✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/pAxJ9oSvMLcqxkQP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.**१९८७: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.**१९८५: मल्याळम लेखक टी.एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार**१९५७: ’इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.**१९४८: दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४६: टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.**१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.**१८७६: फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.**१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्राम बागवाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: बाळासाहेब गोपाळ कांबळे -- लेखक* *१९७९: प्रतिमा अरुण काळे-- कवयित्री**१९७९: विनोद भगवान राठोड -- कवी**१९७९: प्राची परचुरे-वैद्य -- लेखिका* *१९६९: वेणुताई नागोराव हुलसुरे -- लेखिका**१९६८: सलील वाघमारे -- लेखक**१९६७: अनिल श्रीनिवास ठाकरे -- लेखक, मूर्तिकार**१९६३: संगीता सुनील वाईकर -- लेखिका* *१९६२: हेमंत पटले -- लेखक* *१९५९: संजय दत्त – प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९५३: अनुप जलोटा – प्रसिद्ध भजन व गझलगायक**१९४८: श्याम पेंढारी -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९४६: डॉ. अनिल गजभिये -- लेखक* *१९४४: तुलसी रामसे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक ( मृत्यू: १३ डिसेंबर २०१८ )**१९४०: डॉ. रंगनाथ नारायण जोशी -- कवी, लेखक* *१९३९: डॉ. लीना प्र. रस्तोगी -- लेखिका व कवयित्री* *१९३८: प्रा. प्रभाकर नारायण परांजपे -- अनुवाद, कथालेखक आणि संपादक* *१९२७: माधवसिंह सोळंकी -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री,केन्दिय मंत्री ( मृत्यू: ९ जानेवारी १९२१)**_१९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस -- SD फडणीस म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार_* *१९२२: ब.मो.पुरंदरे(बाबासाहेब )– इतिहासकार आणि लेखक,शिवशाहीर (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०२१ )**१९२१: श्रीकृष्ण नारायण चाफेकर -- कवी लेखक**१९२१: रा.ना.पवार -- जुन्या पिढीतील कवी, गीतकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९२ )**१९०८: रघुनाथ रामचंद्र भांबे -- कवी लेखक**१९०४: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३ )**१८८३: बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल१९४५ )**१८७८: नारायण कृष्णबुवा सुपेकर -- कीर्तनकार कवी (मृत्यू: २७ मे १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )* *२०१२: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार ( जन्म: १७ ऑगस्ट १९२३ )* *२००९: महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९ )**२००३: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६ )**२००२: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९ )**१९९६: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९ )**१९६६: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार (जन्म:.२३ सप्टेंबर १९१५ )**१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक.(जन्म: २६ सप्टेंबर १८२० )**१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३ )**१७८१: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला, कवितेच्या जगात*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : भारताला धक्का देत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर आपले नाव कोरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.*डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जीवंतपणी इंग्रज सरकारच्या हाती लागणार नाही'* ही प्रतिज्ञा कोणी घेतली होती ?२) कोणत्या भारतीय खेळाडूंना 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?३) पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकले ?४) 'तृषा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते ? *उत्तरे :-* १) क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद २) विजय अमृतराज व लिएंडर पेस ३) ऑस्कर पियास्त्री ४) तहान, लालसा ५) मळेगांव, ता. बारामती, जि. पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील कोल्हे, वाशिम👤 संजय पंचलिंग, शिक्षक, नायगाव👤 सुदीप दहिफळे, वसमत👤 दलित सोनकांबळे, बिलोली👤 सौ. गीता शिवा वसमतकर👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 गिरीश श्रीपतराव पाटील, नांदेड👤 सौ. दीपाली अशोक मामीडवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निज मन तो नीचा किया चरण कमलकी ठौर |कहैं कबीर गुरुदेव बिन नजर न आवै और ॥ 26 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे चांगले काम करण्याची जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होत असते. ती इच्छा योग्य असते. म्हणून त्यावेळी उगाचच वेळ वाया घालवू नये. भलेही कितीही अडथळे, अडचणी आल्या तरी त्यांचेही हसत, हसत आनंदाने स्वागत करावा. कारण अडचणी आणि अडथळे हे सुद्धा एक प्रकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असतात. सोबतच नवी वाट दाखवून पाठीमागे सदैव आधारस्तंभ बनून उभे राहतात. पण, ते आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचाही मोठ्या मनाने स्वीकार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भेट*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला. *तात्पर्य*आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment