✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/vxnkYRr1YzXLzVdt/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२: स्पेनि, मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: समृद्धी विजय बनकर -- कवयित्री**१९९२: सचिन जगन नांगरे -- लेखक,कवी**१९८६: प्रफुल्ल उदयन सावरकर -- पर्यावरणावर लेखन करणारे लेखक* *१९८३: संतोष ग्यानिदास गेडाम -- कथाकार, कवी* *१९७७: राम संपत -- भारतीय संगीतकार**१९७७: रागेश्वरी लूंबा-- भारतीय गायिका, अभिनेत्री**१९७१: कविता टिकाराम कठाणे -- मराठी, हिंदी कविता**१९६९: राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६४: जावेद पाशा कुरैशी -- प्रसिद्ध मराठी लेखक, फुले-शाहू-आम्बेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक, लेखक आणि प्रकाशक* *१९५७: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माता आणि लेखिका (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०२४ )**१९५४: दिनेश केसकर -- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९५३: रत्नाकर तारदाळकर -- प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट व लघुपट निर्माते**१९४९: बकुळ पंडित -- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९४१: र. स. गि-हेपुंजे -- कवी (मृत्यू: २७ जानेवारी २०११ )**१९३७: विजय किरपेकर -- ज्येष्ठ तबलावादक, लेखक (मृत्यू: २१ एप्रिल २०२१ )**१९३४: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललित निबंधकार (मृत्यू: २७ जानेवारी २०१६ )* *१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: १३ आगस्ट२०१८ )**१९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२ )**१९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार तथा लेखक (मृत्यू: २९ जुलै २००२ )**१९१७: सदाशिव शंकर देसाई -- विख्यात साहित्यिक, पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू: ३१ मे १९९६ )**१८८७: नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे -- कवी**१८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५ )**१८३२: करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार (मृत्यू: २८ ऑगस्ट १८७५ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: शिरीष कणेकर -- मराठी लेखक आणि रंगमंच कलाकार (जन्म: ६ जून १९४३ )**२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई -- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९ )* *२०१२: बी. आर. इशारा –चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म: ७सप्टेंबर१९३४ )**१९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: २५ एप्रिल १९०० )**१८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छडी लागे ( ना ) छम छम ...*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी होणार शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांचा गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत होणार, राज्य सरकार शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगणारा पुतळा उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, मठाधिपतींकडून 5 व्या दिवशी ज्यूस प्यायले; आता निवडणुकांची रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'माझी लाडकी बहीण योजना' - 3 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांत आजपासून तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन; 5 लाख 13 हजार 130 महिलांची नोंदणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *तंबाखू / पान खाल्ल्याने दात खराब होतात का ?* 📙तंबाखू वा पान खाऊन रस्त्यावर व कोठेही थुंकणाऱ्या लोकांची कोणाला किळस येणार नाही ? दुसरे म्हणजे कार्यालयात वा शाळेत कोणी पानाचा तोबरा भरून तुम्हाला शिकवले व तुमच्याशी बोलू लागले तर बरे वाटणार नाही. तंबाखूची गोळी लोक तोंडात ठेवतात. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्य लाळेत मिसळते व दाताभोवती जमा होते. तोंडात कायम तंबाखू असल्याने तोंडाची स्वच्छता नीट राखली जात नाही. या दोन्ही कारणांमुळे दात पिवळट होतात. कालांतराने किडतात. पान खाल्ल्याने जीभ रंगते, हे तुम्हाला माहीत आहेच. सुपारीमुळे दातांवरील आवरणाला चिरा पडतात, त्यातून दात किडण्याला सुरुवात होते. कधी कधी तर सुपारी खाताना दाताचा टवकाही उडतो ! अर्थात क्वचित पान खाल्ले व नंतर खळखळून गुळण्या भरल्या तर काही नुकसान होत नाही; पण वारंवार पान खाण्याने आणि त्याची सवय लागण्याने (विशेषत: तंबाखूयुक्त) दातांना पिवळट लालसर रंग येतो व दात कालांतराने किडतात.बसमध्ये सीटच्या बाजूला, जिन्याच्या भिंतीवर, ऑफिसच्या कोपऱ्यात अशा अनेक ठिकाणी हे तंबाखू वा पान खाणारे लोक इतस्तत: थुंकून ठेवतात. त्यामुळे तो सर्व भाग अस्वच्छ दिसतो. "थुंकू नये" अशा सूचनेच्या भोवतीही थुंकून ठेवलेले दिसते. या व्यसनांनी दात तर खराब होतातच, पण परिसरही अस्वच्छ होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे !डॉ. जगन्नाथ दीक्षित डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *रोजगार हमी योजनेचे जनक* कोणाला म्हटले जाते ?२) पॅरिस येथे कितव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ?३) महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे ?४) 'तारू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बांग्लादेशच्या पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) वि. स. पागे २) तिसऱ्यांदा ( १९००, १९२४, २०२४ ) ३) मध्यप्रदेश ४) जहाज, गलबत ५) शेख हसीना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ कामीनवार, शिक्षक नेते, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा, धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, शिक्षक, भोकर👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर👤 प्रा. संगीता भालसिंग, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर, रामटेक, नागपूर👤 गोविंद मानेमोड👤 साईनाथ भोरे👤 नरेंद्र राठोड👤 गजानन महाजन👤 ऋचाली चंदेल-बायस👤 लिंगन्ना पोतन्ना, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पहिले दाता शिष्य भये तन मन अरप्यो शीश ।पाछे दाता गुरु भये नाम दियो बखशीश ॥ 24 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत राहणारे अनेकजण भेटतील पण, दु:खात पाठीमागे राहून साथ देणारे बोटावर मोजण्याएवढेच भेटतील. हसवणारे फार कमी प्रमाणात भेटतील पण, रडवणारे मात्र जागोजागी भेटतील. म्हणून याची पूर्णपणे जाणीव ठेवून कोणाकडून ही कशाचीही अपेक्षा ठेवू नये. ते आपले काम करत असतात आपण आपले काम करत रहावे. फरक एवढेच की, प्रत्येकांची काम करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment