✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9cWGZ4rVLAhzgEBu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ.रा.चिं.ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.**२००१:चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली**२००१:व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने ईडन गार्डन या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.**२०००:कलकत्ता येथील ’टेक्निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.**१९९५:महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा सेना युतीचे मनोहर जोशी यांचा शपथविधी**१९९०:आकाश या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण* *१९५४:दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.**१९३१:’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:रोहित शेट्टी-- यशस्वी भारतीय चित्रपट दिग्दर्शक* *१९७२:प्रा.डॉ.संगिता गणपतराव घुगे-- लेखिका**१९६५:आमिर खान _ भारतीय प्रसिद्ध अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक**१९६३:पंडित रघुनंदन पणशीकर-- जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक* *१९५८:संध्या रमेश पुजारी -- कवयित्री* *१९५४:पांडुरंग डोमाजी कांबळे -- लेखक,कवी* *१९५३:अरुण कृष्णाजी कांबळे-- मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:२० डिसेंबर २००९)**१९५१:सुनील चिंचोळकर --समर्थ रामदास स्वामी यांचे विचार लेखणी आणि प्रवचनांद्वारे जनमानसांपर्यंत पोहोचवणारे(मृत्यू:२२ एप्रिल २०१८)**१९४८:प्रा.अरुणकुमार भागवत पाटील-- कवी,लेखक* *१९४६:माधव मुरलीधर देशपांडे--संस्कृत व प्राकृत भाषातज्ज्ञ**१९४२:अरुण निगवेकर-- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष(मृत्यू:२३ एप्रिल २०२१)**१९४०:चंद्रशेखर अर्जुन टिळेकर-- लेखक**१९३६:प्रभाकर गोविंद विद्यासागर-- लेखक* *१९३४:मीना सुधाकर देशपांडे-- आचार्य प्र.के.अत्रे यांच्या कन्या.प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:६ सप्टेंबर २०२०)**१९३१:प्रभाकर पणशीकर –मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ जानेवारी २०११)**१९१५: रामचंद्र शेवडे-- बालसाहित्यिक (मृत्यू:२ डिसेंबर २००१)**१९१३:श्रीनाथ त्रिपाठी-- भारतीय संगीतकार(मृत्यू:२८ मार्च१९८८)**१९०८:गणपत खंडेराव पवार -- कादंबरीकार,पत्रकार* *१८७९:अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:१८ एप्रिल १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:स्टीफन विल्यम हॉकिंग-- सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ(जन्म:८ जानेवारी १९४२)**२०१०:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – सुप्रसिद्ध लेखक,कवी,लघुनिबंधकार व टीकाकार.देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(जन्म:२३ ऑगस्ट १९१८)**२००३:सुरेश भट-- सुप्रसिद्ध कवी,गझल सम्राट' (जन्म:१५ एप्रिल १९३२)**१९९८:दादा कोंडके – प्रसिद्ध अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (जन्म:८ ऑगस्ट १९३२)**१९९६:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार,प्रवासवर्णनकार,संशोधक, समीक्षक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१७)**१९३२:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म:१२ जुलै १८५४)**१८८३:कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म:५ मे १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन गाणे - आनंदी तराणे*चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भाजपची दुसरी यादी जाहीर:महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश; बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून गडकरी तर नांदेडमधून चिखलीकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमीपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 63 हजार शेतकऱ्यांना 63 कोटींची दुष्काळी मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा नागपूरमध्ये येत्या 15 ते 17 मार्च दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमित सिंग ठरला 'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी तर उमेश गुप्ता ठरला उपविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात... फक्त आपल्यात सहनशीलता पाहिजे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये *'कल्चरल अम्बेसिडर ऑफ दि अवॉर्ड'* कोणाला मिळाला आहे ?२) ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?३) मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) मैथिली ठाकूर २) ओपेनहायमर ३) दुसऱ्या ४) बुध व शुक्र ५) मुलताई, बैतूल जिल्हा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment