची ऊर्जा मिळून त्यांची निर्मिती झालेली असते. या बायोमासचे ज्वलन करून तीच ऊर्जा पुन्हा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ग्रामीण जीवनात या बायोमासला फार महत्त्व आहे.रोजची चूल पेटण्याचा संबंध प्रथम कोरडे जळण मिळवण्यापासून सुरू होतो. झाडे तोडून लाकडे मिळवण्याचे दिवस कमी होत चालले आहेत. काट्याकुटक्या, झाडोर्याच्या फांद्या झपाट्याने नाहीशा होत चालल्या आहेत. पालापाचोळा शेकोटीला वा पाणी तापवायला उपयोगी पडतो; पण भाकऱ्या भाजणे व स्वयंपाक करणे यासाठी त्याचा उपयोग होत नाही. पुर्वापारची पद्धत म्हणजे शेणाच्या गोवऱ्या थापणे. जनावरांचे म्हणजे गायीगुरांचे शेण, त्यात थोडीशी कोळशाची पावडर घालून मळायचे. त्याचा गोल गोवऱ्या थापायच्या व भिंतीला लावून वाळवत ठेवायच्या. ग्रामीण जीवनाचे हे एक अविभाज्य अंग आहे.याच गोवर्या वाळल्या की मग पावसाळ्याच्या दिवसांतील जळणाची पंचाईत कमी होते. काहीजण या गोवऱ्या तयार करताना वाळका कडबासुद्धा बारीक चुरून वापरतात. दोन चार गोवर्या व एखादे मोठे लाकूड यांवर एक वेळचा स्वयंपाक कसाबसा पार पाडता येतो. चुलीची आचही चांगली राहते. धुर कमी होतो.या पद्धतीचे जळण वापरायची प्रथा जिथे गुरे हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे तिथे कायम आहे. भारतातील सर्व ग्रामीण भागात कुठेही गेलात तरी गोवऱ्यांची चळत वळचणीला लावून रचलेली दिसेल व परसदारी भिंतीला गोवर्या थापून वाळवत लावलेल्या दिसतीलच. एवढेच नव्हे तर रानात गुरे चरायला जातात त्या वेळी त्यांच्यामागे जाणारी लहान मुले एखादी पाटी घेऊन शेण गोळा करायला कधीही विसरत नाहीत. जमेल तेवढे पाटीभर शेण घरी आणले की जळणाची सोय होते, हे त्यांना जणू बाळकडूच मिळालेले असते. गोवऱ्यांचा आणखी एक उपयोग आहे. घरातील वृद्ध म्हातारे माणूस रागाने म्हणताना कधी ऐकले आहे ? 'गेल्या आहेत माझ्या गौवऱ्या मसणात,' म्हणून ! अगदी बरोबर. अंत्यसंस्कार करताना अनेक ठिकाणी अजूनही भरपूर गोवऱ्या वापरतात. बहुमूल्य अशा लाकडाची ही त्यात बचत होते. हेही महत्त्वाचे नाही काय ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश चिंतावार, शिक्षक, नांदेड👤 योगेश राजापूरकर, शिक्षक, उमरी👤 गणेश गुरुपवार, नांदेड👤 रमेश कोंडेकर👤 सर्जेराव ढगे👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड👤 रामदयाल राऊत*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन शब्द आपल्यासोबत कोणी हसून बोलत असतील तर आपल्याला आनंद होत असतो .पण आपल्याला कोणी कठोर शब्दात बोलले तर मात्र त्या शब्दांचा राग येत असतो. या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पण,थोडे विचार करून बघावे कधी,कधी हसून बोललेल्या शब्दात जे काही दडलेले असते त्याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती नसते व जे कोणी कठोर शब्दात बोलून मोकळे होतात. कधीकाळी ते आपल्या भल्यासाठीही असू असते म्हणून त्या दोन्ही मधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*📝 संकलन* 📝•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment