✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *जागर श्यामच्या कथांचा*भाग - पहिला https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_ या वर्षातील २१४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.**१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.**१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.**१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७६: कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.**१७७४: जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रवीण शिवाजी अक्कानवरू-- कवी, लेखक**१९७३: एकनाथ माधवराव डुमणे -- कवी**१९६७: डॉ.विक्रांत चंद्रकांत जाधव -- आयुर्वेद तज्ञ, लेखक**१९६६: अरुण नाईक -- कवी**१९६५: पौलस सुगंध वाघमारे -- कवी, लेखक* *१९६५: किशोरी शंकर पाटील-- लेखिका**१९६५: प्रा. डॉ. अनंत दादाराव राऊत -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६२: दगडू लोमटे -- साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक* *१९६१: डॉ. अच्युत बन -- प्रसिद्ध डॉक्टर तथा लेखक* *१९५७: रामदास धोंडू गमरे -- कवी* *१९५७: डॉ.विनायक तुमराम -- कवी, लेखक, समीक्षक**१९५६: शेषराव माधवराव मोहिते -- ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते**१९५२: सदाशिव गोविंदराव पुंडपाळ -- मराठी साहित्यिक**१९५१: वृक्ष मित्र प्रकाश काळे -- लेखक* *१९५०: डॉ.गणेश नारायणदास देवी --भाषाशास्त्र तज्ज्ञ/भाषाशास्त्र अभ्यासक, लेखक**१९४४: नागोराव सोनकुसरे -- कवी* *१९४४: दामोदर मावजो -- गोव्यातील एक लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक त्यांना २०२१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित* *१९४४: प्रा.भगवान भाऊदेव काळे -- कादंबरीकार* *१९४१: शंकर विठोबा विटणकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३९: सीमा रमेश ओवळेकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९३६: जयश्री गोपाळराव घारपुरे -- लेखिका* *१९३२: मनोहर म्हैसाळकर -- विदर्भ साहित्य संघाचे पूर्वअध्यक्ष आणि कुशल संघटक, साहित्य नाटकाचे जाणकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०२२ )**१९३२: महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२ )**१९२९: डॉ.विश्वास रघुनाथ कानडे -- लेखक* *१९२९: श्री. ग. माजगांवकर -- पत्रकार, लेखक, प्रकाशक (मृत्यू :२० फेब्रुवारी १९९७ )**१९२४: सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७ )**१९२०: राजारामबापू पाटील-- भारतीय राजकारणी (मृत्यू: १७ जानेवारी १९८४ )**१९२०: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – प्रसिद्ध लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९ )**१९१९: मोती बीए -- भोजपुरी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १८जानेवारी २००९ )**१९१८: बाबूराव गोविंदराव शिर्के -- बांधकाम व्यावसायिक (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१० )**१९१५: श्रीकृष्ण जनार्दन जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १३जानेवारी १९८९ )**१९१३: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२ )**१८९९: कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६ )**१८८२: पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१),(मृत्यू: १ जुलै १९६२ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक.(मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ )**१७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९ )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९१९: अनिल कांबळे -- नामवंत मराठी गझलकार कवी (जन्म :१९५३ )**२००८: हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६ )**२००८: अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६ )**२००५: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१ )**१९९९: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक.(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ )**१९२०: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागर श्यामच्या कथांचा भाग पहिला - सावित्रीचे व्रत" श्यामची आई " या पुस्तकातील 42 कथा शाळेतील मुलासाठी..... Audio Clip ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फास्टॅगच्या नव्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून फास्टॅगचे केवायसी अनिवार्य होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा, 15 दिवसांत संयुक्त गट ब, क ची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दूध उत्पादक शेतकरी करणार महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन, दूध दराबाबतचा सरकारचा तोडगा शेतकऱ्यांना अमान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तलाठ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार, महसूल मंत्र्यांची ग्वाही; बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर बडतर्फ, UPSC ने टाकले काळ्या यादीत, आता कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत फायनलमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटे पाहून जो घाबरत नाही, तोच खरा माणूस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *भारतीय हॉकी टीमचा कर्णधार* कोण आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी निवड झाली ?३) 'श्वेत खंड' म्हणून कोणत्या खंडास म्हटले जाते ?४) 'थवा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शब्दांचा वापर जेव्हा वाक्यात होतो तेव्हा त्यांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) हरमनप्रीत सिंग २) राजस्थान ३) अंटार्क्टिका खंड ४) समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव ५) पद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ डुमणे, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 गोविंद जाधव रोषणगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 संजीवकुमार हामंद, शिक्षक, करखेली👤 पवन कुमार भाले, धर्माबाद👤 मंगेश हानवते, गटसमन्वयक, नायगाव👤 आनंदराव पेंडकर, ग्रामसेवक, येवती👤 बंडू पाटील मोरे👤 सतिश दरबस्तेवार, कुंडलवाडी👤 विश्वनाथ चन्ने, कळमनुरी, हिंगोली👤 नागेश टिपरे👤 दिलीप साळुंके👤 साईनाथ पाटील मोकलीकर👤 शिनू दर्शनवाड👤 साईनाथ जायेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु कुलाल शिष्य कुम्भ हैं, गढ गढ काढै खोट ।अन्तर हाथ सहार दै बाहर बाहे चोट ॥ 32 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाजी बनवताना इतर साहित्या सोबत तिखट असलेली हिरवी मिरची आवर्जून टाकली जाते सोबतच मिरचीची चव सुद्धा इतर साहित्यापेक्षा वेगळी असते. भलेही जेवण करताना ताटातून तिला बाजूला सारले जात असले तरी तिच्याशिवाय बरेच पदार्थ बनत नाही. तसेच एखाद्या ज्वलंत, परखडपणे व सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच प्रकारे बाजूला सारले जात असते. म्हणून ती, व्यक्ती आपला सत्य मार्ग सोडते का...? म्हणून एकवेळ तर काय दहा वेळा बाजूला सारले तरी चालेल कधीही सत्याची साथ सोडू नये. शेवटी जशी तिखट मिरचीची आठवण होते तीच आठवण एक दिवस सत्य बोलणाऱ्या व्यक्तीची सुद्धा होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment