✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1kXf3HFBiV2FihBF/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🟣 *_ या वर्षातील २१२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.**२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल**२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.**१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६२: ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.**१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.**१८९८: विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.**१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.* * ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: डॉ. प्रकाश कोयाडे -- लेखक**१९८४: मिमोह चक्रवर्ती -- भारतीय अभिनेता**१९८२: जेम्स मायकेल जिमी अँडरसन -- इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९८१: किशोर विजय बळी -- कवी, स्तंभलेखक* *१९७८: सुनील जगन्नाथ जाधव -- कवी**१९७७: उमेश उत्तमराव बोरकुले -- लेखक* *१९७७: विद्या रमेश जाधव -- कवयित्री* *१९७३: सोनू सूद -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, मॉडेल, मानवतावादी आणि परोपकारी* *१९७३: सोनू निगम – भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता**१९६३:यास्मीन जोसेफ (मंदाकिनी) -- भारतीय अभिनेत्री**१९६२: सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार -- महाराष्ट्र राज्याचे मंत्री**१९५९: डॉ.सदानंद नामदेव देशमुख-- सुप्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार,२००४चा साहित्य अकादमी पुरस्कार**१९४७: अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते**१९३५: सुधाकर बलवंत लोखंडे. -- कवी**१९३५: डॉ. अनुराधा अरविंद गोडबोले -- लेखिका(मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२२ )**१९३३: प्रा. गोविंद माधव काळे. -- कवी**१९३२: मधुकर दत्तात्रय जोशी -- कवी, लेखक, संपादक* *१९३१: लक्ष्मणराव बाळकृष्ण सराफ_ शिक्षणतज्ज्ञ,निवृत्त प्राचार्य शा.अ.महा,* *१९२८: सुलोचना (लाटकर) -- हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०२३)**१८६३: हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: ७ एप्रिल १९४७ )**१८५५: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (मृत्यू: १४ आक्टोबर १९१९ )**१८१८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: प्राचार्य मदन धनकर -- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, संपादक (जन्म:२५ ऑगस्ट १९३५)**२०२१: गणपतराव देशमुख -- महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.(जन्म: १० ऑगस्ट १९२६ )**२०१७: उस्ताद हुसेन सईदुद्दीन डागर -- सईद भाई म्हणून प्रसिद्ध, धृपद परंपरेशी संबंधित असलेले भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९३९ )**२०१३: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६ )* *२०१२: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(जन्म: २८ डिसेंबर१९३४ )* *२०११: डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (जन्म: २५ आक्टोबर १९३७ )**१९९४: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(जन्म: ८ ऑगस्ट १९२६ )**१९८३: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२० )**१९६०: ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे –स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३१ मार्च १८७१ )**१८९८: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (जन्म: १ एप्रिल १८१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे व्यासपीठ ; शिक्षण परिषद*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिव्यांग नागरिकांसाठी ची कर्ज मर्यादा 50 हजारावरून अडीच लाख करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत पत्रकारांना बंदी, ग्लास रूममधून कव्हरेज करावं लागणार, प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय, तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही - पंकजा मुंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक - कॅप्टन हरमनप्रीतचा निर्णायक गोल, भारत - अर्जेंटिना सामना 1-1ने बरोबरीत समाप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो - दुसऱ्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात विकेटनी पराभव करत, मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वजनकाटे तराजू* 📙कोणत्याही मालाची विक्री करायची झाली कि, ताबडतोब तराजू समोर येतो. रेल्वे स्टेशनवर गेलो, तर आपले वजन करण्यासाठी वजन करण्याचे मशीन खुणावतच असते. मिठाईच्या दुकानात गेलो, तर तिथे आणखीनच वेगळा प्रकार मिठाई तोलायला वापरतात. किती किलो वजन झाले आहे, ते आपल्यालाही दिसते, तसे तोलणार्यालाही उलट्या बाजूने दिसत असते. सोनाराकडे हल्ली इलेक्ट्रॉनिक आकडे दिसणारे काटे आले आहेत. लहानशी झुळूक आली वा कोणी फुंकर मारली, तरी हे आकडे झटकन हलतात. याउलट जकातनाक्यावर कधी गेलो, तर अख्खा ट्रक उभा राहील, असा वजनकाटा जमिनीतच लोखंडी चौकटींवर आधारलेला असतो.वजनाचा काटा वजनाचा आकडा दाखवतो किंवा तराजू असेल, तर एका तागडीत टाकलेले वजन मोजले जाते. पण हे वजन करण्यामागे मूळतत्त्व कोणते, हे सहसा कोणालाच आठवत नसते. गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक गोष्टीला वजन प्राप्त होते. याच गोष्टीचा कळत नकळत वापर करून तराजूवर वजन करण्याची पद्धत सुरू झाली. तराजूचे तत्त्व अगदी सोपे आहे. आडव्या दांडीला दोन तागड्या दोन बाजूंना बांधल्या व बरोबर मध्यभागी आधार दिला की, तराजू बनतो. अर्थातच तागडीचे वजन अगदी सारखे असणे आवश्यक. आता तागडीत ठराविक माहितीचे वजन एका बाजूला टाकल्यास गुरुत्वाकर्षणाची जितकी ओढ त्या बाजूला असेल, तितकीच ओढ दुसऱ्या बाजूला असलेल्या मालाच्यासाठी आवश्यक ठरते. हा झाला तराजूचा सगळ्यात सोपा आकार व वापर.वर उल्लेख केलेल्या अनेक प्रकारात हे ठराविक नेमके माहितीचे वजन टाकल्यावर आतील स्प्रिंगला बसणारा ताण हा दर्शनी काट्यावर आखला जातो (Calibration). त्यानुसार आपल्याला केलेले वजन कळू शकते. इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ामध्येही स्प्रिंग असतेच; पण आखणीऐवजी आतील कंट्रोल पॅनलला मिळणाऱ्या 'सेन्सर'करवी आपल्याला डिस्प्ले युनिटवर आकडे दिसतात. अगदी नाजूक सोन्यासारखे वजन तोलणारे काटे काचेच्या बंद पेटीत ठेवून मग वजन केले जाते. हीच पद्धत रासायनिक वस्तूंच्या वजनासाठीसुद्धा वापरतात. त्यांना 'फिजिकल अँड केमिकल बॅलेन्स' असे म्हटले जाते. अगदी छोटी एक मिलीग्रॅमची वजनेही त्यासाठी वापरली जातात. वजनकाट्यावर वजन केले जाते. पण अनेक वजनकाट्यांवर किती मर्यादेपर्यंत व्यवस्थित वजन मिळेल, याचाही उल्लेख असतो; हे आपण कधी लक्षात घेतले आहे काय ? त्याचप्रमाणे जितका काटा जास्त वजन करता येण्याजोगा, तितकी त्याची लहान चूक कळेनाशी होत जाते, हेही ध्यानात ठेवायला हवे. उदाहरणार्थ, शंभर किलोचे वजन करताना शंभर ग्रॅम वजनाचा फरक सहसा दाखवला चालणार नाही, तर अर्ध्या किलोपर्यंतचाच फरक आढळून येईल. याउलट एक किलोपर्यंतचेच वजन दाखवणारा काटा वजनातील दहा ग्रॅमचाही फरक जाणवून देऊ शकतो.अनेक व्यवहारांत वजनाचा संबंध येतोच. योग्य काट्यावर योग्य पद्धतीचे वजन करण्याचा आग्रह धरला, तर कोणाचेच नुकसान नसते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?२) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४ चा उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर झाला ?३) ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?४) 'तुरुंग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) ७० टक्के २) सीन नदी ३) मनू भाकर, शूटर ४) कारागृह, कैदखाना, बंदिखाना ५) अशोक मंडप*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय कुऱ्हाडे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ इळेगावे, पदोन्नत मुख्याध्यापक, हदगाव👤 प्रियंका घुमडे👤 संगीता ठलाल, चंद्रपूर👤 निलेश कोरडे👤 साईनाथ वाघमारे👤 शेख नवाज👤 प्रवीण चातरवाड👤 सचिन गादेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु धोबी शिष कापडा साबुन सिरजनहार ।सुरति शिला पर धोइये निकसै ज्योति अपार ॥ 30 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या स्वभावासोबत आपुलकी, माणुसकी, स्नेह, आदर तसेच प्रेमाचे बोल तेवढेच आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे, महान गुण असतात त्याच्यात कोणत्याही विकार वासना घर करत नाही, सोबतच त्याच्या जवळ येत नाही. म्हणून याच महान गुणांची साथ धरून मानवी जीवनाचे सार्थक करावे. भलेही ते, दिसत नसतील तरी अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान ठरत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌺पुण्यायी कर्माची*🌺एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला.म्हातारीने जेवण बनवले सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारीची आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत वीज आपल्याच अंगावर पडणार. असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.*तात्पर्यः एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment