✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs.) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.**२००६: मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९७: बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.**१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.**१९५४: पंजाब वर राजस्थानला वरदान ठरलेल्या भाकरा नांगल कालव्याचे पंडित नेहरू च्या हस्ते उद्घाटन**१९३०: किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ’इंडिया हाऊस’चे उद्घाटन**१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.**१८८९: ’द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८५६: चार्ल्स बर्न याल ’मशिनगन’*चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.**१४९७: वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: अक्षय अंबादास टेमकर -- लेखक**१९८८: जुई गडकरी-- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८३: प्रमोद शंकरराव हामंद-- कवी, लेखक* *१९८०: इंद्रजित वीर-- लेखक**१९७८: दत्तात्रय नाथा भापकर-- कवी, लेखक* *१९७८: अमोल अरविंद भावे -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक**१९७५: प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार-- कवी**१९७४: बाळासाहेब राजेसाहेब झोडगे-- कवी**१९७२: सौरव गांगुली –भारताचा माजी क्रिकेट कर्णधार**१९७०: अतुल अग्निहोत्री -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक* *१९६८: भारत केशवराव काळे -- आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक**१९६६: रेवती (जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) -- भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक**१९६२: डॉ.संजय गोविंदराव पोहरकर-- कवी, लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )**१९५८: नीतू कपूर (सिंग )-- भारतीय अभिनेत्री**१९५८: विजया दिपक एंबडवार -- कवयित्री**१९५४: डॉ. राजेश विश्वनाथराव गायकवाड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: प्रकाश सुकलाल भांडारकर-- लेखक कवी**१९४९: वाय.एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री (मृत्यू: २ सप्टेंबर २००९ )**१९४४: उषा तांबे -- जेष्ठ मराठी लेखिका* *१९४१: अनिल मोहिले-- ज्येष्ठ संगीतकार(मृत्यू: १ फेब्रुवारी २०१२ )* *१९३०: मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी -- ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार (मृत्यू: १५ मे २०१८ )**१९२८: श्रीपाद रामचंद्र काळे -- जवळजवळ १२०० कथा व ५० हून अधिक कादंबऱ्यांचं लेखन केले आहे (मृत्यू: १८ जून १९८८ )* *१९२२: अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (मृत्यू: १९ एप्रिल २००९ )**१९१६: गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व. ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रेजैत’ या त्यांच्या कादंबर्यांवर चित्रपट निघाले. (मृत्यू: १ जून१९९८ )**१९१४: ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१० )**१८३९: जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक (मृत्यू: २३ मे १९३७ )**१७८९: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सैयद इश्तियाक अहमद जाफरी (सुरमा भोपाली) हास्य अभिनेता (जन्म: २९ मार्च १९३९ )**२०२०: दीनानाथ घारपुरे-- ज्येष्ठ नाट्य,सिने पत्रकार* *२०१०: मधुकरराव चौधरी-- समाजसेवी, गांधीवादी,पूर्व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (जन्म: १५ जून १९१९ )**२००७: चंद्रशेखर-- भारताचे माजी पंतप्रधान (जन्म: १ जुलै १९२१ )**२००६: प्रा.राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८ )**२००३: हरी श्रीधर शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक ( जन्म: २२ जानेवारी १९२० )* *२००१: वसंतराव चांदोरकर-- आग्रा, ग्वाल्हेर, जयपुर घराण्याचे गायक (जन्म: २० जून १९२० )**१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक* *१९८४: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )**१९६५: डॉ. कमलाबाई गोपाळराव देशपांडे'-- भारतीय समाजसेविका(जन्म: २२ फेब्रुवारी, १८९८ )**१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५ )**१६९५: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (जन्म: १४ एप्रिल १६२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख ......*मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा आज शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हरे कृष्णा, हरे रामाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा सोहळा थाटात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ, ऊर्जामंत्री फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली येथून सुरू झालेली शांतता रॅली आज नांदेडमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर समितीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा झिम्बाब्वेवर दणक्यात विजय, अभिषेक-ऋतुराजच्या खेळींमुळे सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* **************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच *नॅशनल आयकॉन अवॉर्ड* ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतातील पारशी समाज कोणती कालगणना पद्धती उपयोगात आणत असतो ?४) 'झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) अदिती बोधनकर २) भारत ३) शहेनशाही कालगणना ४) गर्दी, रीघ, थवा ५) पाटलीपुत्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेद्रे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन सुर्यास्त होते म्हणून सुर्योदय होत नाही असे नाही. कारण त्या सूर्याला माहीत असते की, या सृष्टीला माझी आवश्यकता आहे. कोणी त्याला विसरून जातात तर कोणी आठवण करतात. तो कोणालाही दोष न देता आपले कर्तव्य पार पाडत असतो. आपण सूर्य तर होऊ शकत नाही पण या भूमातेवर आपल्याला माणसासारखे अनमोल जीवन मिळाले हेच तर खूप काही आहे. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवावी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते*एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे. खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते. एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला. हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले. मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते. आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले. कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे. ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल. हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो. मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो. हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे. कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता. शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला. हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते. आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य :- मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment