✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7jsB5HcWmR3niU3Z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_विश्व यूएफओ दिवस_* *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.**१९९४:चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९८३:कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.**१९८१:माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य इन्फोसिस या कंपनीची स्थापना**१९७२:भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.**१९६२:रॉजर्स,आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.**१८५०:बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल**१८६५:’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विशाल देवतळे-- कवी,लेखक* *१९७९:प्रवीण हरिभाऊ चव्हाण-- लेखक**१९७६:प्रा.दिवाकर विश्राम सदांशिव-- लेखक* *१९७३:राजेश रेवले -- कवी* *१९७०:प्रा.डॉ.अनिल शंकरराव काळबांडे-- कवी,लेखक,संपादक* *१९६८:महेंद्र पुंडलिक ताजने-- कवी लेखक**१९६७:किशोर रामराव खेडेकर-- लेखक**१९६५:श्याम ऊर्फ अनंत दत्तात्रय पेठकर-- प्रसिद्ध लेखक,वऱ्हाडी भाषेतील स्तंभ,नाटके, कथा,कवितांचेही सातत्याने लेखन**१९६१:शंकर सीताराम चव्हाण-- लेखक**१९६१:डॉ.गिरीश जखोटिया -- प्रसिद्ध विचारवंत,लेखक**१९६१:प्रदीप निफाडकर-- प्रसिद्ध गझलकार,कवी,लेखक* *१९६०:सतीश सुरवसे--प्रसिद्ध कथाकार**१९५९:विजयालक्ष्मी विजय देवगोजी-- लेखिका* *१९५८:पवन मल्होत्रा-- भारतीय अभिनेता**१९५४:मोहम्मद अझीझ-- भारतीय बहुभाषिक पार्श्वगायक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१८)**१९५०:अपर्णा आनंद पाटणकर-- लेखिका, कवयित्री**१९५०:काशीराम लक्ष्मण चिंचय --कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर(मृत्यू:१४ जानेवारी २०२२)**१९४४:अरुण गोडबोले-- जेष्ठ कवी,चित्रपट निर्मिती* *१९३३:मधुकर टिल्लू -- मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे ज्येष्ठ कलावंत(मृत्यू:१ जून २०००)**१९३०:कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष**१९२५:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)**१९२३:जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी माजी मंत्री(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९९७)**१९२२:मोहम्मद फजल-- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल(मृत्यू :४ सप्टेंबर २०१४)*.*१९२२:पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर**१९१६:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(मृत्यू:९ ऑगस्ट १९९२)**१९०४:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू:१२ आक्टोबर १९९६)**१८६५:कृष्णाजी लक्ष्मण सोमण-- कवी, नाटककार (मृत्यू:२५ मे १९९८)**१८८०:गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू:२३ डिसेंबर १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:लीलाधर कांबळी-- मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते(जन्म:९ मे १९३७)**२०१७:प्रा.मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल-- मराठी लेखक,अनुवादक, रूपांतरकार,नाट्यलेखक,निर्माता,दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते (जन्म:२४ जुलै १९३२)**२०११:चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री,कामगार नेते,कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म:७ एप्रिल १९२५)**२००७:दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म:८ ऑगस्ट १९४०)**१९९९:मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म:१५ आक्टोबर १९२०)**१९७२:महेश कौल -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि अभिनेता(जन्म:१० एप्रिल १९११)**१९५०:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म:२३ सप्टेंबर १९०३)**१८४३:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म:१० एप्रिल १७५५)**१७७८:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म:२८ जून १७१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले ........!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 30 ते 31 रुपयाची कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘एक रुपयात पिक विमा योजना’, सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई 'पदवीधर'मधून अनिल परब विजयी : 'शिक्षक'मधून अभ्यंकर; भाजपचे निरंजन डावखरे यांनी कोकणचा गड राखला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; मागील वेळी झाली होती बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दोन वर्षानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोने होते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे ?२) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?४) 'जिन्नस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ऑक्सीजनच्या सिलेंडरची मदत न घेता एव्हरेस्ट सर करणारे देशातील पहिले डॉक्टर दांपत्य कोण ? *उत्तरे :-* १) सुजाता सौनिक २) वसंतराव नाईक ३) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ४) पदार्थ ५) डॉ. हेमंत लुवा व डॉ. शुबिबेन लुवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद👤 विक्रांत दलाल, नांदेड👤 शैलेश तराळे👤 सतिश अवधूतवार, बोधन👤 चिमणाजी हिवराळे👤 वसंत घोगरे पाटील, संस्थापक, मानव विकास सेवाभावी संस्था👤 श्रीनिवास पुल्लावार👤 शिवानंद चौगुले, पुणे👤 मारोती जाधव👤 जेजेराव सोनकांबळे👤 गोपाळ पामसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्लभ मनुष्य जनम है देह न बारम्बार।तरुवर ज्यों पति झड़े बहुरि न लागे डार ॥1॥अर्थ – मनुष्य का जन्म बहुत ही दुर्लभ है मनुष्य का जन्म पाना बहुत ही भाग्य का बात है। जिस प्रकार डाल से पत्ता टूट कर गिरने के बाद वापस डाल पर नहीं लगता उसी प्रकार मनुष्य का जन्म भी दुबारा बिना सत्कर्म और भजन बिना नहीं मिलता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ संत बहिणाबाई ❃* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.*तात्पर्य :- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment