✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://shopizen.app.link/rALIpo8ljLb••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ या वर्षातील २०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.**१९८०: भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.**१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.**१९६८: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना**१९२५: अॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.**१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना**१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: स्मृती श्रीनिवास मानधना-- भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू**१९८९: भूमी पेडणेकर -- भारतीय अभिनेत्री**१९८२: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती**१९७९: माला राजेश पारधी -- कवयित्री**१९७९: राकेश काळू वानखेडे -- लेखक, कवी* *१९७५: डाॅ.कमलाकर कोंडिबा राऊत -- लेखक* *१९७२:सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४ )**१९७१: सुखविंदर सिंग -- प्रसिद्ध भारतीय गायक**१९७०: संजय जाधव -- भारतीय सिनेमॅटोग्राफर आणि हिंदी आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६९: अर्चना मिरजकर -- कथा,कादंबरी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित, अनेक ग्रंथांचे भाषांतर* *१९६६: प्रा.शिवाजी वरुडे --- वात्रटिकाकार, लेखक**१९६०: विश्वास नेरुरकर -- संगीत संशोधक व अभ्यासक* *१९६०: अनिल जाधव --- गझलकार**१९५८: रेणू राजाराम दांडेकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका**१९५०: विद्याधर शुक्ल -- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९४९: डेनिस कीथ लिली -- निवृत्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८: सुजाता देशपांडे -- मराठी व हिंदी भाषेतील कवयित्री,लेखिका**१९४८: गजेंद्र अनंतरामजी गजभिये -- कवी**१९४८: बाबुलाल माळी -- शैक्षणिक व चरित्रात्मक लेखन करणारे लेखक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९४७: सुभदा मुळे -- लेखिका* *१९४१: निक्षुभा नंदकुमार जोशी -- कवयित्री**१९४०: डॉ.भागवत शिवराम भोयर -- लेखक, कवी* *१९२७: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२ )**१९२७: डॉ.चंद्रशेखर शिवलिंग कपाळे -- कवी, लेखक, संपादक**१९२४: श्रीधर उर्फ बापूराव दत्तात्रेय आगाशे -- चरित्रकार, प्रवचनकार (मृत्यू: २५ एप्रिल १९९६ )**१९१८: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३ )**१८६१: कादंबिनी बोस गांगुली -- संपूर्ण दक्षिण आशियातील पहिल्या महिला डॉक्टर ( मृत्यू: ३ ऑक्टोबर १९२३ )**१८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५ )**१६३५: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९४२ )**२०१२: सुरेश सरैया -- क्रिकेट जगतात रेडिओ क्रिकेट समालोचक (जन्म: २० जून १९३६ )**२००१: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४ )**१९९४: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक* *१९८९: डॉ.गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: २ मे १९१४ )**१९६९: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नासा येवतीकर लिखित आणि फेसबुकवर अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेली *" कादंबरी ललाटरेषा "*..... कादंबरी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना, दरमहा १० हजार मिळणार, पंढरपुरातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साताऱ्यातील कोयना नगर परिसरात काल दुपारी ३.२६ वाजेच्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिवाजी महाराजांची वाघनखं मुंबईत दाखल, 19 जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य दिव्य सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन’ चे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कल्याण वरून शिर्डीला पायी निघालेल्या यात्रेकरूंना भरधाव वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *“चांगला पाऊस येऊ दे, पीकपाणी चांगलं होऊ दे”, मुख्यमंत्र्यांकडून विठुरायाला साकडं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 ************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलोवर असलेला १०० मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनले आहेत ?२) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे ?३) प्रजासत्ताक दिनी सैन्यादलाची मानवंदना कोण स्वीकारतो ?४) 'डोंगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सलूनो' म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नरेंद्र मोदी २) ऑक्सफर्ड विद्यापीठ ३) राष्ट्रपती ४) पर्वत, नग, शैल, अचल ५) रक्षाबंधन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कथनी अति गुण सी करनी विष की लोए।कथनी तजि करनी करो तो विष से अमृत होए॥13॥अर्थ – सिर्फ कहना गुण से भी मीठा होता है , और उसे करना जहर से भी ज्यादा कड़वा होता है लेकिन जब कहना छोड़ कर उस काम को करने लगते है तब , वो जहर से अमृत में बदल जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या लोकांशी आपला परिचय नसते ते लोक कितीही व कोणत्याही शब्दात बोलले तरी काहीच वाटत नाही. पण,जे लोक विश्वासात घेऊन दिखावूपणाचे वागणे ठेवतात अन् आपले काम झाले की, मग कोणत्याही शब्दात बोलून मोकळे होऊन जातात तेव्हा मात्र क्षणभरासाठी सुद्धा का होईना पण, मन अगदी अशांत होते. म्हणून असेही वागणे नसायला पाहिजे जेणेकरून माणसावरचा पूर्ण विश्वास कायमचा उडून जाईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃* *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले. घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्याने पाहणार्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !' *_तात्पर्य_* *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्याच्या सहानुभूतीची अपेक्षा •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment