✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://deshdoot.com/teachers-day-blog-by-nagorao-yevatikar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.**१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.**१९४९: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना**१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.**१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: गणपत विलास माखणे -- कवी* *१९९७: प्राजक्ता देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९८६: ईश्वरचंद्र व्यंकटराव हलगरे -- लेखक**१९८२: संदीप निवृत्ती गवई -- कवी, लेखक**१९७७: प्रा.गजानन रामचंद्र लोहावे -- लेखक**१९७५: डॉ. सर्जनादित्य मनोहर -- लेखक* *१९७३: प्रा. डॉ. कल्पना मेहरे -- लेखिका**१९६९:सागी लक्ष्मी वेंकटपथी राजू , (वेंकटपथी राजू) -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९६४: डॉ.अनिल मडके-- आरोग्य विषयक लेखक**१९६०: संगीता बिजलानी -- बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती**१९४७: सिद्धार्थ काक-- भारतीय माहितीपट निर्माता,दूरदर्शन निर्माता* *१९४४: अनुराधा शशिकांत वैद्य -- कादंबरीकार, कथाकार, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१६ )**१९४४:तबस्सुम (किरण बाला सचदेव) -- भारतीय कलाकार, ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२२ )**१९३८: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५ )**१९३३: पन्नालाल प्रेमराज सुराणा -- लेखक* *१९३०: के बालाचंदर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि नाटककार(मृत्यू: २३ डिसेंबर २०१४ )**१९२५:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४ )**१९२१: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,(मृत्यू: ६ मार्च १९८२ )**१८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कवी कुमार आझाद-- तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये डॉ. हंसराज बलदेवराजी भूमिकेसाठी प्रसिद्ध भारतीय अभिनेता (जन्म : १२ मे १९७२ )**२०१५: बशर नवाज -- उर्दू कवी (जन्म:१८ ऑगस्ट १९३५ )**२०१४: मनोहर काटदरे -- जेष्ठ नाटककार (जन्म: १६ फेब्रुवारी १९३२ )**२०११: साधनाताई आमटे-- मराठी समाजसेविका,लेखिका (जन्म: ५ मे १९२७ )**२००५: डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म:५ एप्रिल १९२० )**१९९३:संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन* *१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६ )**१९६७: विष्णू केशव पाळेकर (अप्रबुध्द)-- लेखक, क्रियाशील विचारवंत, चिंतक, प्रज्ञालोक मासिकाचे पहिले संपादक,(जन्म:३१ डिसेंबर १८८७ )* *१९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५ )**१८५६: अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोरोना काळात लिहिलेला व दैनिक देशदूत या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला एक चिंतनीय लेख*" पालकच बनले शिक्षक ...."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्याला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार जाहीर, येत्या (11 जुलै) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *23 जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! पक्ष व तुतारी चिन्हाला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *23 जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकद दाखवून देईल - नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत मोठा निर्णय, जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या यांची निवड, 27 जुलै पासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) जून २०२४ मध्ये झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात एकूण किती सारस आढळले ?३) देशात नवे फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ?४) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले आहेत ?५) वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी कोणता नंबर डायल करावा लागतो ? *उत्तरे :-* १) सारस २) २५ सारस ३) १ जुलै २०२४ ४) कीर स्टॉर्मर ( लेबर पार्टी ) ५) १०८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश जाधव, साहित्यिक, कोपरगाव👤 साईनाथ विश्वब्रह्म👤 पंडीत पवळे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, नांदेड👤 अनिल उडतेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चर्चा किंवा संवाद हा अभिव्यक्तीचा एक मार्ग आहे.कोणत्याही विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चा कोणत्याही विषयावर का असेना मागे असो किंवा पुढे पण,वेळात, वेळ काढून केली जाते आणि आजच्या घडिला चर्चा करणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सोडविले जातात.चर्चामधून एखाद्याला दिशा मिळू शकते.सोबतच एकमेकात संवाद सुद्धा सुरू राहतो. त्याच संवादातून व चर्चेतून काही क्षणासाठी माणूस तणावापासून दूर राहतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment