✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/mnZHhjFKkAL1RDPs/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_कारगिल विजय दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्ब स्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५: मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९: भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८: १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५: मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७: लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५: इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.*🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: माहिका शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८५: मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: जुगल हंसराज. -- भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२: प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक, संपादक, वक्ते* *१९६७: संजय अप्पाराव घाटगे -- कवी, लेखक* *१९६७: शेषराव नथ्थुजी मडावी -- लेखक कवी* *१९५६: कल्पना अय्यर -- भारतीय कलाकार, गायिका**१९५५: असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४ )**१९४८: सुमन शा. लाघवे -- लेखिका* *१९४३: डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४३: डॉ. नीला चंदकांत पांढरे -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: २६सप्टेंबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. प्रकाश केजकर देशपांडे -- कादंबरीकार, कवी, समीक्षक, प्रभावी वक्ते* *१९३४: दत्तात्रय पंढरीनाथ जोशी -- संपादक* *१९१६: मधुसुदन शंकर कानेटकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील नामवंत गायक (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००७ )**१९११: यशवंत दत्तात्रय भावे -- कवी (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८७ )**१९०२: यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू: १९८८ )**१८९४: वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू: ३० मार्च १९६९ )**१८९४: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३ )**१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९ )**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता -- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू: २१ जानेवारी १९८२ )**१८७५: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१ )**१८७०: गोविंद सदाशिव आपटे -- ज्योतिर्गणितज्ज्ञ (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३६ )**१८६५: रजनीकांत सेन -- भारतीय कवी आणि संगीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१० )**१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५० )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: बिजॉय कृष्णा हांडिक -- भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १ डिसेंबर १९३४ )**२००९: भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६ )**१९८४: डॉ. गणेश सखाराम महाजनी-- गणिततज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु (जन्म: २७ नोव्हेंबर १८९८ )**१९७२: उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे. -- प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म: २८ आगस्ट १९०३ )**१९४४: प्रभाकर वासुदेव बापट -- वाड:मय इतिहासकार ( जन्म: १७ फेब्रुवारी १९०२ )**१८९१: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयं शिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सातारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट, जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत आता दिव्यांगानाही अर्थसहाय मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता मिळणार पीक विम्याचा लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पालकमंत्री आणि प्रशासनाने सतर्क राहून मदत करावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी निधन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये मिळाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर' बहुमान, पीएम मोदींनी केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *मनिका बत्रा* ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?२) पर्यावरण सरंक्षणासाठी GEP index सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत ?४) 'तिमिर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) MMS चा full form काय आहे ?*उत्तरे :-* १) टेबल टेनिस २) उत्तराखंड ३) वेंकट रामन अनंत नागेश्वरन ४) अंधार, काळोख ५) Multimedia Messaging Service*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद👤 वैभव भोसले, नांदेड👤 रमेश मस्के, पत्रकार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राम नामके पटतरे देवे को कछु नाहिं।क्या ले गुरु संतोषिये हवस रही मनमाहिं ॥ 25 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात चांगली असो किंवा वाईट परिस्थिती नेहमीच येत असते. त्या आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा मोठ्या हिंमतीने सामना करायला शिकले पाहिजे. पण,जी परिस्थिती स्वतः चालून न येता मुद्दामहून आणलेली असते ती, जरा वेगळी असते. सोबतच ज्या मार्गाने ती पाठवली असते तिला तोच मार्ग चांगल्याने माहित असते म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नये व मनावर घेऊ नये. दोन्ही परिस्थितीच्या वेळी, आपल्यात हिंमत ठेवून स्वतः वर विश्वास कायम असू द्यावा. कारण आपली हिंमत आणि विश्वास हेच खऱ्या अर्थाने आपले आधार असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment