✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/YeExVwGXbfmXQdyb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶 *_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* 🔶 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔶•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६: मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९: अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३: फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८: 'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.*🔶 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔶••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: दिनेश राठोड ( जिजाईसुत) -- कवी, लेखक**१९८१: प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे -- कवयित्री,लेखिका**१९८०: ग्रेसी सिंग -- भारतीय अभिनेत्री* *१९७९: रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९७७: मनोज सिंधुताई सदाशिव बोबडे -- कवी**१९७६: साधना योगेश जोशी -- लेखिका**१९६८: रंगराव बन्ने -- कवी, लेखक**१९६७: मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३: प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२: कपूर लहूदास वासनिक --- कवी**१९५२: प्रा.गणेश निवृत्ती आवटे -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०: नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०: रंगनाथ गबाजी पठारे -- प्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४८: पंडित सुरेश तळवलकर --- हिंदुस्तानी संगीतातील मराठी तबलावादक**१९४७: प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९२९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९ )**१९२३: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार (मृत्यू: २००७ )**१९२१: पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४ )**१९१९: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९१९: सुरेंद्र शिवदास बारलिंगे --कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७ )**१८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ )**१८२५: विष्णू भिकाजी गोखले( विष्णूबुवा ) -- महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत लेखक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १८७१)**१८२२: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४ )*🔶 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔶 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: निर्मला बळवंत पुरंदरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ (जन्म: ५ जानेवारी १९३३)**१९९५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५ )**१९७३: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४० )**१९७२: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३० )**१९६५: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१० )**१९५१: अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२ )**१९४३: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२ )**१९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*" ... आई माझा गुरू ..."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरटीईतून खाजगी शाळा वगळण्याबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाने केला रद्द !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाडामुळे जगभरातल्या अनेक सेवा विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध योजनांचा प्रचार प्रसार स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं - आतिश कुमार सिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *१२ न्यायाधीशांची देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'द वॉल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?२) OTP चा full form काय आहे ?३) छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण किती युद्धे लढली होती ?४) 'ढग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिफा क्रमवारीत कोणता देश पहिल्या स्थानावर कायम आहे ?*उत्तरे :-* १) राहूल द्रविड २) One Time Password ३) १२० युद्धे ४) मेघ, जलद, पयोद ५) अर्जेंटिना ( भारत १२४ व्या स्थानावर )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकट चिलवरवार, शिक्षक नेते, नांदेड👤 श्रीराम भंडारे👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धानोरा खु.👤 लक्ष्मण दावणकर, केंद्रप्रमुख, लातूर👤 साईनाथ नारायण माळगे, मा. गटसमन्वयक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, शिक्षक, धर्माबाद👤 दिनेश राठोड👤 करुणा खंडेलोटे, सामाजिक कार्यकर्ती, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 बजरंग आर्गेलू, पांगरी👤 राहुल लोखंडे, पांगरी👤 सचिन राजेंद्र पिसाळ, शिक्षक, बीड👤 मोहन कुलकर्णी, शिक्षक, हदगाव👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगत जनायो जिन्ही सकल सो गुरु प्रगटे आय ।जिन गुरु आँखिन देखियाँ सो गुरु दिया लखाय ॥ 15॥अर्थ – संसार ने जिस परमात्मा का बात करता है , वो मेरे गुरु स्वरुप में प्रगट होकर उस सत्यपुरुष का दर्शन करा दिये।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच दरवाजे बंद नसतात. असले तरी समोर एखादा तरी दरवाजा खुला असतो. ज्या दरवाजातून ये,जा करणारे असतात त्यांना तो दरवाजा चांगल्याने ओळखत असतो. म्हणूनच दरवाजाला महत्व आहे. म्हणून आपण सुद्धा त्या निर्जीव असलेल्या दरवाजाकडून शिकण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!*तात्पर्य :- शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment