✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gq2WyREovPs6TK9Q/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_ जागतिक सर्पदिन_* 🟪 🟪 *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.**१९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.**१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण**१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.**१९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार**१९७५: अनंत कराड-- कवी, लेखक* *१९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू**१९६८: धनराज पिल्ले – हॉकीपटू**१९६७: स्मिता विनोद गालफाडे -- लेखिका**१९६५: डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे -- कवी**१९६२: नंदकिशोर प्रभाकर ठोंबरे -- कवी* *१९५२: वंदना गुप्ते -- भारतीय अभिनेत्री**१९५०: डॉ. विकास कशाळकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय गायक,संगीत दिग्दर्शक**१९४६: प्रा.डॉ उत्तम रुद्रवार-- सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि वक्ते* *१९४५: लक्ष्मण सिद्राम जाधव -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ जून २०१९ )**१९४३: प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे-- प्राध्यापक,मराठी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी २०१० )**१९२३: सदानंद जोशी -- जेष्ठ एकपात्री कलाकार (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००८ )**१९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल**१९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८ )**१९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – मराठी साहित्यिक (लघुकथा,लोककथा, बालवाड़्मय,चरित्र,अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५ )**१९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ )**१९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६ )**१८९१: देवदत्त नारायण टिळक -- कवी, कथाकार कादंबरीकार, संपादक (मृत्यू: २७ डिसेंबर १९६५ )* 🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सुरेखा सिक्री-- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९ एप्रिल १९४५ )**२०२०: निला सत्यनारायण - महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (जन्म: ५ फेब्रुवारी १९४९ )**२०१९: राजाराम पिराजी ढाले ( राजा ढाले) -- भारतीय लेखक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ३० सप्टेंबर १९४० )**२०१९: पुरुषोत्तम बोरकर -- सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार (जन्म: १९५६ )**२०१३: बरुन डी -- भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ३० आक्टोबर १९३२ )**१९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: १९०९ )**१९८६: वासुदेव सीताराम तथा वा.सी.बेन्द्रे – प्रसिद्ध इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने लेख*माझे माहेर पंढरी .......*पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ...... हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि पायी दिंडी वारी करणारे वारकरी ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा ......!*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *21 रोजी पुण्यात 5 हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात नवव्या स्वरमल्हार महोत्सवाची सांगता, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुपर कॉम्प्युटर ते कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकरांचे मत ; 20 रोजी पुण्यभूषण पुरस्काराचे होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची दिली मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून के. पी. शर्मा ओली यांनी घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *नखं कापतांना दुखत का नाही ? पण उपटल्यास दुखतात; असे का ?* 📙 दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखं कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापतांना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते ? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी!नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत त्वचेतील पेशींपासून निर्माण होणाऱ्या केरॅटिनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरित तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटिनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापतांना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरूष एकेरीतील विम्बल्डन चॅम्पियनचा किताब कोणी जिंकला ?२) ट्रॅव्हल्स प्लस लीझरच्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?४) 'ठेकेदार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गावाचा कारभार पाहणारी संस्था कोणती ? *उत्तरे :-* १) कार्लोस अल्काराज २) राजस्थान ३) स्पेन ( २- १ ने ) ४) कंत्राटदार, मक्तेदार ५) ग्राम पंचायत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयवंत हंगरगेकर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सुरेश भाग्यवंत 👤 हरीप्रसाद प्रभाकर आरेवार, हडको, नांदेड👤 मारोती गाडेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मात पितु गुरु करहिं ना सेवा चारो ओर फिरत पूजत है देवा।ते नर के काल नचावे आशा दे दे मुआवे॥12॥कबीर साहेब कहते है – जो इंसान माता पिता और गुरु की सेवा नहीं करता वो चाहे सारे तीर्थ-ब्रत पूजा पाठ करले फिर भी काल कुछ न कुछ आशा दे कर फिर से जन्म मरण में डाल देगा।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोभाची शिक्षाएक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस*तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment