✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/07/hari-om-vitthala.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟫 *_ या वर्षातील १९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना*🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: सुभाष आ. मंडले -- लेखक* *१९८१: प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे -- लेखक, कवी* *१९८०: राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी, लेखक* *१९७५: आबा गोविंदा महाजन -- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८: सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६६: डाॅ. श्रीनिवास मेघ:श्याम आठल्ये -- लेखक, कवी**१९६०: प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे -- कवी* *१९५७: बळीराम रुपचंद जाधव -- लेखक**१९५६: डॉ. प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१: अनुराधा मराठे -- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट -- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९: प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विजय कोंडके -- चित्रपट दिग्दर्शक**१९४७: आशा वसंतकुमार वडनेरे -- लेखिका, अनुवादक**१९४७: विजय विठ्ठल देवधर -- मराठी लेखक(मृत्यू : ३० नोव्हेंबर २०१२)**१९४३: दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१: माधव गुणाजी कोंडविलकर -- ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२० )* *१९३७: विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू: ३१ जानेवारी १९८६ )**१९३७: प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३ )**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२ )**१९३१: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू: २६ नोव्हेंबर, २०१० )**१९२७: प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१० )**१९१९: बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: ६ नोव्हेंबर २००६ )**१९१८: चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१० )**१९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८० )**१९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१ )**१९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५ )**१८९९: दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७ )*🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: माधवी रणजित देसाई-- मराठीतील लेखिका (जन्म: २१ जुलै १९३३ )**२००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )**१९९१: जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: १९२० )**१९८०: गजानन विश्वनाथ केतकर -- निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म: ८ ऑगस्ट १८९७ )**१९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म: २६ जून १८८८ )**१९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२ )**१९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने काही रचनाहरी ओम विठ्ठला । नाम तुझे मुखी ।।एकच प्रार्थना देवा । ठेव सर्वाना सुखी ।।..... रचना वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतांना म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *BRS पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करणार, विधानसभेला रंगत येणार, दोन पक्षांशी बोलणी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य ? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो...विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *8 आमदारांची कॉंग्रेसमधून होणार हकालपट्टी ? विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरविलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचे तीन भाग आहेतः प्रथम जिज्ञासा - जी सत्याची आराधना असते , दुसरे ज्ञान - जी सत्याची उपस्थिती असते. व तिसरा विश्वास - जो सत्याचा उपभोग आहे. ------ बेकन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विम्बल्डन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची चॅम्पियन कोण ठरली आहे ?२) 'विदर्भाचे नंदनवन' असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला ?४) 'ठक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झिका विषाणू कोणत्या नावाच्या डासापासून पसरतो ? *उत्तरे :-* १) बार्बरा क्रिचिकोवा, झेक प्रजासत्ताक २) चिखलदरा, अमरावती ३) स्पेन व इंग्लंड ४) लबाड ५) एडिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 राजेश्वर डोमशेर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, नायगाव👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नागोबा हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद👤 वसंत बोनगिरे👤 शंकर हंड्रे, शिक्षक, देगलूर👤 सचिन खंडगावे👤 गंगाधर वि. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, सिडको, नांदेड👤 राजू कदम👤 विजयकुमार पाटील घुलेकर👤 संतोष ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 विष्णुराज कदम, पांगरी, धर्माबाद👤 नवाज शेख👤 पांडुरंग चंदवाड👤 आनंद गाजेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दस द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन।रहने को अचरज नहीं जात अचम्भा कौन॥11॥अर्थ – इस शरीर को ही कबीर साहेब पिंजरा कहते है इसमें दस द्वार है , २ आँख , २ कान , २ नाक , १ मुँह , १ मल द्वार , १ मूत्र द्वार , कुल हुए ९ , और एक दसवा जो है जो की गुप्त है , उसी द्वार से इस शरीर में प्राण डाला जाता है और उसे बंद कर दिया जाता है , उसी द्वार को खोलने की चाभी सच्चे सद्गुरु के पास होता , जो भक्त सच्ची लगन से अभ्यास करता है , तो सद्गुरु की कृपा से वो १० वा द्वार खुलता है और वो स्वयं को जान पाता है और उस सत्यपुरुष को देख और जान पता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते. फक्त, त्या आलेल्या वेळेत हिंमत हारू नये. तर त्या बहुमूल्य वेळेचे आनंदाने स्वागत करावे. त्या वेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे, जाणे आवश्यक असते असे म्हटल्या जाते. म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर रहावे व जगण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपायी आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते. कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment