✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dFSYQQS3fSZDnWJR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_ या वर्षातील २०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.**१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.**१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.**१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.**१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.**१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.**१९०८: ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: निपुण अविनाश धर्माधिकारी-- मराठी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक* *१९८४: नामदेव कोळी -- प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक**१९७५: गंगाधर गायकवाड-- लेखक**१९७३: मकरंद मधुकर अनासपुरे -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता**१९७०: देवेंद्र गंगाधर फडणवीस -- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* *१९६९: संजय सुक्रीतदास बर्वे -- प्रसिद्ध लेखक* *१९६६: डॉ.नानासाहेब सूयवंशी -- लेखक, संपादक* *१९६६: विद्या शशिशेखर शिंदे -- लेखिका* *१९६६: सिमंतिनी खेर -- लेखिका**१९६५: सारंग शंतनू दर्शने -- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक**१९६२: नानाभाऊ नत्थु माळी -- कवी, लेखक* *१९५९: अजित अनंतराव पवार -- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री**१९५५: मजहर खान-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू : १६ सप्टेंबर १९९८)**१९५५: प्रवीण कुलकर्णी (पी.डी)-- रंगकर्मी, नाटय दिग्दर्शक, कवी, लेखक**१९५०: प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* *१९३७: वसंत रांजणे– मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११ )**१९३१: शकुंतला विष्णू गोगटे -- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९१ )**१९३०: डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर -- बीजगणितीय भूमितीतील योगदानासाठी ओळखले जाणारे भारतीय अमेरिकन गणितज्ञ (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२ )**१९२५: गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक ( मृत्यू: २१ मार्च २०१७ )**१९२३: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६ )**१९१८: गोपाळराव बळवंतराव कांबळे (जी. कांबळे) -- नावाजलेले मराठी चित्रकार (मृत्यू : २१ जुलै २००२ )**१९०८: भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* *१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५ )*💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: २आक्टोबर१९४६ )* *२०१८: सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म: १४ सप्टेंबर १९३० )**२०१५: यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१ )* *२०११: डॉ. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी-- मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ (जन्म: १९२९)**१९९५: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४ )**१९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९ )**१९१८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*माझे गुरू : एक आठवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी बालसाहित्यात विशेष प्रयोग झाले नाहीत, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे परखड मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान ! नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेशातील सुप्रीम कोर्टाने बहुतांश नोकऱ्यातील आरक्षण रद्द करण्याचे दिले आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची पुण्यातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI देणार 8.5 कोटींची मदत - जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला दुर्गंधी का येते ? 📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. ----दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यभरात वाचन चळवळीसाठी 'महावाचन उत्सवा'चे ब्रँड ॲम्बेसेडर कोणाला बनवणार आहेत ?२) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?३) छत्रपती संभाजी महाराजांनी धार्मिक धोरणात कोणत्या संताच्या मुलाला वर्षासन दिले होते ?४) 'तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) PIN चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) अमिताभ बच्चन २) शिवराज सिंह चौहान ३) संत तुकाराम ( महादोबा या मुलाला ) ४) कासार, सारस, तटाक, तळे ५) Personal Identification Number *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुमंत भांगे, IAS ऑफिसर, मुंबई👤 संजय कदम, पत्रकार, देशोन्नती धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 प्रल्हाद तुमेदवार, शिक्षक, नांदेड👤 महेश व्ही. जाधव, बिजापूर, तेलंगणा👤 अनुराधा हवेलीकर-पदमे👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोषकुमार दुरगुडे👤 संतोष जाधव👤 अमोल बबनराव गायकवाड👤 धनराज वाघ👤 विश्वनाथ चित्रलवार👤 दामोदर साळुंके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चकवी बिछुड़ी रैन की आन मिली प्रभात।जो जन बिछुड़े नाम से दिवस मिले न रात ॥ 21 ॥अर्थ – जिस प्रकार चकवी रात में बिछड़ जाने के पश्चात , सुबह आ कर मिल जाती है , लेकिन जो लोग नाम से बिछड़ जाते है ( उस सार नाम ) से उन्हें फिर कोई नहीं बचा सकता और उसे काल खा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणासोबत ही का असेना बोलते वेळी जेव्हा आपण आदराने बोलत असतो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद होत असतो. सोबतच तो आनंद बघून आपल्याला विशेष समाधान मिळत असते. तो मिळालेला आनंद व समाधान त्यावेळी जगावेगळा असतो. पण एखाद्या वेळी नको त्या शब्दात बोलून कोणाचा अनादर केल्याने आपल्यात असलेले एखादे चांगले गुण मात्र नष्ट होण्याच्या मार्गांवर असते. म्हणून कोणासोबतही बोलताना समोरच्या व्यक्तीला दु:ख होणार नाही याची काळजी घ्यावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला! *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment