✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2018/07/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚪ *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._*⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१: आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.**१९९४: दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९: अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०: ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.*⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रा. डॉ. ललित रमेश कोलते-- कवी, लेखक**१९८३: विकास वसंतराव गुजर -- लेखक* *१९६९: प्रणव हळबे -- कवी, लेखक* *१९६५: अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९६०: जाफर पनाही -- इराणमधील चित्रपट निर्माते**१९५९: डॉ. अचला दि. तांबोळी -- कवयित्री, लेखिका* *१९५६: कुमार गौरव ( मनोज तुली) -- भारतीय उद्योगपती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतकाम करणारा माझा अभिनेता**१९५५: प्रा. सुहास बारटक्के -- लेखक, पत्रकार* *१९५४: मोहन दाते -- दाते पंचांग**१९५३: प्रा. डॉ. सुधा लक्ष्मणराव पेशकर -- लेखिका* *१९५३: सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०: सुप्रिया अनंत अय्यर -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९४७: शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी**१९४५: जलाल आगा -- हिंदी चित्रपटांतील अभिनेता (मृत्यू: ५ मार्च १९९५ )**१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१ )**१८९१: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१ )**१८८९: नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ )**१८८७: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक, प्राध्यापक आणि समाजसेवक (२५ जानेवारी १९६४ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: मधुसूदन नानिवडेकर -- प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६० )**२००९: शांताराम नांदगावकर – मराठी गीतकार, कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६ )**२००३: भीष्म साहनी -- भारतीय लेखक, हिंदी नाटककार आणि अभिनेता (जन्म: ८ ऑगस्ट १९१५)**२००३: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म: १५ नोव्हेंबर १९४८ )**१९९४: रामा राघोबा राणे --- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म: २६ जून, १९१८ )* *१९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसंख्येचा भस्मासूर आणि त्याची कारणे*भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली जनगणना सन 1951 या वर्षी घेण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या 36 कोटी 10 लाख होती. आजची लोकसंख्या 144 कोटी 20 लक्ष 39 हजार 740 आहे...... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दप्तराविना भरणार शाळा, केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करणार, वार्षिक शैक्षणिक वर्षातील दहा दिवस विना दप्तराचे असतील, त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या भितींबाहेरील जगात फिल्ड विजीटसाठी नेले जाईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, जानेवारीपासून मिळणार थकबाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब;आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कॉलिंगचे दर वाढवून सर्वसामान्यांची मोबाईल कंपन्यांकडून पिळवणूक, आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने विजयासह मालिकेत घेतली आघाडी, तिसऱ्या सामन्यात T-20 झिम्बाब्वेवर सहज मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *युरीस्टीकने लघवीची तपासणी कशी करतात ?* 📕तुमच्या घरी आजी-आजोबांना मधुमेह अर्थात डायबेटीस असेल, तर तुम्हाला युरीस्टीक माहिती असतील. डायबेटीसच्या रुग्णांच्या रक्तामध्ये साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण जास्त असते. जसे गाठ भरता की वाहून जातो, त्याप्रमाणे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ठरावीक मर्यादबाहेर गेले तर लघवीवाटे ती बाहेर टाकली जाते. याचाच अर्थ असा की, सामान्यपणे निरोगी माणसाच्या लघवीत ग्लुकोज नसते. लघवीत जर ग्लुकोज ०.५ टक्के वा त्याहून जास्त प्रमाणात असेल, तर व्यक्तीला मधुमेह झालेला असू शकतो. खात्रीच्या निदानासाठी रक्तातील ग्लुकोज तपासावी लागते, युरीस्टीकमध्ये एका पट्टीवर एक विशिष्ट असा रासायनिक पदार्थ लावलेला असतो. ही युरीस्टीक लघवीमध्ये३० सेकंद बुडवतात. लघवीतील ग्लुकोजच्या प्रमाणानुसार मुळचा निळसर हिरवा रंग असलेला हा पदार्थ पिवळा, नारंगी, तपकिरी होऊ शकतो. त्या रंगाचा काय अर्थ हेही युरीस्टीकच्या बाटलीवर लिहिलेले असते. मधुमेहाच्या रुग्णाला नियमित उपचार घ्यावे लागतात. या उपचारांचा मुख्य उद्देश हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर राखणे हाच असतो. म्हणजेच मधुमेह नियंत्रणाखाली असला, तर त्या व्यक्तीच्या लघवीत ग्लुकोज नसेल या असलीच तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल. यापेक्षा ग्लुकोजचे लघवीतील प्रमाण जास्त असल्यास आहारावर नियंत्रण, औषधे नियमितपणे घेणे किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे, हे उपाय करावे लागतात. म्हणजेच युरीस्टीकच्या साहाय्याने स्वतःचा मधुमेह नियंत्रणाखाली आहे वा नाही, हे कळू शकते. आजी-आजोबांना या कामात तुम्हीही मदत करू शकाल, कारण काही वेळा त्यांची नजर अधू असल्याने त्यांना युरीस्टीकवरचे रंग नीट दिसत नाहीत. मग काय करणार ना मदत ?डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने* गौरविण्यात आले ?२) रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ( कोच ) म्हणून कोणाची निवड झाली आहे ?४) 'झोका' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) रशिया या देशाची राजधानी कोणती ?*उत्तरे :-* १) रशिया ( रूस ) २) ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉसल ३) गौतम गंभीर ४) हिंदोळा ५) मॉस्को*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुपमा अजय मुंजे, साहित्यिक, नागपूर👤 प्रभू देशमुख, शिक्षक, बिलोली👤 संतोष चव्हाण, शिक्षक, नांदेड👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगाव👤 प्रकाश नाईक👤 प्रमोद मंगनाळे👤 नरेश गोट्टम👤 स्वप्नील शिंदे👤 शेख सलमान👤 साईकिरण अवधूतवार, तेलंगणा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तान्हा बाळ जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याच्या रडण्याने सर्वाच्या डोळ्यात आनंदश्रू वाहताना दिसतात. तोच बाळ मोठा होऊन एक दिवस जग सोडून जातो.या प्रसंगी सुद्धा प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण,जेव्हा तोच बाळ वयाने मोठा होऊन अनेक संकटाचा सामना करून जगत असतो त्यावेळी मात्र त्याचे दुःख बघून कोणाच्याही डोळ्यात आपुलकीचे अश्रू येताना दिसत नाही. जी वेळ खऱ्या अर्थाने मोलाची असते त्यावेळी मात्र सर्वांना विसर पडत असतो.म्हणून दिखावूपणाचे अश्रू दाखविण्यापेक्षा आलेल्या प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगी साथ देणे हाच माणुसकी धर्म आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ युक्ती ❃* सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली . *_तात्पर्य_* नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment